Monday , December 8 2025
Breaking News

खानापूर

खानापूर मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न

  खानापूर : खानापूर मराठामंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालय खानापूर येथील महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा मंडळ संस्थेचे जेष्ठ सदस्य श्री. परशुराम अण्णा गुरव हे होते तर तर क्रीडा. साकेसह संस्कृती विभागाचे उद्घाटन मराठा मंडळ संस्थेचे संचालक श्री. शिवाजीराव पाटील यांनी केले प्रमुख वक्ते …

Read More »

खानापूर तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या

  खानापूर : खानापूर तालुक्यातील सुरापूर या गावातील शिवराय यल्लाप्पा आयोटी या शेतकऱ्याला कर्जाचा भार सहन न झाल्याने विष प्रश्न करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विविध बँका आणि सहकारी पतसंस्थांमधील कर्जबाजारीपणाला कंटाळून सदर शेतकऱ्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. केव्हीजीबी बँक लिंगनमठ शाखा, कृषी पत्तीन सहकारी संघ, आयसीआयसीआय बँक, …

Read More »

खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेची बैठक संपन्न

  खानापूर : खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेची बैठक आज जांबोटी क्रॉस येथील निवृत्त सैनिक संघटनेच्या कार्यालयात झाली. संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग जाधव यांनी अध्यक्षपद भूषविले. उपाध्यक्ष हनुमंत गुरव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी 2019 च्या कुस्ती आखाड्याचा जमा खर्च खजिनदार तानाजीराव कदम यांनी सादर केला. पुढील कुस्ती आखाडा घेण्याविषयी चर्चा झाली. कार्याध्यक्ष …

Read More »

मराठा मंडळ पदवी महविद्यालयात क्रीडा व सांस्कृतिक विभागाचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न

  खानापूर : मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालय खानापूर येथील महाविद्यालयात क्रीडा व सांस्कृतिक विभागाचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा मंडळ संस्थेचे ज्येष्ठ सदस्य श्री. परशुरामअण्णा गुरव हे होते. तर तर क्रीडा शाखेसह विविध सांस्कृतिक विभागांचे उद्घाटन मराठा मंडळ संस्थेचे संचालक श्री. शिवाजीराव पाटील यांनी केले. …

Read More »

वैभव मारुती पाटीलची अखिल भारतीय स्पर्धेसाठी निवड

  खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्य ॲमेचुअल ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने क्रॉस कंट्री स्पर्धा तुमकुर येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये खुला गट १० किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये वैभव मारुती पाटील (बिदरभावी) तालुका खानापूर याने भाग घेऊन तृतीय क्रमांक मिळविला. वैभव पाटील ३६.५० मिनिटात वरील अंतर पार केले. यांची अखिल भारतीय स्पर्धेसाठी निवड …

Read More »

खानापूर तालुक्यासाठी मुबलक बस सेवा पुरवा

  डॉ. सोनाली सरनोबत यांची मागणी खानापूर : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील लोक बेळगाव तालुका आणि शहरात जाण्यासाठी राज्य परिवहन बसेसवर अवलंबून असतात. खानापूर तालुक्यातील लोकांना शाळा-कॉलेज, नोकरीसाठी बेळगावला यावे लागते, त्यामुळे पुरेशा बस सुविधेविना ते त्रस्त आहेत. तालुक्‍यातील प्रमुख थांब्यांवर अनेक वेळा विनंती करूनही हल्ल्याळकडून येणाऱ्या बसेस येथे थांबत …

Read More »

विधान परिषद सदस्य हणंमत निराणी यांची खानापूरला भेट

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूरला विधान परिषदेचे सदस्य हणमंत निराणी यांनी नुकताच भेट दिली. यावेळी खानापूर येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामधामात बोलविलेल्या बैठकीत बोलताना म्हणाले की, खानापूरसारख्या अतिमागासलेल्या तालुक्याला औद्योगिकदृष्ट्या उद्योगधंद्याची नितांत गरज आहे. त्यामुळे येथील युवक उद्योग, नोकरीपासून वंचित झालेले आहेत. त्यातच हा भाग सीमाभाग असल्याने मराठी भाषिकांना कोणत्याच …

Read More »

खानापूर तालुक्यातील समस्या सोडवा; खानापूर भाजपचे मुख्यमंत्र्याना निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील कळसा भांडूरा प्रकल्पाला तालुक्यातील लहान गावासाठी जागोजागी छोटे छोटे बंधारे बांधून तालुक्यातील गावांना शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यात यावा. खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी वनखात्याच्या अतिक्रमण करून कसत असलेल्या शेती गेल्या कित्येक वर्षांपासून कसत आहेत. त्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावे कायमस्वरूपी कराव्यात. तसेच खानापूर तालुक्यात ५१ ग्रामपंचायती आहेत त्यांची संख्या …

Read More »

गुंजी येथे हळदीकुंकु व तक्रार निवारण कार्यक्रम

  खानापूर : आज सायंकाळी गुंजी येथील नवदुर्गा सहकारी संस्थेकडून हळदीकुंकुचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डॉ. सोनाली सरनोबत प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. गुंजी माऊली देवस्थानमध्ये सदर कार्यक्रम घेण्यात आला. त्यांनी आपल्या नियती फाउंडेशन आणि भारतीय जनता पक्षाचे कार्य तसेच भाजप सरकारने केलेल्या योजनांबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, …

Read More »

समिती कार्यकर्त्यांनी उद्या शिवस्मारक येथे जमावे

  खानापूर तालुका म. ए. समितीचे आवाहन खानापूर : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने पुकारलेल्या “चलो कोल्हापूर” धरणे आंदोलनासाठी खानापूर तालुका म. ए. समितीच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींसह हजारो कार्यकर्त्यांनी कोल्हापूर येथे धरणे आंदोलनासाठी सामील होण्यापूर्वी सर्व कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी 7.30 वाजता शिवस्मारक येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सर्व कार्यकर्त्यांनी स्वतःच्या दुचाकी, …

Read More »