Saturday , June 6 2026
Breaking News

समाजसेवक सदानंद काद्रोळकर, विष्णू काद्रोळकर यांचा लायन्स क्लबच्यावतीने सत्कार

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर लायन्स क्लबच्यावतीने नुकताच खानापूर वनविभागाच्या विश्रामधामात समाजसेवक सदानंद काद्रोळकर, विष्णू काद्रोळकर यांचा सत्कार सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला विशेष मार्गदर्शक म्हणून बेळगाव जिल्हा ३१७ बी चे रिजन चेअरपर्सन एमजेएफ ऍड. गुरूदेव सिध्दापूरमठ उपस्थित होते.
तर खानापूर लायन्स क्लबचे प्रसिंडेट प्रा. बसवराज हम्मणावर, डाॅ. प्रकाश बेतगावडा, डाॅ. राधाकृष्ण हारवाडेकर, एम. जी. कुमार, प्रकाश गावडे, एम. जी. बेनकट्टी, सागर उप्पीन, अजित पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बेळगाव जिल्हा ३१७बी चे रीजन चेअरपर्सन एमजेएफ ऍड. गुरूदेव सिध्दापूरमठ याच्या हस्ते समाजसेवक सदानंद काद्रोळकर व विष्णू काद्रोळकर यांचा त्यांच्या त्याच्या सामाजिक सेवेची दखल घेऊन त्याचा शाल, श्रीफळ, पुष्पहार व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी ऍड. गुरूदेव सिध्दापूरमठ म्हणाले की, समाजात विविध प्रकारच्या समाजसेवा केल्या जातात. मात्र समाजसेवक सदानंद काद्रोळकर यांनी आता खानापूर तालुक्यात कुठे ही अपघात झाला तर पोलिसांच्या मदतीसाठी आपल्या वाहनातून मृतदेह नेण्याचे काम सदानंद काद्रोळकर करतात. रात्री अपरात्रीच्यावेळी पोलिस खात्याचा फोन आला तर आपल्या वाहनासह पोलिसाच्या मदतीला धावून येतात. ते स्वतः मृतदेह उचलुन गाडीत घालुन सरकारी दवाखान्यात दाखल होतात. त्यांच्या समाजसेवेच कौतुक कराल तेवढे कमीच आहे. ही समाजसेवा सर्वश्रेष्ठ समाजसेवा म्हणण्यास काहीच हरकत नाही हे खूप धाडसाचे काम आहे. अशा कामामुळे पोलिस खात्याला यांची खुप मोठी मदत होते. त्यांच्या सेवेचे कौतुक कराल तितके कमीच आहे. या सेवेतुन त्यांचे मोठे कौतुक आहे.

About Belgaum Varta

Check Also

सुपीक जमिनींसाठी शेतकऱ्यांचा लढा तीव्र; रेल्वे प्रकल्पाविरोधात आक्षेप

Spread the love  बेळगाव : बेळगाव-धारवाड नवीन रेल्वे मार्गासाठी प्रस्तावित जमीन अधिग्रहण प्रक्रियेला परिसरातील शेतकऱ्यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *