खानापूर : एंजल फाउंडेशनच्या वतीने शहरातील गरजूंना मदत करण्यात येते तसेच शैक्षणिक शाळांना भेट देऊन त्या ठिकाणी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे याची माहिती घेऊन शाळेला आवश्यक असलेल्या गोष्टी पुरविण्यात येतात. अशाच प्रकारे सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा नंबर 7 येथे एंजल फाउंडेशन च्या वतीने चटईचे वितरण करण्यात आले. येथील …
Read More »परीट समाजातर्फे संत गाडगेबाबा पुण्यतिथी व हळदी कुंकू समारंभ संपन्न
खानापूर : परीट समाजातर्फे खानापूर येथे संत गाडगेबाबा पुण्यतिथी व हळदी कुंकू समारंभ 20 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. सदर समारंभ राजा शिवछत्रपती स्मारक येथे घेण्यात आला. कार्यक्रमास डॉ. सोनाली सरनोबत या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. परीट (मडीवाळ) समाजाच्या महिलांच्या वतीने भाजपा नेत्या सोनाली सरनोबत यांचा सत्कार …
Read More »खानापूरात सरकारी जागेवर बेकायदेशीर गाळे उभारून भाडे हडप करण्याचा प्रकार
आनंद वाझ यांची पत्रकार परिषदेत माहिती खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील मध्यवर्ती असलेल्या सर्वे नंबर ५३ /अ या सरकारी जागेवर बेकायदेशीर गाळे उभारून लाखो रूपये हडप करण्याचे प्रकार सुरू असुन याकडे अधिकारीच दुर्लक्ष करत असल्याने नगर पंचायतीचा लाखोंचा महसुल बुडीत चालला आहे. तेव्हा या जागेवरील अतिक्रमण हटवून सदर जागा …
Read More »कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा खानापूर समितीतर्फे जाहीर निषेध
खानापूर : सीमाप्रश्नी केंद्र सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवार दिनांक १९ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता व्हॅक्सिन डेपो टिळकवाडी बेळगांव येथे कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाला विरोध म्हणून निषेधात्मक महामेळावा आयोजित केलेला होता. या महामेळाव्याला पाठींबा देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार होते. परंतु बेळगांव जिल्हाधिकाऱ्यांनी …
Read More »खानापूरात ७ जानेवारीपासून शिवगर्जना महानाट्य
खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथील श्री महालक्ष्मी ग्रुपच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित घोडे, हत्ती, उंट याच्यासह ३५० कलाकारांनी सादर करण्यात येणारे शिवगर्जना एतिहासिक नाट्य श्री महलक्ष्मी ग्रूप संचालित शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या पटांगणावर येत्या दि. ७ जानेवारी ते १० जानेवारी पर्यंत असे चार दिवस तालुक्यातील जनतेला मोफत नाट्य …
Read More »खानापूर शहर परिसरात महामेळाव्याची जनजागृती
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने यशवंत बिर्जे आणि प्रकाश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अष्टप्रतिनीधी मंडळाने १९ डिसेंबर २०२२ रोजी होणाऱ्या महामेळाव्याची पत्रके खानापूर शहरात वाटण्यात आली. यावेळी आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, डी. एम. भोसले, अरुण पाटील, जयराम देसाई, अमृत पाटील, विठ्ठल गुरव, विशाल पाटील, प्रल्हाद मादार, प्रवीण …
Read More »येत्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा, रयत संघटनेची मागणी
खानापूर (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत त्यातच राज्यातील २१ साखर कारखान्यावर सरकारने धाड टाकून चौकशी सुरू केली. त्यात आपल्या जिल्ह्यातील ७ ते ८ साखर कारखान्याचा समावेश आहे. या धाडीत साखर कारखाने वजन काट्यात तफावत असल्याचे दिसून आले. अशा साखर कारखान्यानी शेतकऱ्यांच्या उसाचे नुकसान केले. ती नुकसानभरपाई द्यावी. …
Read More »नंदगड जिल्हा पंचायत क्षेत्रात महामेळाव्याची जनजागृती
खानापूर : तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अष्टप्रतिनीधी मंडळाचा दौरा नंदगड जिल्हा पंचायत क्षेत्रामध्ये शनिवार दिनांक १७ डिसेंबर २०२२ रोजी पार पडला. सदर दौऱ्यामध्ये नंदगड येथील श्री माऊली मंदिर येथे सभा पार पडली, सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सत्याग्रही पुंडलीकराव चव्हाण हे होते. यावेळी रमेश धबाले, प्रकाश चव्हाण, यशवंत बिर्जे यांच्या नेतृत्वाखाली …
Read More »मतभेदांना दूर ठेवत चळवळीला बळकटी द्या : ज्येष्ठ नेते संभाजी देसाई
लोंढा जिल्हा पंचायत क्षेत्रात खानापूर म. ए. समितीकडून जनजागृती खानापूर : गेली 66 वर्ष अनेक संकटे झेलून कोणत्याही आमिषाला बळी न पडता शासनाच्या दडपशाहीला न जुमानता निष्ठावंत सीमा सत्याग्रहींनी सीमाप्रश्नाची चळवळ अखंडपणे तेवत ठेवली आहे. सध्या सीमाप्रश्न न्यायप्रविष्ठ असताना चळवळ तीव्र ठेवणे गरजेचे आहे. अशावेळी मतभेदांना दूर ठेवत चळवळीला …
Read More »नियंत्रण सुटून गाडीचा चोर्ला घाटात अपघात; एक जण ठार
खानापूर : गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला झालेल्या अपघातात जमखंडी तालुक्यातील एक जण ठार तर 12 जण गंभीर झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी चोर्ला घाटात घडली. सदर अपघातात शिवानंद सज्जन, बनहट्टी (वय 36 जमखंडी) असे मृताचे नाव असून याबाबत मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी जमखंडी येथील कुटुंबीय टेम्पो ट्रॅव्हलरने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta