Monday , September 21 2026
Breaking News

कराटे स्पर्धेमध्ये खानापूरला सुयश

Spread the love

 

खानापूर : रविवार दिनांक 8 जानेवारी 2023 रोजी बेळगाव पिरनवाडी येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात झालेल्या दुसऱ्या ओपन स्पर्धेत कराटे चॅम्पियनशिप मध्ये 300 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. या कराटे स्पर्धेमध्ये खानापूर कराटे अकादमी 5 स्पर्धकांनी भाग घेतला होता यामध्ये कुमारी निहिरा परशराम नाथ हिला बेळगाव जिल्हा गोल्ड मेडल, कुमारी अश्विनी विष्णू पाटील हिला गोल्ड मेडल, कुमारी निसटले संदीप सोज हिला सिल्वर मेडल, कुमार महेश मोहन नाडगौडा सिल्वर मेडल तर कुमारी साक्षी प्रमोद नाईक हिने सिल्वर मेडल घेऊन घवघवीत यश संपादन केले.

कराटे प्रशिक्षक श्री. राहुल पाटील बेकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरील स्पर्धक सराव करत आहेत.
या अकादमीसाठी श्री. सुभाष देशपांडे, श्री. शिवशंकर कट्टीमनी, श्री. परशुराम जाधव, श्री. विष्णू पाटील, श्री. संदीप सर, श्री. प्रदीप नाईक, श्री. महेश नाडगौडा, श्री. देवानंद घाडी, श्री. सचिन कुंभार, श्री. मंजुनाथ संगमनावर, श्री. सोमनाथ पाटील यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *