बेळगाव : हिंडलगा येथे रविवारी संक्रांतीच्या सणादिवशी युवा समिती, हिंडलगा यांनी हिंडलगा स्मशानभूमीत वाढलेली झाडे झुडपे, साचलेला कचरा काढून स्वच्छता करण्यात आली. सर्व कचरा जमा करुन जाळण्यात आले. याचप्रमाणे दोन दिवसांपूर्वी रेणूका मंदिर परिसरातील कचरा काढून स्वच्छ करण्यात आला. या कार्यासाठी युवा आघाडी अध्यक्ष विनायक पावशे, अमित हेगडे, रामचंद्र कुद्रेमणीकर ग्राम पंचायत सदस्य, श्रीकांत जाधव, राजू कुप्पेकर, संदिप मोरे, सतीश नाईक, मारुती पावशे यांनी परिसर स्वच्छ करण्यासाठी परिश्रम घेतला.