खानापूर : डॉ. सोनाली सरनोबत आणि परमपूज्य आरुध मठाधीश स्वामीजी यांच्यासोबत गंदिगवाड येथे भजनी स्पर्धेचे उद्घाटन केले. नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर भजनी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध गटांनी सहभाग घेतला. डॉ. सोनाली सरनोबत, श्री आरुधमठ स्वामाजी, स्थानिक समिती सदस्य, मारुती कामतगी, मल्लाप्पा मारिहाळ यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. सोनाली …
Read More »खानापूर रेल्वे स्टेशन रोड शाहूनगरात दुर्गा माता पुजन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील शाहू नगरात दुर्गा माता पुजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी श्री दुर्गा माताच्या आरतीला उपस्थित भाजपचे अध्यक्ष संजय कुबल, भाजपचे नेते व महालक्ष्मी साखर कारखान्याचे अध्यक्ष विठ्ठल हलगेकर, खानापूर भाजप मीडिया प्रमुख राजेंद्र रायका, सुनिल नायक, तसेच शाहूनगरमधील नागरिक दिलीप …
Read More »नंदगड येथे दुर्गा दौडचे स्वागत उत्साहात
खानापूर : आज नंदगड येथे नवरात्रीच्या चौथ्या दिवशी काढण्यात आलेल्या दुर्गा दौडचे स्वागत दुर्गानगर नंदगड येथे आनंदी वातावरणात मोठ्या उत्साहाने करण्यात आले. दौडमध्ये तरुण युवक व युवतींची तसेच लहान दौडकांची लक्षणीय उपस्थिती होती. आज पहाटे लक्ष्मी मंदिर येथून दौडची सुरुवात होऊन सांगता कार्यक्रम दुर्गानगर येथे पार पाडला. यावेळी दौडचा …
Read More »माडीगुंजी श्री माऊलीदेवी यात्रोत्सवाला 5 ऑक्टोबरपासून प्रारंभ
खानापूर : सालाबादप्रमाणे विजयादशमी रोजी मौजे माडीगुंजी, ता. खानापूर येथील बुधवार दि. 05-10-2022 पासून श्री माऊलीदेवी यात्रोत्सवाला प्रारंभ होणार असून शनिवार दि. 08-10-2022 रोजी सायं. ठीक 5.00 वाजता यात्रोत्सवाची सांगता होणार आहे. बुधवार दि. 05-10-2022 रोजी सकाळी 8.00 वा. श्री माऊली देवीस अभिषेक व ठीक 11.00 वा. देवीला शृंगारण्याचा विधि …
Read More »खानापूर नगरपंचायतीच्या स्थायी कमिटी बैठकीत शहरातील स्वच्छतागृहांबाबत चर्चा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील स्वच्छतागृहाची स्वच्छता ठेवण्यासाठी दररोज २० रूपये एका स्वच्छतागृहाला खर्च करून शहरातील स्वच्छतागृह व्यवस्थित ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर नगरपंचायतीच्या २० वार्डातून कुपनलिकाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पाणी सोडण्यावर नियंत्रण नसल्याने याचा दुरूपयोग होत आहे, असे मत नगरसेवक नारायण मयेकर यानी मांडले. काही कुपनलिकाना नागरिक …
Read More »घरफोडीत सहभागी असल्याच्या संशयावरून रामनगरातून तिघे ताब्यात
खानापूर, : गेल्या कांही महिन्यापासून पोलिसांना चकवा देत दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या तिघांना नंदगड पोलिसांनी रामनगरमधून (ता. जोयडा) स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. मंगळवारी मध्यरात्री रामनगर औद्योगिक वसाहतीत कारवाही केली. त्यात दोन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. काही दिवसांपासून हावेरीतील हे तिघे भाड्याच्या खोलीत राहत होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद …
Read More »यडोगा येथे भाजपचा महिला मेळावा संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : यडोगा (ता. खानापूर) येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजप नेते विठ्ठल हलगेकर यांच्या नेतृत्वाखाली महिला मेळावा संपन्न झाला. यावेळी यडोगा गावचे ज्येष्ठ नागरिक व म. ए. समितीचे नेते रामा खांबले अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाची सुरूवात रामा खांबले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी बोलताना भाजप नेते …
Read More »आम आदमी पार्टीचा आमदार होताच खानापूर तालुक्यात मोफत सोयी
खानापूर (प्रतिनिधी) : दिल्लीमध्ये आम आदमीकडून मोफत शिक्षण, मोफत प्रवास, मोफत इतर सवलती तसेच ८ ते १० हजार रुपयाची बचत कुटूंबासाठी केली जाते. तीच सवलत खानापूर तालुक्यात आम आदमी पक्षाचा आमदार होताच केली जाईल, असे आश्वासन खानापूर तालुका आम आदमीचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांनी खानापूर येथील शिवस्मारक चौकातील सभागृहात …
Read More »कक्केरीच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला कोचेरी यांच्याकडून सहकार्य
खानापूर (प्रतिनिधी) : यंदाच्या पावसामुळे कक्केरी (ता. खानापूर) येथील शेतकरी इराप्पा नाडगौडा या गरीब शेतकऱ्यांचे घर कोसळून ९ महिने उलटून गेले. तरी तालुक्याच्या आमदारांनी तसेच शासकीय अधिकारी वर्गाने कोणतीच नुकसानभरपाई देण्याचे सहकार्य दाखवले नाही. याची माहिती बेळगांव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी कक्केरी गावाला भेट देऊन गरीब शेतकरी इराप्पा नाडगौडा …
Read More »पारिश्वाडच्या बसवेश्वर विविध उद्देशीय सौहार्द सहकारी सोसायटीची वार्षिक सभा संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : पारिश्वाड (ता. खानापूर) येथील बसवेश्वर विविध उद्देशीय सौहार्द सहकारी सोसायटीची १२वी वार्षिक सभा नुकतीच पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन सुभाष गुळशेट्टी होते. सदाशिव देवरमनी यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. सभेची सुरूवात ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta