Friday , November 22 2024
Breaking News

खानापूर

खानापूर तालुका म. ए. समितीत एकीची वज्रमुठ!

4 एप्रिलपासून पुनर्रचना प्रक्रिया सुरू खानापूर : खानापूर तालुक्यातील जागृत देवस्थान श्रीक्षेत्र हब्बनहट्टी येथील स्वयंभू मारुती मंदिरात खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटात एकी घडली. गुरुवारी झालेल्या दोन्ही गटांच्या संयुक्त बैठकीत एकी करण्याचा निर्णय झाला असून 4 एप्रिल रोजी खानापूर शिवस्मारकात बैठक होणार असून त्या बैठकीपासून पुनर्रचनेला सुरुवात होणार …

Read More »

आंबेडकर जयंतीपर्यंत शाळा चालू ठेवा : एन. सी. तलवार

खानापूर (प्रतिनिधी) : भारतीय घटेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी साजरी केली जाते. मात्र कर्नाटक राज्यातील शाळाना १० एप्रिलपासून शाळाना सुट्टी जाहिर केली जाते. मात्र घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला शाळाना सुट्टी असल्याने विद्यार्थी वर्गाची उपस्थित कमी प्रमाणात असते. तेव्हा कर्नाटकातील शाळाना १५ एप्रिल …

Read More »

खानापूर तालुक्यात ३७८६ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील १५ दहावीच्या परीक्षा केंद्रात ३७८६ विद्यार्थी असुन एका वर्गात जास्तीत जास्त २० विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था करण्याची सुचना परीक्षा मंडळाने पत्रक काढुन दिली आहे. यंदा कोरोनाचे नियम पाळुनच विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. सोमवारी दि. २८ मार्च पासुन ते दि. ११ एप्रिल पर्यंत होणार आहे. परीक्षा …

Read More »

खानापूर नगरपंचायतीच्या बैठकीत मालमत्ता कर वाढीचा निर्णय

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मालमत्ता कर वाढीचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मजहर खानापूरी होते. तर व्यासपिठावर उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, स्थायीकमिटी चेअरमन प्रकाश बैलूरकर, चीफ ऑफिसर बाबासाहेब माने आदी उपस्थित होते. बैठकीत कोरोनाच्या महामारीमुळे सर्व सामान्य नागरिकाना जगणे कठीण झाले आहे. अशातच कर वाढीचा निर्णय …

Read More »

सिंगीनकोप मराठी शाळेच्या इमारतीची दुरावस्था, शासनाचे दुर्लक्ष

खानापूर (प्रतिनिधी) : सिंगीनकोप (ता. खानापूर) येथील पूर्व प्राथमिक मराठी शाळेच्या सन १९५६ साली बांधण्यात आलेल्या जुन्या इमारतीची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गाला इमारतीत बसणे धोक्याचे झाले आहे. सिंगीनकोप पूर्व प्राथमिक मराठी शाळेत इयत्ता ते पाचवी पर्यंतचे वर्ग चालतात. तर या शाळेत एकूण ४५ विद्यार्थी शिक्षण घेतात. जुन्या इमारतीची …

Read More »

मोटरसायकल अपघातात मणतुर्गा येथील युवक गंभीर जखमी

बेळगाव : भरधाव मोटरसायकल रस्त्यावरील दुभाजकाला धडकल्यामुळे घडलेल्या अपघातात एक युवक गंभीर तर दुसरा किरकोळ जखमी झाल्याची घटना आज दुपारी खानापूर तालुका सरकारी हॉस्पिटल समोर घडली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नांव गजानन कल्लाप्पा देवकरी (वय 22, रा. मणतुर्गा, खानापूर) असे आहे. गजानन आणि त्याचा मित्र आज मंगळवारी दुपारी 2:35 …

Read More »

खानापूर तालुका म. ए. समितीच्या एकीसंदर्भात 24 रोजी बैठक

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटांची एकी करण्यासंदर्भात पंचसदस्यीय कमिटीच्या वतीने बैठक बोलाविण्यात आली आहे. याबाबत दोन्ही गटांच्या प्रमुखांना लेखी पत्राद्वारे बैठकीला उपस्थित राहण्यासंदर्भात कळविण्यात आले आहे. सदर बैठक गुरुवार दि. 24 मार्च रोजी दुपारी 2 वाजता हब्बनहट्टी येथील मारुती मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. 2018 …

Read More »

खानापूर तालुक्यातील ग्रा. पं. कडून मिळाणाऱ्या घरासंदर्भात ता. पं. ला निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतमधून १६३० घरे मंजुर करून तालुक्याच्या आमदारानी १० घरे प्रत्येक ग्राम पंचायतीला आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांच्या नावे घर मंजुरीसाठी दिली आहे. हा ग्राम पंचायत सदस्यावर अन्याय आहे. तेव्हा तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सदस्याना विश्वासात घेऊन संबंधित ग्राम पंचायतीच्या पीडिओ अधिकाऱ्यानी आमदार …

Read More »

भरतीत मराठी शिक्षकांनाही प्राधान्य द्या : खानापूर युवा समिती

बेळगाव : शिक्षण खात्यातर्फे राज्यात 15 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे या भरतीमध्ये बेळगाव व चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यामध्ये मराठी माध्यमांच्या शिक्षकांना प्राधान्य दिले जावे, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने एका निवेदनाद्वारे जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांकडे केली आहे. तसेच मागणीची पूर्तता न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. खानापूर …

Read More »

सोमवारी खानापूर युवा समितीच्यावतीने जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देणार

खानापूर : कर्नाटकात शिक्षक भरती प्रक्रियेला लवकरच चालना मिळणार आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने शिक्षक भरतीवेळी मराठी माध्यमाला जास्तीत जास्त मराठी शिक्षक भरती करून अग्रस्थान द्यावे या मागणीसाठी सोमवार (ता. 21) रोजी सकाळी 11 वाजता बेळगाव येथे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने निवेदन देण्यात येणार आहे. तरी यावेळी …

Read More »