Thursday , December 11 2025
Breaking News

खानापूर

गर्लगुंजीच्या अजित पाटीलांची पुणे शहर भाजप माजी सैनिक आघाडी अध्यक्षपदी निवड

खानापूर (प्रतिनिधी) : मुळचे गर्लगुंजी (ता. खानापूर) गावचे सुपुत्र व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले माजी सैनिक अजित कल्लापा पाटील यांची पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या माजी सैनिक आघाडी अध्यक्ष पदी निवड झाल्याचे पत्रक पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमदार जगदीश तुकाराम मुळीक यानी देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. …

Read More »

खानापुरात बस अभावी नागरिकांचे हाल

  खानापूर : खानापूर येथून सकाळच्या वेळी बेळगाव येथे महाविद्यालयीन व इतर शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जातात सकाळी सात ते नऊ या वेळेत बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. याबाबत येथील आगार प्रमुखांना वारंवार विनंती करण्यात आलेली आहे. मात्र आगार प्रमुख दुर्लक्ष करत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत …

Read More »

खानापूर तालुक्यातील ‘ती’ गावे इको सेन्सिटिव्ह झोनमधून वगळा

  खानापूर तालुका म. ए. समितीचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन खानापूर : खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील संबंधित 62 गावे इको सेन्सिटिव्ह झोनच्या कक्षेतून वगळण्यात यावीत. त्याचप्रमाणे या झोन संबंधी आक्षेप नोंदवण्यासाठीची 60 दिवसांची मुदत वाढवून देण्यात यावी, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्याय दंडाधिकारी यांच्याकडे केली आहे. …

Read More »

खानापूरच्या दुर्गम भागात 75 वर्षानंतर डॉ. सरनोबत यांच्या प्रयत्नाने गावोगावी रेशन वाटप

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका अतिदुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्याच्या दुर्गम भागात 75 वर्षानंतरही गावोगावी रेशन वाटप केले जात नव्हते. ही भाजप नेत्या व भाजप महिला मोर्चा व्हाईस प्रेसिडेंट डॉ. सोनाली सरनोबत यांच्या खानापूर येथील तक्रार निवारण कार्यालयात दुर्गम भागातील 23 गावांनी तक्रार नोंदविली. याची दखल घेऊन जुलै …

Read More »

इको सेन्सिटिव्ह झोन बैठकीत आ. डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

  बेंगळुरू : भारत सरकारने 15 राज्यांमधील एकूण 56.825 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ पश्चिम घाट पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील प्रदेश म्हणून अधिसूचित केला आहे. या अधिसूचनेवर चर्चा करण्यासाठी काल मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. खानापूरच्या आमदार डॉ. निंबाळकर यांनीही या बैठकीत सहभागी होऊन सूचना मांडल्या. पश्चिम घाट प्रदेशातील लोकांचे जीवन सुसह्य …

Read More »

मळव गावात घर कोसळून लाखो रूपयांचे नुकसान, मदतीचे आवाहन

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात सतत होणार्‍या मुसळधार पावसामुळे निलावडे ग्राम पंचायत हद्दीतील मळव (ता. खानापूर) येथील गरीब शेतकरी कुटुंबातील सरस्वती बुध्दापा गावडे यांच्या घराच्या भिंती सोमवारी रात्री कोसळून लाखो रूपयाचे नुकसान झाले. त्यात त्याची संसार उपयोगी भांडी, कपाटे, कपडे, धान्य, पैसा, दागदागिने जमिनीत गाढले गेले. या …

Read More »

गर्लगुंजी येथे दोन घरात चोरी..!

  खानापूर : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी येथे काल रात्री एकाच दिवशी दोन घरफोड्या झाल्या. मोठ्या प्रमाणात रोकड व सोन्याचे दागिने लंपास करून चोरट्यांनी पलायन केले. गर्लगुंजी येथील शिवाजी नगर येथील रेमा नारायण गोजेकर यांचे घर फोडून चोरट्यांनी 5 ग्रॅम सोन्याची चेन, 5 ग्रॅम सोन्याची अंगठी, 3 ग्रॅम सोन्याचे दागिने असा …

Read More »

खानापूर येथील पडळवाडीजवळ बस नाल्यात पडली

  खानापूर : खानापूरहून कुंभर्डाकडे जाणारी केएसआरटीसी बस पडळवाडी वळणावर झाडापासून बचाव करण्यासाठी गेली असता नाल्यात पडल्याची घटना काल सायंकाळी घडली. या रस्त्याच्या वळणावर एक झाड येते. या झाडाला धडकू नये म्हणून केएसआरटीसी बस चालकाने बस नाल्यात खाली उतरवली. सुदैवाने बसमधील कोणीही जखमी झाले नाही. नंतर सर्व प्रवासी इतर व्यवस्था …

Read More »

बैलूर व्हाया उचवडे बेळगाव बससेवेची निवेदनाद्वारे मागणी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बैलूर व उचवडे ग्रामस्थांनी बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव केएसआरटीसी विभागाचे अधिकारी नायक यांची भेट घेऊन बैलूर व्हाया उचवडे अशी बस सेवा बेळगाव आगारातून सकाळी ८ वाजता व दुपारी ११ वाजता. आणि सायंकाळी ५ वाजता सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन देण्यात …

Read More »

जांबोटी भागातील गावाना गावोगावी रेशन वाटप करण्याची आम आदमीची तहसीलदारांना निवेदनाद्वारे मागणी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील जांबोटी परिसरातील गावाना गावोगावी रेशनवाटप करण्याची मागणी खानापूर तालुका आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार प्रविण जैन यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, जुन महिन्याच्या १८ तारखेला यासंदर्भात निवेदनात देऊन महिना झाला तरी अद्याप कोणतीच दखल घेतली नाही. …

Read More »