Sunday , December 7 2025
Breaking News

खानापूर

संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी मंडळाच्या पायी दिंडीचे मणतुर्गा ग्रामस्थांच्या वतीने स्वागत…

  खानापूर : आषाढी एकादशीसाठी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला वारीत हजारो वारकरी सहभागी होण्यासाठी जात असतात. संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी मंडळाचे वारकरी दक्षिण गोवा ते पंढरपूर पर्यंत पायी दिंडी जाणार आहेत. दिंडीची सुरुवात दक्षिण गोव्यातून करून बाली, सावर्डे, धडे, मोलम, अनमोड, अखेती, मेरडा आदी मार्गाने येऊन मणतुर्गा येथे आज सायंकाळी आगमन …

Read More »

बेळगाव आणि खानापुरात उद्या शाळांना सुट्टी

  बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव शहर परिसरात होत असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील सरकारी अनुदानित विनाअनुदानित प्राथमिक माध्यमिक शाळा आणि पदवी पूर्व कॉलेजला उद्या बुधवार दि. 25 जून रोजी असणार सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी याबाबतची सूचना प्रसिद्धीस दिली आहे.

Read More »

लोंढा फाटा ते लोंढा गावापर्यंत रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य…

  लोंढा : बेळगाव-पणजी महामार्गावर लोंढा फाटा ते लोंढा गावापर्यंत 300 मीटर लांब रस्त्याचे अतोनात नुकसान झाले आहे. गेल्या चार वर्षांपासून रस्ता दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहे त्यामुळे किरकोळ अपघात सामान्य व ग्रामस्थांना तातडीने दुरूस्ती करावी लोंढा गावाला लोंढा जंक्शन असे म्हटले जाते, कारण गोव्याला जाणारे बहुतेक प्रवासी हाच मार्ग वापरतात. महामार्ग …

Read More »

खानापूरमध्ये इंदिरा कॅन्टीनचे उद्घाटन…

  खानापूर : खानापूर येथील बहुप्रतीक्षित इंदिरा कॅन्टीनचे आज उद्घाटन झाले. विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी आणि आमदार विठ्ठल हलगेकर यांनी स्वतः लोकांना नाश्ता वाढून या कॅन्टीनचे उद्घाटन केले. ग्रामीण भागातील लोकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे हे इंदिरा कॅन्टीन, माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात …

Read More »

खानापूरच्या जनतेला “इंदिरा कॅन्टीन”चा लाभ : माजी आमदार, एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई निंबाळकर

  खानापूर : काँग्रेस सरकार नेहमीच गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी जनतेसाठी नवनवीन उपक्रम राबवत असते. यातून सरकारची जनतेप्रती असलेली बांधिलकी असते. इंदिरा कॅन्टीन ही संकल्पना सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना काँग्रेस सरकारने कर्नाटक राज्यात 2013 ते 2018 या काळात सुरू केलेला प्रकल्प आहे. खानापूर तालुक्यात इंदिरा कॅन्टीन सुरू करण्यासंदर्भात 2018 ते 2023 या …

Read More »

खानापूरमध्ये ‘इंदिरा कॅन्टीन’चे उद्या उद्घाटन….

  खानापूर : खानापूर येथे नव्याने बांधलेल्या इंदिरा कॅन्टीनचे उद्घाटन उद्या शनिवार २१ जून रोजी दुपारी १२:०० वाजता होणार आहे. जिल्हा प्रशासन आणि खानापूर नगर पंचायतीच्या सहकार्याने शिव छत्रपती चौक येथील रिक्षा स्टँडशेजारी हे कॅन्टीन उभारण्यात आले आहे. कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या …

Read More »

खानापूर नगरपंचायत स्थायी अध्यक्षपदी आप्पया कोडोली!

  खानापूर : खानापूर येथील नगरपंचायतीची बऱ्याच दिवसानंतर बैठक बुधवारी पार पडली या बैठकीत नगरपंचायतीच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगरसेवक आप्पया कोडोली यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. व त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदनही करण्यात आले. आज बुधवार दिनांक 18 जून रोजी नगराध्यक्षा मीनाक्षी बैलूरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत 11 जणांचा …

Read More »

आमरण उपोषणाचा इशारा देताच पीडब्ल्यूडी खाते जागे झाले! अधिकाऱ्यांनी केली हलशी – मेरडा रस्त्याची पाहणी!

  दोन दिवसात रस्ता दुरुस्ती कामाला सुरुवात होणार. खानापूर : नंदगड-नागरगाळी मार्गावरील हलशी ते मेरडा मार्गावर मोठे खड्डे पडले असून रस्त्याची चाळण झाली आहे. खानापूर तालुक्याचे आमदार व पीडब्ल्यूडी खात्याचे या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. ताबडतोब या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या घरासमोर व …

Read More »

डीसीसी बँक निवडणूक बिनविरोधसाठी प्रयत्न; अन्यथा अरविंद पाटील यांच्या पाठीशी जारकीहोळी बंधू थांबणार : माजी मंत्री भालचंद्र जारकीहोळी

  खानापूर : डीसीसी बँक बेळगाव संचालक मंडळाची निवडणूक 19 ऑक्टोबर 2025 रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ही निवडणूक नेहमी पक्ष विरहित होत असते. खानापूर तालुक्यातून माजी आमदार व डीसीसी बँकेचे विद्यमान संचालक अरविंद पाटील यांना डीसीसी बँकेचे उमेदवार म्हणून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. ही निवडणूक बिनविरोध …

Read More »

चापगांव परिसरात अस्वलाची दहशत; वनखात्याने बंदोबस्त करावा

  शेतकऱ्यांचे जिल्हा मुख्य वनसंरक्षण अधिकाऱ्यांना निवेदन! खानापूर : चापगांव (ता.खानापूर) गावच्या परिसरात पिल्लासह एका अस्वलाचा वावर होत असून त्याच्यापासून शिवारात ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवाला धोका आहे. त्या अस्वलाचा बंदोबस्त करावा, अशा मागणीचे निवेदन चापगांव परिसरात शेतकऱ्यांनी माजी ग्राम पंचायत अध्यक्ष रमेश धबाले यांच्या नेतृत्वाखाली बेळगांव जिल्हा मुख्य वनसंरक्षण अधिकाऱ्यांना …

Read More »