खानापूर (प्रतिनिधी) : झुंजवाड के. एन. (ता. खानापूर) गावच्या शेतात ट्रॅक्टरने नांगरणीचे काम करत असताना रविवारी दि. २७ रोजी दुपारी बांधावरून ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टरखाली सापडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, झुंजवाड के. एन. येथील शेतकरी बसप्पा गणपती पाटील (वय ४६) हा रविवारी …
Read More »नंदगडात गवत गंजीला आग लागुन नुकसान
खानापूर (प्रतिनिधी) : सध्या कडक उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. त्यामुळे काही कारणाने आग लागण्याचे प्रकार वाढले आहेत. यात शेतकरी वर्गाच्या जनावरांच्यासाठी साठा केलेल्या शेतातील गवत गंज्याना आग लागण्याचे प्रकार दिसुन येत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गातून चिंतेच सावट पसरले आहे. असाच प्रकार रविवारी दि. २७ रोजी नंदगड (ता.खानापूर) गावच्या एपीएमसीच्या मागील …
Read More »रविवारी खानापूरात पोलिओ डोसचा शुभारंभ
खानापूर (प्रतिनिधी): तब्बल दोन वर्षानंतर आरोग्य खात्याच्यावतीने खानापूर सरकारी दवाखान्यात ५ वर्षाखालील बालकांना पोलिओ डोस देण्याचा शुभारंभ रविवार दि. २७ रोजी देण्यात आला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. संजीव नांद्रे, डॉ. तसमीन भानू, डॉ. प्रगती विनायक, डॉ. प्रेमा तोंडी, त्याचबरोबर नगरपंचायतीचे चीफ ऑफिसर बाबासाहेब माने, प्रेमानंद नाईक, एस. आर. पाटील, …
Read More »खानापूर तालुका विकास आघाडीकडून गस्टोळी कॅनलची पहाणी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील गस्टोळी येथील गेल्या सात आठ वर्षांपूर्वी शेतकरी वर्गाच्या पिकाला पाण्याची व्यवस्था व्हावी. यासाठी मंग्यानकोप ग्राम पंचायत हद्दीतील शिवाजी नगरातील गोमारी तलावाला जोडलेल्या गस्टोळी कॅनलची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र नुकताच गस्टोळी कॅनल हा कोसळला. त्यामुळे या भागातील शेतकरी वर्गाच्या पिकाच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. …
Read More »खानापूर तहसील कार्यालयाच्या आवारात अस्वच्छतेचे साम्राज्य
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याचे तहसील कार्यालय आणि त्याचा आवार म्हणजे अस्वच्छतेचे साम्राज्य बनले आहे. तहसील कार्यालयाच्या बाजुला असलेल्या माळ जागेत झाडे जुडपे वाढली आहेत. त्याच ठिकाणी तालुक्यातुन तहसील कार्यालयाच्या कामासाठी आलेल्या नागरिकाकडून उघड्यावर लघुशंका केली जाते. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या आवारात दुर्गंधी पसरली आहे. याचा परिणाम तहसील कार्यालयावर तसेच कामासाठी …
Read More »हुतात्मा कै. नागाप्पा होसुरकर यांच्या पत्नीची खानापूर म. ए. समितीकडून विचारपूस
खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक – महाराष्ट्र सीमाप्रश्न चळवळीत १९५६च्या आंदोलनात आहुती दिलेले हुतात्मा कै. नागाप्पा होसुरकर यांच्या पत्नी श्रीमती नर्मदा नागाप्पा होसुरकर यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. निडगल मुक्कामी माहेरगावी त्यांचे वास्तव्य आहे, गेले अनेक दिवस त्या अंथरुणाला खिळून आहेत. ही बातमी समजल्यानंतर खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष …
Read More »तालुक्यातील ८० दिव्यांग मुलांची आरोग्य तपासणी संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर लायन्स क्लब आणि श्री जनरल हाॅस्पिटल खानापूर यांच्या सौजन्याने तालुक्यातील ८० दिव्यांग मुलांची आरोग्य तपासणी नुकताच संपन्न झाली. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष एम. जी. बेनकट्टी यांनी डाॅ. कविता मुजूमदार, डाॅ. राधाकृष्ण हारवाडेकर, डाॅ. अजित हुंडेकर, डाॅ. अभिषेक मुगरवाडी, डाॅ. प्रताप, तसेच नितीन मुजूमदार आदीचे पुष्पहार घालुन …
Read More »खानापूरातील रस्त्याच्या बाजूचा कचरा अन्यत्र हलवावा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरासह व तालुका अंतर्गत येणाऱ्या खानापूर कोर्टपासून शांतीसागर हॉटेलपर्यंत दोन्ही बाजूच्या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात कचरा आहे. त्यामुळे गांधी नगर, हुडको कॉलनी, हलकर्णी, हिंदूनगर ग्रामस्थ व या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना या रस्त्यावरील कचऱ्यामुळे व दुर्गंधीमुळे त्रास होत आहे. शिवाय या कचऱ्यामुळे माणसांच्या आरोग्यावरही …
Read More »खानापूरात हर्ष हत्येच्या निषेधार्थ तहसीलदारांना निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : रविवारी शिमोगा जिल्ह्यात बजरंगदलचा कार्यकर्ता हर्ष याचा खून करण्यात आला. खून करणार्याचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी खानापूर तालुका बजरंगदल, विश्व हिंदू परिषद, हिंदूस्थान संघटना, तसेच भाजप आदींनी बजरंगदल तालुका अध्यक्ष नंदकुमार निट्टूरकर यांच्या नेतृत्वाखाली उपतहसीलदार के. वाय. बिद्री यांना निवेदन सादर केले. …
Read More »समितीच्या ध्येय धोरणाशी प्रतारणा करणाऱ्यांना एकीने देणार उत्तर
खानापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ध्येय धोरणाशी प्रतारणा करणाऱ्या माजी आमदार अरविंद पाटील यांना एकीने उत्तर देण्याचा निर्धार करून निषेध खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या बैठकीत नोंदवण्यात आला. तसेच मार्च महिन्यात मराठी नाही तर टोल नाही हे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीमाप्रश्न आणि इतर विषयांवर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta