Tuesday , March 3 2026
Breaking News

खानापूर

मणतुर्गे येथील श्री देव रवळनाथ मंदिराचा कळस स्लॅब भरणे समारंभ उत्साहात संपन्न

  खानापूर : खानापूर तालुक्यातील मणतुर्गे येथील श्री देव रवळनाथ मंदिराचा कळस स्लॅब भरणे समारंभ शुक्रवार दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे वतनदार श्री. बाबुराव गणपतराव पाटील- माजी अध्यक्ष के.एम. एफ. हे होते. प्रास्ताविक रवळनाथ मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष श्री. आबासाहेब दळवी यांनी केले. मंदिराच्या कळसाचे …

Read More »

प्रेयसीची चाकूने वार करून केली हत्या; प्रियकराचीही आत्महत्या!

  खानापूर : प्रियकराने आपल्या प्रेयसीची चाकूने वार करून हत्या करून स्वतःवरही चाकूने वार करून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना खानापूर तालुक्यातील बीडी गावात घडली. या धक्कादायक घटनेने संपूर्ण गाव हादरले आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, मृत महिला रेश्मा तिरवीर (वय 29, रा. बीडी) व आरोपी प्रियकर आनंद सुतार हे …

Read More »

युवा स्पोर्ट्स हलशीवाडी यांच्यावतीने सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन

  खानापूर : शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी युवा स्पोर्ट्स हलशीवाडी यांच्यावतीने शुक्रवारी (ता. १५) रोजी दुपारी साडे तीन वाजता विठ्ठल मंदिर येथे हलशी ग्रामपंचायत क्षेत्रातील शाळा व गुंडपी गावातील विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा इयत्ता चौथी ते पाचवी, सहावी ते सातवी व आठवी ते दहावी या …

Read More »

खानापूरमध्ये घरफोडी प्रकरणी दोघांना अटक; कारागृहात रवानगी

  खानापूर : खानापूरमध्ये सलग दोन ठिकाणी घडलेल्या घरफोडीप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत दोघा चोरट्यांना अटक केली. चोरीस गेलेले सोन्याचे दागिनेही हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. खानापूर येथील मराठा मंडळ डिग्री कॉलेजसमोर राहणाऱ्या रेखा क्षीरसागर यांच्या घरी कोणीही नसताना कुलूप तोडून चोरट्यांनी घरफोडी केली. या वेळी त्यांनी ६०.०५ ग्रॅम सोन्याचे दागिने …

Read More »

खानापूरात सतरा वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

  खानापूर : खानापूर शहराच्या बहारगल्लीतील एका १७ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी दुपारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली.रोहन हेब्बाळी (वय १७ रा.बहारगल्ली, ता. खानापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेची माहिती त्याच्या कुटुंबियांना कळताचं त्यांनी तात्काळ रोहनला खानापूर सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र, …

Read More »

खानापूर तहसील कार्यालयाची लोकायुक्तांकडून पाहणी

  खानापूर : खानापूरमधील तहसील कार्यालयासह उपनिबंधक कार्यालय आणि एम.सी.एच. रुग्णालयाला लोकायुक्त न्यायमूर्ती सी. एस. पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अचानक भेट दिली. या पथकाने कार्यालयांच्या कामकाजाची आणि व्यवस्थेची पाहणी केली. लोकायुक्त पथकाने सरकारी कार्यालयात नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, कार्यालयातील एकूण व्यवस्था आणि इतर महत्त्वाच्या विषयांसंदर्भात अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी बेळगाव …

Read More »

विहिरीत पाय घसरुन पडल्याने सोसायटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

  खानापूर : खानापूर तालुक्यातील इदलहोंड येथील ३६ वर्षीय दिग्विजय मनोहर जाधव या तरुणाचा आपल्या शेतातील विहिरीत पाय घसरुन पडल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज गुरुवारी सकाळी उघडकीस आली. दिग्विजय जाधव हे गर्लगुंजी येथील पिसेदेव सोसायटी शाखेत लिपिक पदावर कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, दिग्विजय जाधव आज सकाळी ६ वाजल्यापासून बेपत्ता …

Read More »

कन्नडसक्ती विरोधी मोर्चासंदर्भात माचीगड, कापोली आदी भागात जनजागृती….

  खानापूर : मराठीच्या रक्षणासाठी तालुक्याच्या प्रत्येक गावातून मोर्चात मराठी भाषिकांनी प्रचंड संख्येने सहभागी व्हावे यासाठी अनेक ठिकाणी जनजागृती केली जात आहे त्याला सर्वच ठिकाणी मोठा प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे मोर्चा यशस्वी होईल असे प्रतिपादन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे. मध्यवर्ती समितीतर्फे सोमवारी कन्नड …

Read More »

कन्नडसक्ती विरोधी मोर्चास मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; नंदगड येथे जनजागृती

  खानापूर : कर्नाटक सरकारकडून सीमाभागात कन्नडसक्ती तीव्र करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे मराठी भाषिकांच्या घटनात्मक अधिकारांवर कर्नाटक प्रशासन एक प्रकारे गदा आणत आहे. भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार मराठी भाषिकांना कन्नडसह मराठीतही शासकीय परिपत्रके मिळण्याचा अधिकार आहे परंतु कर्नाटक सरकार बेकायदेशीररित्या सीमाभागात कन्नडसक्ती करत आहे. या विरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या …

Read More »

नंदगड येथे सात वर्षीय बालकाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू

  खानापूर : सर्पदंशाने सात वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कुंभार गल्ली नंदगड येथे घडली आहे. वेदांत असे या दुर्दैवी बालकांचे नाव आहे. वेदांत हा घरात झोपला असता अंथरुणातच त्याला सर्पदंश झाला. ही बाब कुटुंबीयांना समजताच वेदांतच्या कुटुंबीयांनी त्याला तात्काळ उपचारासाठी बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचाराचा …

Read More »