खानापूर : नंदगडमध्ये ४ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ६८ वर्षीय नराधमाला न्यायालयाने २० वर्षांची सक्तमजुरी आणि १० हजारांचा दंड ठोठावला आहे. ही संतापजनक घटना २४ फेब्रुवारी २०२४ रोजी नंदगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. निसार अहमद फक्रू साब चापगावी (वय ६८, रा. काकर गल्ली, नंदगड) याने चॉकलेटचे आमिष …
Read More »सात महिन्यापासून बेपत्ता असलेल्या इसमाचा मृतदेह सापडला भूतनाथ डोंगरावर!
खानापूर : गेल्या सात महिन्यापासून बेपत्ता असलेले झाडअंकले येथील रहिवासी मारुती उसुरलकर (वय वर्षे 75) यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत भूतनाथ येथील डोंगरावर सांगाड्याच्या स्वरूपात सापडला आहे. मृतदेहाची प्राथमिक ओळख त्यांच्या मृतदेह शेजारी असलेल्या चप्पल, छत्री व गळ्यातील वारकरी माळ यावरून पटविण्यात आली आहे. मात्र सरकारी नियमाप्रमाणे डीएनए परीक्षण …
Read More »गाडीकोप खून प्रकरणाचा २४ तासात छडा : आरोपीला शिवमोग्गातून अटक
खानापूर : बेळगावमधील खानापूर तालुक्यात दगडाने ठेचून करण्यात आलेल्या भीषण हत्येप्रकरणी पोलिसांनी शिवमोग्गा मधून एका आरोपीला अटक केली आहे. बलोगा, तालुका खानापूर येथील शिवनगौडा इरनगौडा पाटील (वय ४७) या इसमाची दगडाने ठेचून निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. सदर व्यक्तीचा मृतदेह खानापूर ते एम. के. हुबळी रस्त्यावरील गडीकोप गावानजीक असणाऱ्या …
Read More »विद्युत तारेच्या स्पर्शाने इदलहोंड येथे 9 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू
खानापूर : विद्युत तारेच्या स्पर्शाने 9 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील इदलहोंड येथे घडली. बुधवारी (2 एप्रिल) सायंकाळी 5.45 वाजता ही दुर्घटना घडली. मनाली मारुती चोपडे (वय 9) असे मृत मुलीचे नाव आहे. इदलहोंड आणि सिंगिनकोप या लागून असलेल्या गावांजवळ मारुती चोपडे यांचे घर आहे. त्यांच्या …
Read More »खानापूर तालुक्यातील गाडीकोप येथे एकाचा दगडाने ठेचून खून
खानापूर : खानापूर – एम. के. हुबळी मार्गावरील गाडीकोप रस्त्याला लागून असलेल्या शेतवडीत खानापूर तालुक्यातील बलोगा येथील शिवनगौडा इरनगौडा पाटील (वय 48) यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना काल दिनांक 1 एप्रिल रोजी घडली आहे. मयत शिवनगौडा याचा भाऊ सन्नगौडा पाटील यांनी याबाबत खानापूर पोलीस स्थानकात तक्रार दिली …
Read More »मणतुर्गे (ता. खानापूर) येथील श्री रवळनाथ मंदिराच्या चौकटीचे आगमन…
खानापूर : मणतुर्गे (ता. खानापूर) येथे गुढीपाडव्या निमित्त श्री रवळनाथ मंदिराच्या चौकटीचे आगमन सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी सकाळी ठीक १० वाजता श्री सातेरी माउली मंदिर येथे झाले. नुतन चौकटीचे औक्षण गावांतील वतनदार सौ. व श्री. नागेश विठ्ठल पाटील, सौ. व श्री. ज्योतिबा दत्तू गुरव, सौ. व श्री. …
Read More »हुतात्मा भवन भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे खानापूर समितीचे आवाहन
खानापूर : स्मारकाच्या जागे मध्ये बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुढाकाराने हुतात्मा भवन उभारणी करण्यात येणार आहे. याचा भूमिपूजन सोहळा ३० मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न होणार आहे. प्रसिद्ध सिव्हिल इंजीनियर आणि बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले यांच्या हस्ते भूमिपूजन होणार …
Read More »डिजिटल अटकेच्या भीतीने दाम्पत्याने संपविले जीवन; बिडी येथील धक्कादायक घटना
खानापूर : सायबर गुन्हेगारांनी व्हिडिओ कॉलवरून नग्न फोटो असल्याचे सांगून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याने एक वृद्ध दाम्पत्य आत्महत्येस प्रवृत्त झाल्याची धक्कादायक घटना खानापूर तालुक्यातील बिडी येथे घडली आहे. वृद्ध रेल्वे निवृत्त कर्मचारी डिएगो नझरेथ (83) आणि त्यांची पत्नी पाविया नझरेथ (79) यांनी आत्महत्या केली. गेल्या महिन्याभरापासून हे दाम्पत्य सायबर …
Read More »खानापूर येथील एका हॉटेल आवारातील कुत्र्याच्या हल्ल्यात एक जखमी
खानापूर : खानापूर शहरातील एका सुप्रसिद्ध हॉटेलमध्ये शहापूर येथील विनायक मेलगे (वय वर्षे 40) हे जेवणासाठी गेले होते. त्यांच्यावर त्याच हॉटेलच्या आवारात बसलेल्या कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केल्याची घटना 23 मार्च रोजी रात्री खानापूर -गोवा मार्गावरील एका नामांकित हॉटेल आवारात घडली आहे. सदर घटनेनंतर जखमी विनायक यांना त्याच्याच नातेवाईकांनी …
Read More »मणतूर्गा गावानजीक चारचाकी वाहनावर अज्ञाताकडून दगडफेक….
खानापूर : मणतूर्गा गावानजीक सोमवारी मध्यरात्री चारचाकी वाहनावर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. सोमवार दिनांक 24 मार्च 2025 रोजी अज्ञात व्यक्तीने रस्त्यावरून जाणाऱ्या चारचाकी गाडीवर दगडफेक केल्याने मणतूर्गा भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतची सविस्तर माहिती पोलिसांना कळविताच तात्काळ पोलिसांची 112 क्रमांकाची गाडी घटनास्थळी दाखल झाली व घटनेची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta