Thursday , June 4 2026
Breaking News

खानापूरच्या जनतेला “इंदिरा कॅन्टीन”चा लाभ : माजी आमदार, एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई निंबाळकर

Spread the love

 

खानापूर : काँग्रेस सरकार नेहमीच गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी जनतेसाठी नवनवीन उपक्रम राबवत असते. यातून सरकारची जनतेप्रती असलेली बांधिलकी असते. इंदिरा कॅन्टीन ही संकल्पना सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना काँग्रेस सरकारने कर्नाटक राज्यात 2013 ते 2018 या काळात सुरू केलेला प्रकल्प आहे. खानापूर तालुक्यात इंदिरा कॅन्टीन सुरू करण्यासंदर्भात 2018 ते 2023 या काळामध्ये भाजप सरकारला तत्कालीन आमदार डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांनी विनंती केली होती. मात्र तत्कालीन भाजप सरकारने याकडे लक्ष दिले नाही पण 2023 मध्ये पुन्हा काँग्रेस सरकार सत्तेत येताच हा प्रकल्प पुन्हा सुरू झाला आणि प्रत्येक तालुक्यात इंदिरा कॅन्टीनचे काम सुरू झाले. उद्या दिनांक 21 जून रोजी खानापूर येथे इंदिरा कॅन्टीनचे उद्घाटन होणार आहे. सदर कार्यक्रमास खानापूर तालुक्याच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉक्टर अंजलीताई हेमंत निंबाळकर या परदेशी असल्यामुळे उपस्थित राहू शकणार नाही. परंतु त्यांनी उद्याच्या होणाऱ्या कार्यक्रमासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना माजी आमदार डॉक्टर अंजलीताई निंबाळकर म्हणाल्या की, आज मला आनंद होत आहे की, खानापूरच्या जनतेला इंदिरा कॅन्टीनचा फायदा होणार आहे. विशेषतः शेतकरी, ग्रामस्थ, कर्मचारी, ऑटो रिक्षा चालक, रुग्णालयातील रुग्ण व तालुकास्तरीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना याचा उपयोग होणार आहे. लोकांसाठी स्वस्त निरोगी व स्वच्छ अन्न इंदिरा कॅन्टीनच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. खानापूर तालुक्यातील जनतेने इंदिरा कॅन्टीनचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील त्यांनी आपल्या शुभेच्छा पत्रात केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध गोहत्या रोखण्यासाठी कडक उपाययोजना करा

Spread the love  खानापूर : खानापूर तालुक्यातील विविध हिंदू संघटना, धार्मिक संस्था, सामाजिक संघटना तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *