खानापूर : सत्तेत असताना जिल्ह्यासाठी आवश्यक अश्या मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल उभारणीसाठी हेगडे कागेरी यांनी अधिवेशनात एकदाही प्रश्न उपस्थित केला नाही. वर्षानुवर्ष स्वतःकडे मंत्री पद असून देखील स्वतःच्या मतदारसंघाचा विकास ज्यांना करता आला नाही ते आता विकासाची भाषा बोलत आहेत. सहा वेळा आमदार, अनेक वर्षे मंत्रीपद, विधानसभेचे अध्यक्ष अशी महत्त्वपूर्ण पदे …
Read More »दुचाकी अपघातात खानापूर पोलीस स्थानकाचे कॉन्स्टेबल ठार
खानापूर : लोकोळी कत्री आणि जैनकोप कत्रीच्या मध्ये असलेल्या उतारतीला सोमवारी रात्री दुचाकीला अपघात होऊन झालेल्या घटनेत खानापूर पोलीस स्थानकाचे पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप बसवराज मिटगार (वय 28) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, खानापूर पोलीस स्थानकात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप बसवराज मिटगार, …
Read More »शेतकरी विरोधी भाजपला सत्तेपासून दूर ठेवा : डॉ. अंजलीताई निंबाळकर
खानापूर : आपल्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक देणारे केंद्र सरकार पूर्णतः शेतकरी विरोधी आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचे काम केले. ज्यांना शेतकऱ्यांच्या घामाची कदर नाही अशा शेतकरी विरोधी भाजपला सत्तेपासून दूर ठेवा, असे आवाहन डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी केले. डॉ. निंबाळकर यांनी रविवारी (दि. २१) …
Read More »जोयडा तालुक्यातील बाळनी व कुंभारवाडा येथे समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांचा प्रचार
खानापूर : कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचाराला मोठी गती मिळाली असून विविध भागात कार्यकर्त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळण्यास सुरुवात केली आहे. जोयडा तालुक्यातील बाळनी व कुंभारवाडा येथे सरदेसाई यांचा प्रचार करण्यात आला यावेळी परिसरात मोठ्या उत्साहाने उमेदवार सरदेसाई यांचे स्वागत करण्यात आले. …
Read More »समितीच्या अस्तित्वाचा लढा जिंकावा लागेल; निरंजन सरदेसाई यांच्या कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन
खानापूर : समितीच्या अस्तित्वाचा लढा जिंकावा लागणार आहे त्यामुळे मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी प्रत्येकाने जबाबदारी घ्यावी, असे प्रतिपादन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी केले आहे. कारवार लोकसभा मतदार संघातील समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या खानापूर येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन रविवारी सीमा सत्याग्रही शंकर पाटील, …
Read More »डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आज खानापूर तालुक्याचा दौरा
खानापूर : उत्तर कन्नड (कारवार) लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर आपल्या प्रचारार्थ उद्या रविवार दि. २१ रोजी खानापूर तालुक्यातील काही प्रमुख गावांना भेट देणार आहेत. सकाळी ९.३० वाजता पहिली भेट तोलगी या गावी नंतर सकाळी १०.३० वाजता गंदिगवाड, दुपारी १२ वाजता – सुरपूर केरवाड, दुपारी १ वाजता …
Read More »नेहा हिरेमठ हिच्या मारेकऱ्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे : डॉ. अंजलीताई निंबाळकर
कित्तूर : हुबळी -धारवाड महानगरपालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक यांची कन्या नेहा हिरेमठ हिच्या मारेकऱ्याला कठोर शिक्षा व्हावी व तिच्या आत्म्यास चिरशांती लाभावी यासाठी चिक्क बागेवाडी येथे डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कँडल मोर्चा काढून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना डॉ. अंजलीताई निंबाळकर म्हणाल्या की, नेहा हिरेमठ हिची निर्घृण हत्या ही …
Read More »मराठा समाजाने राजकारण बाजूला ठेवून डॉ. अंजलीताई निंबाळकर यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे
खानापूर : सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन मराठा समाजाचा खासदार दिल्लीत पाठवा. मागील 30 वर्षे भाजप खासदारांनी फक्त मतांचा जोगवा मागण्यासाठीच खानापूर तालुक्याचे दौरे केले आहेत आणि खानापूर तालुक्याच्या विकासाकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच आज भारतीय जनता पार्टीकडे मोदींच्या नावाने मते मागण्यावाचून पर्याय राहिला नाही. विकासाभिमुख असे कोणतेच उत्तर भारतीय …
Read More »खानापूर तालुक्यात निरंजन सरदेसाई यांना वाढता पाठिंबा
खानापूर : मराठी भाषा संस्कृतीच्या अस्मितेसाठी सर्वांनी एकत्र येणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे मराठी भाषिकांनी आपली ताकद दाखवून द्यावी तसेच प्रत्येकाने आपण स्वतः हा उमेदवार समजून काम करावे तसेच कारवार लोकसभा मतदार संघातील समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांना विजयी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी, अशी आवाहन खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष …
Read More »कित्तूर तालुक्यातील एक ही मत भाजपला मिळणार नाही : आमदार बाबासाहेब पाटील
कित्तूर : कित्तूर तालुकावासीयांनी यावेळी एकही मत भाजपला न देण्याचा निर्धार केला आहे. काँग्रेसच्या योजनांचा लाभ लोकांना होत आहे. यंदा दुष्काळ पडला असतांनाही केवळ काँग्रेस सरकारच्या योजनांमुळे गरीबांच्या घरातली चूल पेटत आहे, त्यामुळे काँग्रेसच्या डॉ. अंजली निंबाळकर यांनाच मतदान करणार, असे जनतेचे म्हणणे असल्याची माहिती आमदार बाबासाहेब पाटील यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta