खानापूर : शाळा ही आई-वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि भविष्याची वाट दाखविणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी कधीही विसरू शकत नाही हे माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळावा घेऊन दाखवून दिले असून माजी विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून शाळेच्या विकासासाठी पुढे आल्यास शाळांच्या अधिक प्रमाणात …
Read More »राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी जांबोटी येथील माध्यमिक विद्यालयाच्या श्रावणी पाटील हिची निवड
खानापूर : जांबोटी येथील माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. श्रावणी भरणानी पाटील हिची कुस्ती या क्रीडा प्रकारात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. शिक्षण खात्याच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धेत श्रावणीने 61 किलो वजन गटात तालुक्यात आपले प्रावीण सिद्ध केले होते. जिल्हास्तरीय स्पर्धेत …
Read More »टेनिस हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी मराठा मंडळ ताराराणी कॉलेजच्या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय निवड
खानापूर : मराठा मंडळ ही शिक्षण संस्था क्रीडा स्पर्धेत खेळाडू विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन देणारी शिक्षण संस्था म्हणून बेळगावच्या शैक्षणिक वलयात सुपरिचित आहे. “चिन हा देश जगातील उत्तम खेळाडू तयार करणारा देश आहे कारण तिथे मुलांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षी खेळाच्या कल चाचण्या केल्या जातात म्हणजेच खेळाचे बाळकडू तेथील विद्यार्थ्यांना अगदी …
Read More »विद्यार्थी घडवणे हाच शिक्षकांचा खरा सन्मान : माजी महापौर मालोजी अष्टेकर
खानापूर : शिक्षकानी विद्यार्थ्याना पुस्तकी ज्ञान देण्या अगोदर विद्यार्थ्याचा चेहरा वाचता आला पाहिजे. कारण समाजात शिक्षकाला वेगळं स्थान आहे. तेव्हा विद्यार्थी घडविताना विद्यार्थ्याच्या परिस्थितीची जाणीव करून आदर्श विद्यार्थी घडविले तर विद्यार्थ्यात शिक्षक आदर्श राहतो. याच शिक्षकाना आदर्श शिक्षक म्हणतात. ऐवढेच नव्हे तर सेवा निवृत्तीनंतरही विद्यार्थ्याच्या नजरेत आदर्श शिक्षकच दिसला …
Read More »मणतुर्गे येथील श्री रवळनाथ मंदिराचा लिंटल भरणी कार्यक्रम संपन्न
खानापूर : मणतुर्गे तालुका खानापूर येथील श्री रवळनाथ मंदिराच्या जिर्णोद्धार करण्यासाठी १४/०९/२०२४ रोजी लिंटल भरणी कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे वतनदार श्री. प्रकाश नारायण पाटील होते. श्री रवळनाथाचे पुजन गावचे पुजारी श्री. पांडुरंग कृष्णाजी गुरव यांच्या हस्ते करण्यात आले तर गणेश पुजन श्री. कल्लाप्पा नारायण देवकरी यांच्या हस्ते …
Read More »खानापूरवासीयांना सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणार : मंत्री दिनेश गुंडूराव
खानापूर येथील एमसीएच हॉस्पिटलचे उद्घाटन आणि १०० खाटांच्या सार्वजनिक इस्पितळाचे भूमिपूजन खानापूर : तालुक्यातील जनतेला सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 60 खाटांचे माता-शिशु रुग्णालय बांधण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 100 खाटांचे तालुका रुग्णालयही लवकरात लवकर बांधण्यात येईल, असे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडूराव यांनी सांगितले. जिल्हा प्रशासन, …
Read More »लोकोळी येथील लक्ष्मी मंदिरात चोरी!
खानापूर : खानापूर तालुक्यातील लोकोळी येथील लक्ष्मी मंदिरात काल रात्री चोरी झाली असून लक्ष्मी देवीच्या सोन्याच्या 16 पुतळ्या, तसेच 40 ते 50 तोळा चांदीचे दागिने, कमरपट्टा व इतर, सोन्या चांदीचा किमती ऐवज चोरीला गेला आहे. त्याची किंमत अडीच लाखापर्यंत आहे. आज सकाळी पुजाऱ्याच्या व ग्रामस्थांच्या लक्षात आली. खानापूर पोलीस स्थानकाला …
Read More »कर्नाटकचे आरोग्यमंत्री सन्माननीय दिनेश गुंडूराव जिजाऊ मंडळाच्या गणरायाच्या चरणी…
खानापूर : आज कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव, शिवस्मारक चौकातील जिजाऊ गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाच्या दर्शनास पोचले.. डॉ अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी आरोग्यमंत्र्यांना आमच्या गणपती मंडळास भेट देण्याची विनंती केली असता मा. मंत्री महोदयांनी लगेच होकार दर्शविला. आरोग्य मंत्र्याच्या हस्ते गणरायाची आजची आरती संपन्न झाली. जिजाऊ गणेशोत्सव मंडळाच्यावतीने सन्माननीय दिनेश गुंडूराव …
Read More »60 खाटांच्या माता व बाल रुग्णालयाचे उद्घाटन व 100 खाटांच्या रुग्णालय इमारतीचा पायाभरणी कार्यक्रम उद्या
खानापूर : जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत बेळगाव तसेच जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने खानापुर शहरात राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत बांधण्यात आलेल्या 60 खाटांचा माता व बाल रुग्णालयाच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ आणि नाबार्ड RIDF-30 योजनेंतर्गत 100 खाटांच्या तालुका रुग्णालयाच्या नवीन इमारत बांधकामाचा पायाभरणी समारंभ उद्या …
Read More »खानापूर समितीच्यावतीने रविवारी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मान
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने रविवारी (ता. १५) शिवस्मारक येथे सकाळी अकरा वाजता जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले शिक्षक व आदर्श शाळांचा सन्मान केला जाणार आहे. दरवर्षी समितीच्यावतीने मराठी माध्यमाच्या शिक्षकांचा सन्मान केला जातो. यावर्षीही शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेल्या शिक्षक व …
Read More »