खानापूर : मुलगा हा वंशाचा दिवा असतो. मृत्यूनंतर मुलाने मुखाग्नी दिली तरच मोक्ष प्राप्त होतो. अश्या बुरसटलेल्या विचारांना बगल देत आपल्या मृत आईवर मुलीने अंत्यसंस्कार केल्याची घटना खानापूर तालुक्यातील करंबळ येथे नुकतीच घडली. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की मूळच्या करंबळ येथील व सध्या कारलगा येथील रहिवासी प्रभावती शंकर कवळेकर …
Read More »करंबळ, बेकवाड गावची महालक्ष्मी जत्रा मोठ्या उत्साहात
खानापूर : खानापूर तालुक्यातील करंबळसह होनकल, जळगे, रूमेवाडी, कौंदल महालक्ष्मी यात्रेला उत्साहात सुरुवात झाली असून आज बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 7.01 वाजता पाच गावचे ग्रामस्थ, नातेवाईक, तसेच खानापूर व तालुक्यातील भाविकांच्या उपस्थितीत अक्षतारोपणाने महालक्ष्मी यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी करंबळ, कौंदल, होनकल, जळगे, रूमेवाडी, खानापूर …
Read More »कुंभार कुटुंब पत्रिका भरण्याचे आवाहन : शिवस्मारकात कुंभार समाजाची बैठक संपन्न
खानापूर : दि. संत गोरा कुंभार समाज विकास मंडळ सदस्य व समन्वयकांची बैठक रविवार (दि.25) रोजी शिवस्मारक येथे दि. संत गोरा कुंभार समाज विकास मंडळाचे अध्यक्ष भैरु कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीच्या प्रारंभ दि. संत गोरा कुंभार समाज विकास मंडळाचे सचिव परशराम पालकर यांनी प्रास्ताविकेत गतबैठकीचा आढावा घेत …
Read More »बेळगाव – चोर्ला – गोवा महामार्ग दुरुस्तीला प्रारंभ
मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याहस्ते उद्घाटन खानापूर : बेळगाव आणि गोवा यांच्यातील महत्त्वाचा दुवा असलेल्या बेळगाव-चोर्ला-गोवा सीमेपर्यंतच्या राज्य महामार्ग ७४८ -अ च्या दुरुस्तीला आज सुरुवात झाली. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याहस्ते कणकुंबी (ता. खानापूर) येथे या दुरुस्ती कामाचे उद्घाटन करण्यात आले. या ४३ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या …
Read More »बिडी-कित्तूर रस्त्यावर भीषण अपघात; 6 जण जागीच ठार
खानापूर : खानापूर तालुक्यातील बिडी-कित्तुर रस्त्यावर कार झाडावर आढळल्याने कारमधील 6 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. मारुती स्विफ्ट कंपनीच्या डिझायर कार मधुन एकूण दहा जण प्रवास करत होते. बिडी जवळील गोल्याळी गावातील आपल्या नातेवाईकांकडे वालीमा कार्यक्रमासाठी जात असताना ही घटना घडल्याचे समजते, याबाबतची …
Read More »छत्रपती शिवाजी विद्यामंदिर हायस्कूल हलशी येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ व स्नेहसंमेलन
खानापूर : विद्यार्थ्यांनी आयुष्यात ध्येय ठेवून समोर जाणे गरजेचे असून तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या प्रकारे केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करून स्वावलंबी बनले पाहिजे असे प्रतिपादन एल. आय. देसाई यांनी केले आहे. हलशी येथील छत्रपती शिवाजी विद्या मंदीर हायस्कूलमधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि स्नेह संमेलन कार्यक्रम गुरूवारी पार …
Read More »‘ते’ अतिक्रमण त्वरित हटवा; चन्नेवाडी ग्रामस्थांची मागणी
खानापूर : चन्नेवाडी ता. खानापूर येथील ग्रामस्थांनी दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी कसबा नंदगड ग्राम पंचयातीचे विकास अधिकारी (पीडिओ) व अध्यक्ष यांचेकडे एका शौचालयाचे अनधिकृत बांधकाम हटविण्याची मागणी केली आहे. ग्रामपंचायतीला दिलेल्या निवेदनात गावकऱ्यांनी असे म्हटले आहे की, श्री. मल्लाप्पा नारायण पाटील व श्री. वसंत निंगाप्पा पाटील यांच्या दोन्ही …
Read More »चिखले धबधब्याच्या दरीत पडलेल्या व्यक्तीची सुखरूप सुटका
खानापूर : खानापूर-गोवा सीमेवरील चिखले गावातील चिखले धबधबा पाहण्यासाठी बेळगाव कॅम्पमधील विनायक, दर्शन आणि विनय हे तिघे जण आज दुपारी अडीच वाजता आले होते. त्यावेळी 20 वर्षीय विनायक सुनील बुथुलकर हा धबधब्याच्या वरच्या बाजूने दुचाकीवरून जात असताना दुचाकीसह 100 फूट उंच कड्यावरून खाली दरीत पडला. सुदैवाने तो बचावला असून …
Read More »बेटणेनजीक वाळू टिप्पर पलटी; चालक ठार
खानापूर : जांबोटी ते कणकुंबी दरम्यान राज्यमार्गावर रस्त्यावरील खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण चुकल्याने वाळू भरून गोव्याला जाणारा टिप्पर पलटी झाल्याने त्याखाली सापडून टिप्परचा मालक जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली आहे. या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव गजानन विष्णू चौगुले रा. गणेबैल (वय 24) असे आहे. याबाबत …
Read More »खानापूरात मराठी प्रतिष्ठानची सामान्यज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा 25 रोजी
खानापूर : मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी सामान्यज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन केले जाते. यंदा ही परीक्षा शनिवार ता. 25 फेब्रुवारीला होणार असून तालुक्यातील विध्यार्थ्यानी परीक्षेत सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर यांनी केले आहे. सदर परीक्षा प्राथमिक आणि माध्यमिक अश्या दोन गटात होणार आहे. परीक्षेला 10 वाजता खानापूरातील रावसाहेब …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta