खानापूर : मौजे मणतुर्गे तालुका खानापूर येथे ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदिराचा कॉलम भरणी कार्यक्रम शनिवार दिनांक २७ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० वाजता गावचे वतनदार श्री. विलास गणपती पाटील व सौ. भाग्यश्री विलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. यावेळी श्री रवळनाथाचे पुजन गावचे पुजारी श्री. विष्णू गुंडू गुरव आणि सौ. लक्ष्मी विष्णू गुरव यांच्या हस्ते करण्यात आले तर दीपप्रज्वलन गावचे ज्येष्ठ नागरिक श्री. नारायण बाबाजी गुंडपीकर, श्री. वासुदेव आप्पाजी पाटील, श्री. विठोबा सातेरी देसाई, माजी जिल्हा पंचायत सदस्य श्री. विशाल अशोकराव पाटील आणि खानापूर अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकेचे चेअरमन श्री. अमृत महादेवराव शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कॉलम भरणी कार्यक्रम प्रगतशील शेतकरी सौ. पार्वती व श्री. महादेव बळवंत देसाई, सौ. अंकीता व श्री. राजाराम दत्तू पाटील, सौ. चंद्रभागा व श्री. लक्ष्मण यशवंत शेलार, सौ. प्रेमा व श्री. वसंत विठोबा गुंडपीकर सेवानिवृत्त मुख्याध्यापक, सौ. वैशाली व श्री. बाबाजी नारायण गुंडपीकर सेवानिवृत्त वनाधिकारी, सौ. शितल व श्री. हणमंत पुंडलिक देवकरी निवृत्त हेस्कॉम कर्मचारी, सौ. सुजाता व श्री. श्रीपाद महादेव देवकरी माजी ग्रामपंचायत सदस्य, सौ. विजया व श्री. मष्णू विठोबा चोर्लेकर जिल्हा आदर्श शिक्षक दांपत्य, सौ. जयश्री व श्री. कृष्णाजी नारायण देवलतकर सामाजिक कार्यकर्ते, सौ. सीमा व श्री. विठ्ठल कृष्णाजी देवकरी निवृत्त सुभेदार, श्री. तुकाराम बाबाजी गुंडपीकर, श्री. गुंडू पुण्णाप्पा गावडे निवृत्त मुख्याध्यापक, श्री. महादेव व्यंकाप्पा गावडे निवृत्त मुख्याध्यापक, श्री गंगाराम नारायण देवलतकर निवृत्त मुख्याध्यापक, श्री. वसंत भरमाणी देवलतकर निवृत्त हेस्कॉम कर्मचारी, श्री. रामचंद्र यशवंत भटवाडकर निवृत्त हेस्कॉम कर्मचारी, श्री. नारायण महादेव पाटील निवृत्त हेस्कॉम कर्मचारी, श्री. शिवराम मष्णू पाटील निवृत्त हेस्कॉम कर्मचारी, श्री. नारायण गुंडु पाटील उद्योजक पुणे, श्री. प्रकाश नारायण गुरव निवृत्त पोस्टमन, श्री. नागेश सातेरी पाटील निवृत्त कर्मचारी मराठा मंडळ महाविद्यालय, श्री. अर्जुन नामदेव देवकरी सेवानिवृत्त जवान,
श्री. गोपाळ मुरारी पाटील मध्यवर्ती म ए समिती सदस्य गर्लगुंजी या सर्वांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. आबासाहेब नारायणराव दळवी अध्यक्ष श्री रवळनाथ मंदिर जीर्णोद्धार कमिटी यांनी केले, तर स्वागत श्री. प्रकाश नारायण पाटील जीर्णोद्धार कमिटीचे सदस्य यांनी केले. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य श्री. विशाल अशोकराव पाटील, खानापूर अर्बन बँकेचे चेअरमन श्री. अमृत महादेवराव शेलार, लैला शुगरचे मॅनेजर श्री. बाळासाहेब शेलार, श्री. वसंत विठोबा गुंडपीकर सेवानिवृत्त मुख्याध्यापक, श्री. मष्णू विठोबा चोर्लेकर जिल्हा आदर्श शिक्षक, श्री. कृष्णाजी नारायण देवलतकर सामाजिक कार्यकर्ते यांनी मंदिर उभारणी संदर्भात मौलीक विचार मांडले. कार्यक्रमाचे नियोजन यशस्वी होण्यासाठी जिर्णोद्धार कमिटी सदस्य, पंचकमिटी व ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी अनेकांनी मंदिरासाठी १ लाख ४१ हजार रुपयांची भरघोस देणगी दिली. कार्यक्रमाचे आभार श्री. आबासाहेब नारायणराव दळवी यांनी मानले.