Sunday , December 7 2025
Breaking News

चिकोडी

कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेकडून सदलग्यात रास्तारोको

  सदलगा : येथील छ. शिवाजी महाराज चौक येथे सकाळी ९.३० वाजल्यापासून कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि आणखी एका संघटनेच्याकडून तीन तास रास्तारोको करुन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोठमोठ्यांदा घोषणाबाजी केली. रायबागकडून जवाहर साखर कारखान्यांकडे जाणाऱ्या उसाचे ट्रॅक्टर आणि आणखीही महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडे जाणारे उसाचे सुमारे ३५ ते ४० ट्रॅक्टर आणि …

Read More »

सदलग्यातील पदपथाचा (फूटपाथचा) वापर मेंढरांकडून; शालेय विद्यार्थ्यांचे फूटपाथकडे दुर्लक्ष

  सदलगा : हे आहे एक अत्यंत मार्मिक आणि बोलके छायाचित्र. सदलग्यातील या फोटोतील मेंढपाळ त्या पदपथाच्या कठड्याबाहेरुन जात आहे आणि त्याची सगळी मेंढरं संरक्षक कठड्याच्या आतील पदपथावरुन त्यांच्या त्यांच्या शिस्तीने जात आहेत. आणि दुसऱ्या फोटोत कांहीं शालेय मुले फूटपाथ सोडून मुख्य रस्त्यावरुन गटागटाने जात आहेत. मनुष्य प्राण्याला निसर्गाने अत्यंत …

Read More »

नैवेद्य दाखवताना कृष्णा नदीत बुडून महिलेचा मृत्यू

  चिक्कोडी तालुक्याच्या मांजरी गावातील घटना चिक्कोडी : नैवेद्य दाखवत असताना पाय घसरल्याने कृष्णा नदीत पडलेल्या एका महिलेचा बुडून मृत्यू झाला. बेळगाव जिल्ह्याच्या चिक्कोडी तालुक्यातील मांजरी गावात ही घटना घडली. संगीता शिवाजी मांजेकर (वय ४०) असे मृत महिलेचे नाव आहे. आज सकाळी नैवेद्य दाखवत असताना पाय घसरून ती नदीत पडली. …

Read More »

सदलग्यात स्वा. सावरकर यांच्यावर डॉ. अमर अडके, डॉ. ज्योती चिंचणीकर यांचे व्याख्यान संपन्न

  सदलगा : येथील अतुल जोशी यांच्या हॉलमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अंदमानातील काळकोठडीतील राजकैद्याचे जीवन जगत असतानाच्या त्यांनी भोगलेल्या यातना, तसेच केवळ काळ्या पाण्याची शिक्षा, मार्सोलिसच्या बंदरावरील सावरकरांची उडी, त्यांचे क्रांतीकार्य हे इतकेच नसून त्यांच्या मराठी साहित्यातील त्यांचे उत्कट लेखन, संस्कृतचा प्रभाव असणाऱ्या कविता, कमला काव्य, आणखीही भरपूर …

Read More »

सदलगा शहर परिसरातील शेतमळ्यामध्ये अनेक ठिकाणी मगरींचा वावर

  शेतकरी चिंतातूर; मगरीची लहान 16 पिल्ले वन विभागाकडे सुपूर्द चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील सदलगा शहराजवळून वाहणाऱ्या दूधगंगा नदीच्या किनारी अनेक ठिकाणी शेतमळ्यामध्ये पुराचे पाणी येऊन साठते. वर्षभर ते पाणी तसेच राहते त्या ठिकाणी असणाऱ्या दलदलीचा आणि चिखलाचा आधार घेऊन या ठिकाणी अनेक मगरीने वास्तव्य केले आहे. त्यातील कालचेच जिवंत …

Read More »

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर विकली तब्बल 5.10 लाखांना दोन बकरी….!

  बेळगाव : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरी बाजारात चांगलीच उलाढाल झाली असून बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील इटनाळ गावात बकरी दराने उच्चांक गाठला. दोन बकरी तब्बल 5 लाख 10 हजार रुपयांना विकली गेली. इटनाळच्या शिवाप्प शेंडूरे यांनी पाळलेल्या दोन बकऱ्यां तब्बल 5.10 लाखांना विकल्या गेल्या. यापैकी एक बकरे 3 लाखांना तर …

Read More »

चिमुकलीचा कालव्यात पडून मृत्यू झाल्याचा संशय

  चिकोडी : खेळण्यासाठी घराबाहेर पडलेली सहा वर्षीय चिमुकली दोन दिवसांपासून बेपत्ता असून नातेवाईकांसह पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे. एका सीसीटिव्हीमध्ये ती गावातील कालव्याजवळ फिरत असल्याची आढळून आल्याने कालव्यात पडून तिचा मृत्यू झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. निष्कषमी मडिवाळ (वय ६ वर्षे) असे या चिमुकलीचे नाव आहे. …

Read More »

शेततळ्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू; चिक्कोडी तालुक्यातील दुर्दैवी घटना

  चिक्कोडी : शाळेला सुट्टी असल्याने शेतात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी चिक्कोडी तालुक्यातील इंगळी गावात घडली. इंगळी गावातील पृथ्वीराज केराबा (१३), अथर्व सौंदलगे (१५) आणि समर्थ गडकरी (१३) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. तिघेही सायकली घेऊन गावाबाहेरील शेततळ्यात पोहायला शिकण्यासाठी गेले. तिघांनाही पोहता …

Read More »

ननदी येथील श्री हालसिद्धनाथ यात्रेनिमित्त भव्य ढोल वादन स्पर्धेचे उद्घाटन

  ननदी (प्रतिनिधी) : चिकोडी तालुक्यातील ननदी येथील जागृत देवस्थान ग्रामदैवत व कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागातील भाविकांचे श्रद्धास्थान श्री हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेत आज शुक्रवार दिनांक 18 रोजी रात्री आठ वाजता भव्य ढोल वादन स्पर्धेचे उद्घाटन श्रीमंत सरकार अजितसिंह निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यात्रेचा मुख्य दिवस दिनांक 19 एप्रिल रोजी …

Read More »

ननदी येथील श्री हालसिद्धनाथ यात्रा 16 ते 21 एप्रिलपर्यंत

  ननदी (प्रतिनिधी) : चिकोडी तालुक्यातील ननदी येथील जागृत देवस्थान ग्रामदैवत व कर्नाटक – महाराष्ट्र सीमाभागातील भाविकांचे श्रद्धास्थान श्री हालसिद्धनाथ देवाची यात्रा बुधवार दिनांक 16 रोजी सायंकाळी आठ वाजता श्रीमंत सरकार अजितसिंह निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली व विजयसिंह निंबाळकर व विजयसिंह देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कर बांधून सुरुवात करण्यात आली. यात्रेचा मुख्य …

Read More »