चिक्कोडी : शाळेला सुट्टी असल्याने शेतात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी चिक्कोडी तालुक्यातील इंगळी गावात घडली.
इंगळी गावातील पृथ्वीराज केराबा (१३), अथर्व सौंदलगे (१५) आणि समर्थ गडकरी (१३) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. तिघेही सायकली घेऊन गावाबाहेरील शेततळ्यात पोहायला शिकण्यासाठी गेले. तिघांनाही पोहता येत नव्हते अशी माहिती आहे. शेताचा मालक नेहमीप्रमाणे फिरत असताना, त्याला खड्ड्याजवळ एक सायकल दिसली. जेव्हा त्याने खड्ड्यात डोकावले तेव्हा तिन्ही मुलांचे मृतदेह आढळले. याप्रकरणी अंकली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.