निपाणी (वार्ता) : रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. एस. पाटील हे ३६ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त विद्यालयाच्यावतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक टी. बी. चिखले होते. मुख्याध्यापक एस. एस. चौगुले यांनी स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते बी. एस. पाटील …
Read More »जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात स्तवनिधी हायस्कूलचे यश
निपाणी (वार्ता) : चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातर्फे रायबाग येथील कर्नाटक पब्लिक स्कूल येथे आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान वस्तू प्रदर्शन पार पडले. त्यामध्ये ए. एस. पाटील हायस्कूल स्तवनिधी शाळेचा ‘पृथ्वी आणि अंतराळ विज्ञान’या विभागांमध्ये सादर केलेल्या प्रयोगाला द्वितिय क्रमांक मिळाला. या स्पर्धेमध्ये शाळेचे श्रीहरी काळेबेरे व प्रणव पट्टणकुडे या दोघांनी भाग घेतला …
Read More »“पुढच्या वर्षी लवकर याऽऽऽ”चा गजर; अलोट गर्दीत निपाणीत बाप्पाला निरोप!
साउंड सिस्टीम, ढोल पथकाच्या गजरात मिरवणुका निपाणी (वार्ता) : “गणपती बाप्पा मोरयाऽऽ पुढच्या वर्षी लवकर याऽऽऽ” असा जयघोष, साऊंड सिस्टिमवरील आवाज, अत्याधुनिक प्रकाश यंत्रणा आणि ढोल ताशांच्या तालावर आनंदाने नाचत हजारो निपाणीकरांनी लाडक्या बाप्पाला गुरूवारी (ता.२८) भावपूर्ण निरोप दिला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात रात्री उशिरापर्यंत बाप्पांचे विसर्जन झाले. अनुचित प्रकार …
Read More »ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त सजावट साहित्याची दुकाने सज्ज
नागरिकांमध्ये उत्साह; साहित्याच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ निपाणी (वार्ता) : शहरात प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती शुक्रवारी (ता. १) साजरी होत आहे. ईद-ए मिलादुन्नबीनिमित्त निपाणी बाजारपेठेत सजावट साहित्याची दुकाने थाटली आहेत. नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सजावट साहित्याच्या दुकानात गर्दी होत आहे. यंदा साहित्याच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. …
Read More »पोलीस असल्याचे भासवून वृद्ध महिलेची निपाणीत २ तोळ्यांच्या दागिन्यांची लूट
निपाणी (वार्ता) : पुढे गणेश विसर्जन मिरवणूक आणि गोंधळ सुरू आहे. त्यामुळे रस्ता बंद असून आपण पोलिस आहोत, असे सांगून वृद्ध महिलेच्या गळ्यातील चेन आणि हातातील अंगठी असा दोन तळ्याचा ऐवज घेऊन भामट्यांनी पोबारा केला आहे. गुरुवारी (ता.२८) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास येथील टिपको बिल्डिंग परिसरात ही घटना घडली. …
Read More »टपाल कार्यालयातर्फे विविध योजना एकाच छताखाली
आर. वाय. मधुसागर; निपाणीत जनसंपर्क अभियान निपाणी (वार्ता) : ग्राहकांची मागणी आणि सरकारी विशेषाधिकार सुविधा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने संपूर्ण भारतभर पसरलेल्या पोस्टल विभागाचे काम सुरू आहे. टपाल खाते आता अत्याधुनिक झाले असून विविध सेवा तात्काळ दिल्या जात आहेत. सर्व योजना एकाच छताखाली आले असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन …
Read More »बेळगावमध्ये ३ ऑक्टोबरला धनगर समाजाचे नववे अधिवेशन
लक्ष्मणराव चिंगळे; सिध्दरामय्यांचा होणार राष्ट्रीय सन्मान निपाणी (वार्ता) : अखिल भारतीय राष्ट्रीय धनगर समाजाचे नववे अधिवेशन बेळगाव येथील जिल्हा क्रीडांगणावर मंगळवारी (ता.३) होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा देशातील धनगर समाजबांधवातर्फे राष्ट्रीय सन्मान होणार आहे. यावेळी सुमारे दीड लाखांवर धनगर समाजबांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती धनगर समाजाचे माजी राज्याध्यक्ष …
Read More »गणेशोत्सवानिमित्त अक्कोळ पंत मंदिरात रेखाटल्या रांगोळीच्या विविध छटा
निपाणी (वार्ता) : गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अक्कोळ येथील ओम गणेश मंडळातर्फे श्री ग्रुपकडून श्री पंत मंदिरामध्ये रांगोळीच्या विविध छटा रेखाटण्यात आले आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांच्या हस्ते करण्यात आले. या आकर्षक रांगोळ्या पाहण्यासाठी अक्कोळ परिसरातील नागरिकासह महिलांची गर्दी होत …
Read More »लवकरच बदला दोन हजारांची नोट
३० सप्टेंबर अंतिम तारीख; बँकात होणार गर्दी निपाणी (वार्ता) : नोटबंदी काळात चलनाची धुरा सांभाळणारी दोन हजारांची नोट गेल्या सहा वर्षांपासून चलनात आहे. मात्र सध्या ती फार कमी प्रमाणत बघायला मिळते. केंद्र सरकारने २३ मे ते ३० सप्टेंबर या कालावधीत या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश दिले आहे. आता …
Read More »व्हनशेट्टी पार्क गणेश मंडळातर्फे आर. के. धनगर यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : निपाणी तालुका धनगर समाज अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आर. के. धनगर व सुनीता प्रताप यांची निपाणी तालुका शिक्षक संघ उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा येथील व्हनशेट्टी पार्क गणेश मंडळातर्फे उत्तम पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी निपाणी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रा.एन. आय. खोत ममदापूर ग्राम …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta