आमदार सतेज पाटील; अरिहंत मल्टीस्टेट संस्थेच्या कोल्हापूर शाखेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : सहकार महर्षी रावसाहेब पाटील (दादा) यांच्या नेतृत्वाखालील श्री अरिहंत को ऑप क्रेडिट सोसायटी संस्था ही कर्नाटक राज्यात सहकार क्षेत्रात नावलौकिक मिळवली आहे. सर्वांच्या विश्वासाला पात्र राहिलेली ही संस्था मल्टीस्टेटच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश केली आहे. कोल्हापूर येथे …
Read More »निपाणी बाजारपेठेत दीपचैतन्य खरेदीसाठी ग्राहकांची लगबग
निपाणी (वार्ता) : दिवाळी सणाला गुरुवारपासून (ता.९) वसुबारसने प्रारंभ झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील बाजारपेठेत शहरासह ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. दरम्यान या सणामुळे बाजारपेठेतही चैतन्य निर्माण झाले आहे. निपाणी परिसरावर दुष्काळाचे सावट असले तरी वर्षभरातील आनंदाचा सण म्हणून शहर आणि ग्रामीण भागात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी …
Read More »अरिहंत संस्थेच्या अक्कोळ शाखेचा वर्धापन दिन
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री अरिहंत क्रेडिट (मल्टिस्टेट) संस्थेच्या अक्कोळ शाखेचा दहावा वर्धापन दिन उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यानिमित्त सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विजय हतगीणे हे कुडित्रे येथील डी. सी. नरके जुनियर कॉलेजमधून सेवानिवृत्त झाल्याबद्दल, ग्राम पंचायत सदस्य दीपक कोळी यांना राष्ट्रीय आदर्श …
Read More »‘अंकुरम’च्या विद्यार्थ्यांनी बनविले दिवाळीचे साहित्य
आठवडी बाजारात विक्री; पणत्या आकाश कंदीलांचा समावेश निपाणी (वार्ता) : येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वतः दिवाळीनिमित्त आकर्षक सजावटीचे साहित्य, सुगंधित उटणे, पणत्या आणि इतर वस्तू बनवल्या होत्या. त्या सर्व वस्तू दिवाळी निमित्ताने येथील गुरुवारच्या आठवडी बाजारात स्टॉल मांडून त्यांची विक्री केली. ‘कमवा आणि शिका’ उपक्रमांतर्गत …
Read More »कोगनोळी बिरदेव यात्रेची पालखी मिरवणुकीने सांगता
पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रम : विविध शर्यती संपन्न कोगनोळी : बिरोबाच्या नावानं चांगभलं, खारीक, खोबरे, भंडाराच्या उधळणीत कोगनोळी तालुका निपाणी येथील ग्रामदैवत श्री बिरदेव यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पालखी मिरवणुकीने संपन्न झाली. शनिवार तारीख 4 रोजी माजी मंत्री वीरकुमार पाटील व सी. के. पाटील यांचे मानाचे …
Read More »महाराष्ट्रात ऊस घेऊन जाणारे 2 ट्रॅक्टर दिले पेटवून
निपाणी : महाराष्ट्रातील हुपरी येथील जवाहर साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरना आग लागल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यातील कारदगा गावात घडली. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील जवाहर साखर कारखान्याकडे उसाची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टरना आग लागल्याची घटना काल रात्री घडली. महाराष्ट्रात माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील …
Read More »महामार्गासह सेवा रस्ता हरवला झुडपात
वाहनधारकांसह नागरिकांतून संताप : सरपटणाऱ्या प्राण्यांचा त्रास निपाणी (वार्ता) : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम १५ वर्षांपूर्वी होऊन वाहतूक सुरळीत झाली. त्यानंतर गतवर्षापर्यंत पूंज – लॉईड कंपनीने मार्गाच्या देखभालीसह रस्त्याकडेला झाडे लावणे व सुशोभीकरणाचे काम केले. त्यानंतर या कंपनीच्या देखभालीचीची मुदत संपली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गासह सेवारस्ते झुडपात …
Read More »निपाणीत उद्या मोफत नेत्र तपासणी शिबिर
निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील के. एल. ई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि निपाणी रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमान शुक्रवारी (ता.९) सकाळी १० ते १ वाजेपर्यंत मोफत नेत्र तपासणी, मोफत कॉम्प्युटरद्वारे चष्म्याचे नंबर काढणे व मोफत मोतिबिंदू ऑपरेशन तपासणी शिबिर होणार आहे. अंदोलन नगरमधील डॉ. एम. जे. कशाळीकर रोटरी …
Read More »म. ए. समितीचे माजी सचिव प्रा. चंद्रहास धुमाळ यांचे निधन
निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी सचिव प्रा. चंद्रहास एकनाथ धुमाळ (वय ७४) यांचे बुधवारी (ता.८) निधन झाले. प्रा. धुमाळ यांनी १९६७ पासून महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये बेळगाव जिल्ह्याचे सचिव म्हणून काम पाहिले. गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयात ३२ वर्ष प्राध्यापक म्हणून …
Read More »निपाणी फुटबॉल स्पर्धेत एसटीएम ग्रुप विजेता
महादेव गल्ली एसपी ग्रुप उपविजेता : निपाणी फुटबॉल अकॅडमीतर्फे स्पर्धा निपाणी (वार्ता) : येथील समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या मैदानावर निपाणी फुटबॉल अकॅडमीतर्फे आयोजित राजमनी ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात महादेव गल्लीमधील एसपी ग्रुप संघाला १:० गोलने पराभव करून साई शंकर नगर मधील दिवंगत विश्वासराव शिंदे तरुण मंडळ एसटीएम ग्रुपने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta