Tuesday , March 3 2026
Breaking News

निपाणी

यरनाळ येथील तिसऱ्या गल्लीतील रस्ता डांबरीकरणाकडे दुर्लक्ष

  वाहनधारकासह नागरिकांची गैरसोय निपाणी (वार्ता) : यरनाळ येथील दोन गल्लीमध्ये सहा महिन्यापूर्वी रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. पण तिसऱ्या गल्लीतील बापू कुंभार ते गजानन परीट व नवीन ग्रामपंचायत कार्यालय ते रघुनाथ मोहिते यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे नागरिकासह वाहनधारकांची गैरसोय होत असल्याने या रस्त्यांचेही डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकांनी …

Read More »

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना महत्वपूर्ण

  प्राचार्या डॉ. जी. डी. इंगळे; विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : राष्ट्रीय सेवा योजनेचेच्या ( एनएसएस) माध्यमातून विद्यार्थ्यांमधील वक्तृत्व, गटनेतृत्व, स्वयंशिस्त, श्रमदान, सांस्कृतिक गुण विकासित होतात. विशेष श्रमसंस्कार शिबीरातून श्रमाचे महत्त्व स्वयंसेवकांना समजल्याने विविध सामाजिक मूल्यांची रूजवणूक होते. राष्ट्र उभारणीसाठी विद्यार्थी जीवनात अशी शिबीरे महत्वपूर्ण आहेत, असे मत …

Read More »

यूपीएससी परीक्षेत मेंढपाळाच्या मुलाचा झेंडा!

  बेडकिहाळच्या शैक्षणिक इतिहासात दुसऱ्यांदा डॉ. हर्षल कोरेचे यश; धनगर समाजासाठी अभिमानास्पद कामगिरी निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यातील बेडकिहाळ येथील मेंढपाळ कुटुंबातील डॉ. हर्षल कोरे यांनी वडील म्हाळू कोरे व आई संगीता कोरे यांच्या मार्गदशनाखाली वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून एमबीबीएस पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी पुन्हा युपीएससी परीक्षेमध्ये उत्तीर्ण …

Read More »

महात्मा गांधी शांती पुरस्काराने नामदेव चौगुले सन्मानित

  निपाणी (वार्ता) : भुवनेश्वर (ओडीसा) येथील एमजीजीपी फाऊंडेशनच्या वतीने लालबहादूर शास्त्री विद्यालय, अर्जुनी (ता. कागल) येथे कार्यरत असेलले आणि निपाणी येथील रहिवासी नामदेव चौगुले यांना महात्मा गांधी जागतिक शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चौगुले यांच्या शैक्षणिक, सामाजिक व पर्यावरण विषयक करीत असलेल्या कार्याची नोंद घेवून त्यांना हा पुरस्कार प्रदान …

Read More »

विज्ञान साहित्य संमेलन जागृतीचे प्रभावी माध्यम; अंजली अमृतसमन्नावर यांची माहिती

  निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागात निकोप समाज निर्मितीसाठी विज्ञान जागृती करण्याच्या हेतूने कुर्ली येथील एच जे सी चिफ फौंडेशन सतत २० वर्षे कार्य करीत आहे. ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन समितीच्या माध्यमातून विविध वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविणारे उपक्रम आयोजित केले जातात. त्याचा या परिसरातील विद्यार्थी, शिक्षक, पालक याना फायदा होत आहे. …

Read More »

निपाणीकरांचे नव्या तलावाचे स्वप्न लवकरच पूर्ण; नगरसेवक विलास गाडीवड्डर

  अभियंते श्रीकांत मकाणी यांची भेट निपाणी (वार्ता) : शहराचा कायमस्वरूपी पाणी प्रश्न निकालात काढण्यासाठी नवीन तलाव निर्मितीच्या कामासाठी मुख्यमंत्री सिध्दरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार व लघु पाटबंधारे मंत्री एम. एस. भोसराज यांची बेळगांव विधानभवनात भेट घेतली. प्रशासनाने या कामास सकारात्मक प्रतिसाद देत तलाव निर्मीर्तीच्या जागेचा सर्व्हे करण्याचा २४ तासात …

Read More »

रयत संघटनेच्या आंदोलनाला यश; मुख्यमंत्र्यांसमवेत केली चर्चा

  पुढील बैठकीसाठी बंगळूरमध्ये बैठकीचे निमंत्रण निपाणी (वार्ता) : कर्नाटक शासनाने बेळगाव जिल्हा दुष्काळी जाहीर केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी. ऊसाला कारखान्यांनी प्रति टन ३५०० आणि सरकारने २००० रुपये द्यावे, या मागणीसाठी कर्नाटक राज्य संघटनेने आंदोलन छेडले होते. याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी …

Read More »

मतदारसंघात निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्याचा विचार व्हावा

  राजेंद्र वडर ; कार्यकर्त्यांची बैठक घ्यावी निपाणी (वार्ता) : गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत निपाणी मतदारसंघात जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा संघर्ष झाला. यावेळी अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी माजी आमदार काकासाहेब पाटील यांना सोडून धनशक्तीच्या मागे गेले. केवळ निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्तेच शिल्लक राहिले. स्वतःकडून पैसा खर्च करून काकासाहेब पाटील यांना निवडून आणण्याचा प्रयत्न …

Read More »

स्तवनिधी हायस्कूलमध्ये दहावी विद्यार्थ्यांसाठी गणित मार्गदर्शन शिबिर

  निपाणी (वार्ता) : श्री बाहुबली विद्यापीठ संचालित, पी. बी. आश्रम स्तवनिधी मधील अरुण शामराव पाटील हायस्कूल येथे दहावी विद्यार्थ्यांसाठी गणित विशेष मार्गदर्शन शिबिर झाले. श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण अभिवृद्धी योजना ट्रस्टच्या डॉ. वीरेंद्र हेगडे ज्ञान विकास संस्थेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक महावीर पाटील होते. एस. एस. …

Read More »

यरनाळ शाळेने राबविला प्लास्टिकमुक्त शाळेचा उपक्रम

  विद्यार्थ्यांचा प्रतिसाद; गावातही केली जनजागृती निपाणी (वार्ता) : सध्या वापरात असलेले प्लास्टिक मानवी जीवनासह पशु पक्षासाठी घातक आहे. त्यामुळे शासनाने प्लास्टिक मुक्त शाळा राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार निपाणी पासून जवळच असलेल्या यरनाळ शाळेने मुख्याध्यापक श्रीकांत तावदारे यांच्या नेतृत्वाखाली प्लास्टिक मुक्त शाळेचा उपक्रम राबविला. त्यांच्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी भरभरून …

Read More »