निपाणी (वार्ता) : हुसदुर्ग येथे खुल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये फाईट, पुमसे व स्पीड पंच असे तीन विभाग होते. त्यामध्ये निपाणी येथील सद्गुरु तायक्वांदो अकॅडमीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी विविध प्रकारात यश मिळवले. स्पर्धेत विश्वजीत पटनशेट्टी, तिलक कोठडीया, समर्थ निर्मले, अर्णव बोरगावे, …
Read More »निपाणी, अक्कोळमध्ये लोकायुक्तांची धाड
१४ जणांचे पथक ; १२ तास चौकशी निपाणी (वार्ता) : येथील शहराबाहेरील पश्चिमेला असलेल्या आदर्शनगर आणि अक्कोळ येथे बेळगाव येथील लोकायुक्त अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता.८) पहाटे धाड टाकली. अधिकाऱ्यांनी प्रभाग क्रमांक २९ मधील आदर्शनगर येथील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ चव्हाण यांच्या फार्म हाऊससह त्यांच्या अकोळ येथील सासरवाडी मधील घरामधील चौकशी केली. …
Read More »तालुकास्तरीय दुर्गबांधणी स्पर्धेत अक्कोळ शिवशंभु ग्रुप प्रथम
श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे आयोजन; भारती झालेल्या जवानांचाही सत्कार निपाणी (वार्ता) : श्रीराम सेना हिंदुस्थानच्या येथील शाखेतर्फे आयोजित तालुकास्तरीय दुर्गबांधणी स्पर्धेत अक्कोळ येथील धर्मवीर संभाजी नगरातील शिवशंभू ग्रुपने प्रथम क्रमांक पटकाविला. गळतगा येथील सार्थक संजय जाधव गळतगा आणि अक्कोळ येथील श्रावणी संदीप सदावर्ते यांनी विभागून द्वितीय क्रमांक पटकाविला. अक्कोळ छत्रपती …
Read More »लक्ष्मीकांत पाटील यांचा मुरगुड येथे सत्कार
निपाणी : लोकनेते स्व. खासदार सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुल, मुरगुड यांच्यावतीने, मा. खासदार संजयदादा मंडलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील यांची महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव, सीमाभाग संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. बेळगाव सीमाप्रश्नाच्या दिर्घ अंदोलनाला नव्याने चालना देण्यासाठी आणि …
Read More »समाजाच्या जडणघडणीत पत्रकारांची महत्त्वाची भूमिका
प्रा. डॉ. अच्युत माने; निपाणीत पत्रकार दिन निपाणी (वार्ता) : पत्रकार हा समाजातील आरसा असतो. त्याच्याकडून आता अपेक्षा वाढल्या आहेत. बातमी मागील बातमी काढण्याची आता गरज निर्माण झाली आहे. देशात वाढलेल्या राजकतेवर अंकुश ठेवण्यासाठी आता लेखणी करावी लागेल. त्यामुळे समाजाच्या जडणघडणीत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत …
Read More »संभाजीनगर रस्त्यावरील अतिक्रमण पालिकेने हटवले
संबंधित कुटुंबीयांना जागेची हकपत्र; ४० वर्षानंतर समस्येचे निराकरण निपाणी (वार्ता) : शहरात उपनगरांच्या माध्यमातून दिवसेंदिवस व्याप्ती वाढत आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाले आहेत. येथील देवचंद महाविद्यालय परिसरातील धर्मवीर छत्रपती संभाजीनगर येथे रस्त्यावर अतिक्रमण करून घर बांधण्यात आले होते. अनेक वर्षांपासून नागरिकांना मुख्य रस्त्यापासून दूर राहावे लागले होते. अखेर …
Read More »सैनिकांच्याप्रति आदर बाळगा : प्रा. मधुकर पाटील
सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांचा सन्मान सोहळा निपाणी (वार्ता) : बंदूक आणि पेनाचे समाजात महत्त्वाचे योगदान आहे. देश सेवेसाठी शहीद होणे, गोळ्या घेणे मोठे काम आहे. देशासाठी झटणाऱ्या सैनिकांचा मानसन्मान करून त्यांचा आदर्श घेणे आवश्यक आहे. सैनिकामुळेच देशाच्या सीमा सुरक्षित आहेत, असे मत इतिहास अभ्यासक प्रा. मधुकर पाटील यांनी …
Read More »बालिकांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी द्या
दलित समाजाच्या विविध संघटनेची मागणी; मोर्चाने तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : पुणे जिल्ह्यातील राजगुरु नगर येथे २६ डिसेंबर रोजी गोसावी समाजातील ७ व ८ वर्षाच्या सख्या दोन बहिणींचे अपहरण करुन त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांची अमानुष पध्दतीने हत्या करण्यात आली. सदर घटनाही मानवतेला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील …
Read More »अतिक्रमण न हटविल्यास नगरपालिकेसमोर साखळी उपोषण
संभाजीनगर मधील नागरिकांची मागणी; नगराध्यक्षांना निवेदन निपाणी (वार्ता) : उपनगरातील मुरगुड रोड ते शिंदे नगर जोडणाऱ्या रस्त्यामधोमध असणारे अतिक्रमण हटवून रस्ता निर्माण करण्याच्या मागणीचे निवेदन संभाजी नगर, शिंदे नगर परिसरातील नागरीकांनी सामाजिक कार्यकर्ते पंकज गाडीवड्डर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता.३०) नगराध्यक्षा सोनल कोठडीया यांना दिले. ८ जानेवारीपर्यंत अतिक्रमण काढून रस्ता …
Read More »मराठी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी घेतला सहलीतून ज्ञानाचा अनुभव
निपाणी (वार्ता) : येथील मराठा मंडळ संचलित मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी कराड, वाई, पाचगणी, महाबळेश्वर, प्रतापगड आणि रायगड या ऐतिहासिक व निसर्गरम्य स्थळांना भेट दिली. दोन दिवसांच्या या शैक्षणिक सहलीत विद्यार्थ्यांनी इतिहास, निसर्ग, आणि संस्कृतीचा अभ्यास करत ज्ञानात भर टाकली. वाई येथे ऐतिहासिक मंदिरांच्या दर्शनाने विद्यार्थ्यांना प्राचीन स्थापत्यकलेची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta