Monday , September 21 2026
Breaking News

अरिहंत उद्योग समूहातर्फे अजित दादा पवार यांना आदरांजली अर्पण

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवारी (ता.२८) विमान अपघातामध्ये अकाली निधन झाले. त्यानिमित्त त्यांना बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूह आणि उत्तम पाटील युवा मंच तर्फे निपाणीत आदरांजली वाहण्यात आली.
सहकार रत्न उत्तम पाटील म्हणाले, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी निपाणी भागातील सर्व समानय नागरिकांच्या समस्या सोडवण्यासह विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन पर्यायी उपाययोजना केल्या होत्या. त्यामुळे सीमा भागातील विद्यार्थी आज उच्च पदावर पोचले आहेत. त्यांच्या अकाली निधनामुळे सीमाभागात भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. या पुढील काळात त्यांचा आदर्श जोपासत सीमा भागात कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी विविध मान्यवरांनी मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमास महात्मा बसवेश्वर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सी. बी. कुरबेट्टी, निपाणी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष दिलीप पठाडे, प्रा. डॉ. अच्युत माने, ॲड. संजय शिंत्रे, शेरू बडेघर, इम्रान मकानदार, राजेंद्र कंगळे, रघुनाथ चौगुले, सुनील राऊत, आकाश माने, रवींद्र शिंदे, शौकत मनेर दत्ता नाईक, संजय पावले, के. डी. पाटील, नितीन नेपीरे, प्रशांत नाईक, प्रा. भारत पाटील, शिरीष कमते यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *