मंगळसूत्र, दोन दुचाकी अंदाजे किंमत 3 लाख 55 हजार रुपये जप्त संकेश्वर (महंमद मोमीन) : गोकाक गावात गेल्या महिनाभरापासून झालेल्या चोरीचा तपास लावण्यात गोकाक पोलिसांना यश मिळाले आहे. गोकाक पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाल आर. राठोड यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून दोघा चोरांना गजाआड करुन ५० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, दोन दुचाकी …
Read More »संकेश्वरात पोलीस अधिकारी रवि चन्नण्णावर यांचा वाढदिवस नोटबूक वाटपाने साजरा
संकेश्वर (महंमद मोमीन) : बेंगळूरचे वरीष्ठ पोलिस अधिकारी (आय पी.एस.) रवि डी. चन्नण्णावर यांचा वाढदिवस संकेश्वरातील त्यांचे अभिमानी गिरीश निडसोसी यांनी सरकारी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ५०० नोटबूक वितरणांने उत्साही वातावरणात साजरा केला. वह्या वाटप कार्यक्रमाविषयी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना गिरीश निडसोसी म्हणाले, आमचे लाडके वरीष्ठ पोलिस अधिकारी रवि डी. चन्नण्णावर …
Read More »अपघातग्रस्त मेंढपाळांना मदतीचा हात
संकेश्वर (महंमद मोमीन) :अमणगी-मुगळी रस्त्यावर टिप्परने ५४ बकऱ्यांना चिरडल्याने मेंढपाळ लगमण्णा हालप्पा हेगडे, हालप्पा सिध्दप्पा हेगडे यांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात ५४ बकऱ्या ठार झाल्याने मेंढपाळांचे अदमासे सहा लाख रुपयांच्या नुकसान भरपाईसाठी कर्नाटक मेंढपाळ आणि लोकर उत्पादक सहकारी संघ वक्कूटचे बेळगांव जिल्हा अध्यक्ष शंकर हालप्पा हेगडे अंमणगी पुढे …
Read More »राष्ट्रीय बसव दलाचे अध्यक्ष डॉ. शि. बा. पाटील यांचे निधन
संकेश्वर (महंमद मोमीन) : राष्ट्रीय बसव दलाचे अध्यक्ष, राष्ट्रप्रशस्ती प्राप्त सेवानिवृत्त शिक्षक डॉ. शिवनगौडा बाळगौडा पाटील (वय ८१) यांचे आज सकाळी ६.१० वाजता संकेश्वर बसवान गल्लीतील राहत्या घरी हृदयविकाराने निधन झाले. ते कवी, लेखक आणि उत्तम व्यंगचित्रकार होते. त्यांची १२ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांना एकलव्य प्रशस्ती, उत्तम शिक्षक राज्य …
Read More »संकेश्वरातील संस्कृत पाठशाळा संस्कार शिबिर ठरावे : स्वामी मोक्षात्मानंद
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर नवभारत संघातर्फे प्रारंभ करण्यात आलेली संस्कृत पाठशाळा संस्कार शिबिर ठरावे असे बेळगांव रामकृष्ण मिशन आश्रमचे स्वामी मोक्षात्मानंद यांनी सांगितले. संकेश्वर अरिहंत क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेत आयोजित संस्कृत पाठशाळा उद्घाटनप्रसंगी स्वामीजी बोलत होते. समारंभाचे उद्घाटक स्वामी मोक्षात्मानंद, अध्यक्ष ॲड. एस. एन. जाबण्णावर, ॲड. रामचंद्र जोशी, …
Read More »हुक्केरी मराठा अभिवृद्धी संघाकडून मंत्रीमहोदयांविषयी नाराजीचा सूर.
संकेश्वर (महंमद मोमीन) : बेंगळूर येथे नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या हस्ते कर्नाटक मराठा समुदाय अभिवृद्धी निगम मंडळाची स्थापना करण्यात आली. मुख्यमंत्री महोदयांनी मराठा निगमचे उद्घाटन आणि लोगोचे अनावरण केले. परमपूज्य वेदांतचार्य श्री मंजुनाथ स्वामीजींच्या दिव्य सानिध्यात उदघाटन सोहळा संपन्न झाला. उद्घाटन सोहळ्यात राज्याचे माजी मुख्यमंत्री बी. एस. …
Read More »पालिकेत नूतन नगरसेवक नंदू मुडशी यांचे सहर्ष स्वागत
संकेश्वर (महंमद मोमीन) : पालिका सभेत प्रभाग क्रमांक 13 चे नूतन नगरसेवक नंदू मुडशी यांचे सहर्ष स्वागत नगराध्यक्षा सौ. सीमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी नंदू मुडशी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना सभापती सुनिल पर्वतराव म्हणाले, नंदू मुडशी हे प्रभागातील विकासकामांसाठी झटणारे …
Read More »टिप्परने ५४ बकऱ्यांना चिरडले
अंमणगी-मुगळी रस्त्यावर अपघात संकेश्वर (महंमद मोमीन) : अंमणगी-मुगळी रस्त्यावर आज सायंकाळी ५ वाजता भरधाव टिप्परने बकऱ्यांना चिरडून झालेल्या अपघातात सर्व ५४ बकरी दगावले आहेत. अपघाताची पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी अंमणगी-मुगळी येथे बकरी चारवून घराकडे परतणाऱ्या हालप्पा हेगडे, लगमण्णा हेगडे यांच्या कळपातील बकऱ्यांना अंमणगीहून मुगळीकडे भरवेगात निघालेल्या टिप्पर क्रमांक …
Read More »श्रींचा वाढदिवस भक्तीभावाने साजरा
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींचा वाढदिवस भक्तगणांनी श्रींच्या आशीर्वादाने भक्तीमय वातावरणात साजरा केला. आज दिवसभर भक्तगणांनी श्रींची प्रत्यक्ष भेट घेऊन श्रींना शाल श्रीफळ पुष्पहार अर्पण करून सविनय शुभेच्छा प्रदान केल्या.सोबत श्रींचा आर्शीवादही घेतला. श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजी …
Read More »संकेश्वर येथील अंबिका नगर रस्ता मुरुमीकरणाला चालना..
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर अंबिका नगरला जाणारा रस्ता खड्डेमय बनल्याने या मार्गे ये-जा करणाऱ्या शाळकरी मुलांची, शेतकऱ्यांची आणि नागरिकांची चांगलीच गैरसोय होऊ लागल्याची तक्रार युवा नेते महेश दवडते यांनी केली होती. त्यांनी येथे गटारची सोय नसल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यांवरून वाहताना दिसत असल्याचे तसेच पावसाचे पाणी खड्ड्यात साचून राहिल्याने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta