Tuesday , March 3 2026
Breaking News

संकेश्वर

संकेश्वरात सोमवारी शिवस्मारकाचे भूमिपूजन

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सोमवार दि. २ मे २०२२ रोजी सकाळी ९ वाजता शिवाजी चौक येथे शिवस्मारक भूमिपूजन निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी, संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात होत आहे. शिवस्मारकाचे भूमिपूजन राज्याचे वन आहार व …

Read More »

निडसोसी “श्रींनी” क्रिकेटचा चौकार लगावला…

संकेश्वर (महंमद मोमीन) : निडसोसी मठाचे मठाधिपती पंचंम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी शेताकडे फेरफटका मारण्यासाठी निघाले असता वाटेत श्रींना छोटी मुले क्रिकेट खेळातांना दिसली. श्रींना आपणही क्रिकेट खेळायचा आनंद लुटावा असे वाटले. श्रींची सवारी शेताकडे न जाता क्रिकेट मैदानाकडे वळाली. स्वामीजींनी मुलांकडून बॅट घेतली अन् मुलांचा आनंद द्विगुणित झाला. क्रिकेट खेळात …

Read More »

संकेश्वर प्रभाग १३ ची पोटनिवडणूक जाहीर

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १३ चे धडाडीचे नगरसेवक संजय नष्टी यांच्या निधनाने रिक्त झालेली नगरसेवकपदाची जागा भरुन काढण्यासाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. २ मे २०२२ पासून निवडणुकीची प्रक्रिया प्रारंभ होत आहे. २ ते ९ मे २०२२ अखेर उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. १० मे २०२२ रोजी …

Read More »

शिव-बसव जयंती, ईद शांततेने पार पाडा : प्रल्हाद चन्नगिरी

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती, जगदज्योती श्री बसवेश्वर जयंती आणि मुस्लिमांचं पवित्र रमजान ईद शांततेने सौहार्दपूर्वक निश्चितच पार पाडली जाईल, असे संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी यांनी सांगितले. ते आज संकेश्वर पोलिस ठाण्यावर आयोजित शांतता कमिटीच्या सभेला उद्देशून बोलत होते. सभेच्या …

Read More »

हुक्केरी हिरेमठाकडून अपंग विद्यार्थ्याला मदतीचा हात

हुक्केरी : हुक्केरी हिरेमठाच्या शाखेत 53वा मासिक सुविचार चिंतन कार्यक्रम अर्थपूर्णरित्या पार पडला. श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांच्या संकल्पनेतून एका अपंग विद्यार्थ्याला मदतीचा हात देण्यात आला. कोणाचे व्याख्यान नाही, भाषण नाही, पण कृतीतून सुविचारांचा अर्थ जनतेला सांगण्याचा अनोखा उपक्रम एप्रिलच्या सुविचार चिंतनातून हुक्केरी हिरेमठ शाखेत राबविण्यात आला. इस्लामपूर सरकारी उच्च …

Read More »

संकेश्वरात कोकणची काळीमैना दाखल..

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर बाजारात कोकणची काळीमैना (करवंदे) दाखल झाले आहेत. करवंदे थोडेसे महाग झालेले असले तरी लोक ते खरेदी करुन राणमेव्याचा आस्वाद घेतानाचे चित्र पहावयास मिळत आहे. गतवर्षी पाच रुपयाला मिळणारे करवंदे यंदा दहा रुपयाला आणि दहा रुपयांचे करवंदे पंधरा रुपयाला विकत दिले जाताहेत. संकेश्वर बाजारात मोसमी फळातील आंबे, …

Read More »

संकेश्वरात तब्बल दिडशे वर्षानंतर अय्याचार कार्यक्रम : संजय हिरेमठ

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात तब्बल दिडशे वर्षानंतर प्रथमच विशिष्ट पद्धतीने चिरंजीव नागमल्लीकार्जुन यांचा अय्याचार आणि महेश्वर मंत्रोपदेश कार्यक्रम येत्या रविवार दि. १ मे २०२२ रोजी संकेश्वर श्री महालक्ष्मी समुदाय भवन येथे होत असल्याची माहिती संजय शशीधर हिरेमठ (स्वामी) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते पुढे म्हणाले, चि.नागमल्लीकार्जन यांचा अय्याचार आणि …

Read More »

तयारी “ईद-उल-फित्रची”..

संकेश्वर (प्रतिनिधी) : मुस्लिमांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. पवित्र रमजानचे रोजे, तरहाबी नमाज आणि पाच-सहा दिवसांत होणाऱ्या रमजान ईद (ईद-उल-फित्रची ) जोरदार तयारी चाललेली दिसत आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीने रमजान ईदची नमाज मुस्लिम बांधवांना ईदगाहवर पडून करता आलेली नाहीयं. यंदा रमजान ईदची नमाज ईदगाहवर पडून करता येणार …

Read More »

संकेश्वर औषध संघटनेचे कार्य स्तुत्य : रमेश कत्ती

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर औषध व्यापारी संघटनेने हुक्केरी येथील मोफत आरोग्य तपासणी शिबिराला मोफत औषधे देऊन शिबिराला हातभर लावण्याचे कार्य केले आहे. संकेश्वर औषध संघटनेचे कार्य स्तुत्य असल्याचे बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी खासदार रमेश कत्ती यांनी सांगितले. हुक्केरी शासकीय रुग्णालयातर्फे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात संकेश्वर औषध …

Read More »

संकेश्वरात मराठा वधू-वर मेळाव्याला “मास्क’ बंधनकारक….

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरात प्रथमच येथील रुक्मिणी गार्डनमध्ये येत्या रविवार दि. १ मे २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजता भव्य मराठा वधू-वर परिचय महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याचे आयोजन शुभकार्य वधुवर सुचक केंद्र, न्यायनिवाडा लोकनेता फौंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे. वधुवर महामेळाव्याला उपस्थित राहणाऱ्यांना मास्क बंधनकारक राहणार आहे. …

Read More »