चिक्कोडी : जत्रेचा प्रसाद खाल्ल्याने 50 हून अधिक जण आजारी पडल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील केरूर गावात घडली. केरूर गावातील जत्रेला अनेक भाविक आले होते. जत्रेत प्रसाद सेवन केलेल्या 50 हून अधिक जणांना उलटी जुलाब सुरू झाला. त्यातील 30 जणांना चिक्कोडीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तर 10 …
Read More »देशाला सावरकरांच्या विचारांची गरज
सागर श्रीखंडे : बुदलमुख येथे अभिवादन निपाणी (वार्ता) : राष्ट्रासाठी सर्वस्वाची होळी करूनही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वाट्याला सर्वाधिक उपेक्षाच आली. थोर राष्ट्रभक्त, क्रांतिकारक, समाजसुधारक, विज्ञाननिष्ठ, समाजसुधारक, साहित्यिक, राजकारणी, कवी, इतिहासकार, नाटककार म्हणून त्यांनी केलेले कार्य मोठे आहे. त्यांच्या आचार विचारांची आज देशाला गरज आहे, असे मत हिंदू हेल्प लाईनचे …
Read More »उचवडे येथील महात्मा ज्योतिबा फुले वाचनालयाचा वर्धापनदिन उत्साहात
खानापूर : उचवडे (ता. खानापूर) येथील महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक वाचनालयाचा दुसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष शिवाजी हसनेकर हे होते. प्रारंभी वाचनालयाचे सचिव प्रा. महादेव खोत यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून सांगितला व उपस्थितांचे स्वागत केले. तर वाचनालयाचे …
Read More »शैक्षणिक वर्षात राज्यात ५०० पब्लिक स्कूल : मंत्री मधु बंगारप्पा
बंगळूर : आम्ही शैक्षणिक वर्षात कर्नाटकात ५०० पब्लिक स्कूल सुरू करणार आहोत, असे सांगून शालेय शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांनी, पुढील ३ वर्षांत ३ हजार कर्नाटक पब्लिक स्कूल सुरू करण्याचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले. म्हैसूर येथील काँग्रेस भवनात पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, “आम्ही सीएसआर अनुदानांतर्गत पब्लिक स्कूल सुरू करणार …
Read More »प्रज्वलचा अटकपूर्व जामीन विशेष न्यायालयाने फेटाळला
विमानतळावरच अटकेची शक्यता; ३१ रोजी होणार आगमन बंगळूर : सेक्स स्कँडलमध्ये गुंतलेले हसनचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांचा न्यायालयाने बुधवारी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे प्रज्वलला आता विमानतळावरच अटक होण्याची शक्यता आहे. त्याने वकीलामार्फत आजच लोकप्रतिनीधी विशेष न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. बंगळुर येथील विशेष न्यायालयाने बुधवारी हसनचे खासदार …
Read More »दत्त खुले नाट्यगृहाजवळील पाणी वापरात आणा
निपाणी (वार्ता) : शहरात पाणी टंचाईच्या पार्श्वभुमीवर कोडणी-गायकवाडी येथील खणीतील पाणी उपसा करून तलावामध्ये सोडण्याची मागणी होत आहे. याशिवाय शहरात असणाऱ्या दत्त खुले नाट्यगृहाजवळील तलावातील पाणी वापरात आणावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पंकज गाडीवड्डर यांनी केली आहे. पंकज गाडीवड्डर म्हणाले, इ.स. गेल्या चाळीस वर्षापासून येथील वड्डर समाज गायकवाडी येथील …
Read More »खानापूर येथील जवानाचे निधन
खानापूर : खानापूर तालुक्यातील कक्केरी येथील सैनिक मंजुनाथ अंबडगट्टी (वय ३५) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या 16 वर्षांपासून मंजुनाथ हे भारतीय लष्कराच्या इंजिनिअर रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. गेल्या शुक्रवारी एका अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना दिल्लीतील मिलिटरी बीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले …
Read More »हुतात्मा दिनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे; खानापूर तालुका समितीच्यावतीने आवाहन
खानापूर : 1986 मध्ये झालेल्या कन्नडसक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी शनिवारी (ता.१) रोजी सकाळी साडेआठ वाजता हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आले आहे. भाषावार प्रांतरचना करण्यात आल्यापासून सीमाप्रश्नाची सोडवणूक व्हावी यासाठी मराठी भाषिक सातत्याने प्रयत्नशील आहेत. तरीही …
Read More »विधानपरिषद निवडणुक : जागा सात, ईच्छुकांची संख्या ३०० हून अधिक
शिवकुमार; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना बंगळूर : राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी ३०० हून अधिक तिकीट इच्छुक असल्यामुळे पक्षाचे नेतृत्व ‘कठीण स्थितीत’ आहे, असे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी मंगळवारी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री आणि केपीसीसीचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार या संदर्भात हायकमांडशी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी दिल्लीला …
Read More »वाल्मिकी महामंडळ घोटाळ्यात माझी भूमिका नाही
मंत्री नागेंद्र; तीन अधिकाऱ्यांविरुध्द एफआयआर बंगळूर : वाल्मिकी विकास महामंडळाच्या मनी ट्रान्सफर घोटाळ्यात आपली कोणतीही भूमिका नसल्याचे अनुसूचित जमाती विकास आणि क्रीडा मंत्री बी. नागेंद्र यांनी स्पष्ट केले. कर्नाटक महर्षी वाल्मिकी अनुसूचित जमाती विकास महामंडळ (केएमव्हीएसटीडीसी) चे लेखाधिकारी चंद्रशेखरन पी. यांनी काल आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी डेथ नोट लिहिली. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta