कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 जवळ असणाऱ्या दुधगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दुधगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. निपाणी व कागल तालुक्यात पाऊस थोडा कमी असला तरी कोकण पट्ट्यात पावसाचा जोर असल्याच्या कारणाने दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. …
Read More »निपाणी शहरातील गुळगुळीत रस्त्यावर पडले खड्डे!
पहिल्या पावसातच दर्जा उघड ; वाहनधारक, नागरिकांत संताप निपाणी (वार्ता) : शहरात कोट्यवधी रुपये खर्चाच्या चकचकीत रस्त्यावरून जाताना पुढे कोणत्याही ठिकाणी खड्डेमय रस्त्याचा सामना करावा लागू शकतो, अशी परिस्थिती निपाणी शहरातील आहे. त्यामुळे वाहनधारक, त्यांची वाहने, पायी चालणारे नागरिक चिखलाने माखून घरी येणार नाहीत, याची काही शाश्वती नाही. अनेक …
Read More »खानापूर- बिडी रस्ता मृत्यूचा सापळा!
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे खानापूर -बिडी रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या आठ दिवसापासून खानापूर तालुक्यात पावसाने उच्चांक गाठला. तालुक्यातील नद्या, नाले, तलाव दुथड्या भरून वाहत आहेत. तालुक्याच्या जंगल भागातील अनेक खेडे गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. तर तालुक्यातील अनेक गावचे रस्ते खड्डे मय …
Read More »महाराष्ट्राच्या पावसाने सीमाभागात पूर
पाच नद्यांना वाढले पाणी : ३६ गावांना वाढला धोका निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रातील महाबळेश्वर, वारणा, राधानगर, अंबा, धूम, नवजा, काळमावाडी, कोयना आणि कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कर्नाटक सीमाभागातील नद्यांची पाणी पातळी वाढून नदीकाठच्या गावामध्ये पूर येत आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या पाण्यामुळे कर्नाटक सीमाभागातील ३६ गावांना धोका पोहोचण्याची …
Read More »खानापूर शहरातील विद्यानगरात रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य; नगरपंचातीचे दुर्लक्ष
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात ऐन पावसाळ्यात रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने रस्त्याची दुर्दशा झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून विद्यानगरात रस्त्याचा पत्ताच नाही. त्याचबरोबर गटारी नाहीत. ज्या नगरपंचायतीला रस्ते, गटारी, पथदिवे, पाणी याची काळजी नाही. अशा नगरपंचातीकडून विकास कधी होणार. मात्र दुसरीकडे नगरपंचायत प्रत्येक घराचा फाळापट्टी, पाणी पट्टी, …
Read More »पुढील 24 तासांत कर्नाटकसह अनेक ठिकाणी पूरस्थिती; हवामान खात्याचा अंदाज
बेळगाव : बुधवारी उत्तर कर्नाटकातील अनेक ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने पुढील 24 तासांत कोस्टल कर्नाटक, कोकण आणि गोवा, एन.आय कर्नाटक, लगतच्या तेलंगणा आणि महाराष्ट्रातील अनेक परिसरात हवामान उपविभागातील काही पाणलोट आणि परिसरांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पुराचा धोका संभवतो. पुढील 24 तासांत अपेक्षित पावसाच्या घटनेमुळे …
Read More »मणिपूरमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सर्वपक्षीय संघटनेतर्फे निषेध
निपाणी (वार्ता) : मणिपूर येथे दोन महिलांवर अत्याचार करून त्यांची सार्वजनिक ठिकाणी विटंबना करण्यात आली. त्यासंदर्भात येथील विविध सर्वपक्षीय संघटनांनी सीटू कार्यालयात एकत्रित येऊन या घटनेचा तीव्र निषेध करून संशयित आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या निंदनीय घटनेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता.२७) सकाळी अकरा वाजता येथील धर्मवीर संभाजीराजे चौकात …
Read More »खानापुर, सौंदत्ती, मुडलगी, यरगट्टी येथील शाळांना उद्या बुधवारी सुट्टी जाहीर
बेळगाव : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी उद्या बुधवारी (26 जुलै) मुसळधार पावसामुळे खानापूर, मूडलगी, यरगट्टी आणि सौंदती तालुक्यातील प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना आणि फक्त खानापूर तालुक्यातील पीयू महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. केवळ खानापूर तालुक्यातील शाळांसह पीयू महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सुट्टी जाहीर …
Read More »खानापूर तालुक्यात पूल बांधणीसाठी विशेष मोहिम; सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी
खानापूरमध्ये 87 घरांची अंशत: पडझड बेळगाव : पावसाळ्यात खानापुरासह राज्यातील डोंगराळ भागातील शाळकरी मुले व ग्रामस्थांना नदी ओलांडता यावी यासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या खानापूर तालुक्यातील भुरणकी येथे भेट देऊन घराच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते बोलत …
Read More »प्राथ. शाळा शिक्षकांना बीएलओ कामातून मुक्त करा; शिक्षकांचे तहसीलदाराना निवेदन
खानापूर (सुहास पाटील) : राज्यासह खानापूर तालुक्यातील प्राथमिक शाळा शिक्षकांना बीएलओचे काम सरकारने लावले आहे. एकीकडे शिक्षकांना शाळेत विद्यार्थ्यांना शिकविणे, त्यातच रिक्त असलेल्या शिक्षकांच्या कामाचा भार घेणे, राष्ट्रीय सन, क्रीडा स्पर्धा, प्रतिभा कारंजी स्पर्धा, आधार सिंडींग, ऑनलाईन काम, माध्यान्ह आहार, मुलांचे शैक्षणिक कार्यक्रम असे अनेक उपक्रम राबविण्यात शिक्षकाना वेळ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta