Friday , November 6 2026
Breaking News

बंगळुरमध्ये ७.८३ कोटीचे अंमली पदार्थ जप्त; १४ अमली पदार्थ तस्करांना अटक

Spread the love

 

बंगळूर : विदेशी नागरिक आणि इतर राज्यांतील नागरिकांसह १४ अमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली असून ७.८३ कोटी रुपयांची प्रतिबंधित औषधे जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती बंगळूर पोलिसांच्या केंद्रीय गुन्हे शाखेच्या नार्कोटिक्स पथकाने दिली.
अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गेल्या आठवडाभरात शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील वरथूर, बनशंकरी, विद्यारण्यपुरा, कॉटनपेठ आणि कडूगोडी येथे जलद कारवाई केली.
या प्रकरणांमध्ये एकूण १४ अंमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली असून त्यात तीन परदेशी नागरिकांचा समावेश आहे, ओरिसा आणि केरळमधील प्रत्येकी चार आणि बंगळूरमधील तीन जणांचा समावेश आहे.
त्याच्याकडून सुमारे सात कोटी ८३ लाख ७० हजार रुपयांचे प्रतिबंधित ड्रग्ज जप्त करण्यात आले. १८२ किलो गांजा, १.४५० किलो चरस तेल, १६.२ ग्रॅम एमडीएमए, १३५ एक्स्टसी गोळ्या, एक किलो मेफेड्रोन व्हाईट पावडर, एक किलो मेफेड्रोन व्हाईट पावडर, ८८० ग्रॅम कोकेन, २३० ग्रॅम एमडीएमए सेक्स्टसी पावडर होते.
तसेच आठ मोबाईल फोन, दोन कार, एक स्कूटर आणि वजनकाटे जप्त करण्यात आले.
…………………..
देसाई

About Belgaum Varta

Check Also

बस तिकीट दरवाढीच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी; अंतिम निर्णय परिवहन विभागाकडे

Spread the love  बेळगाव : महागाईचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडत चालले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *