Friday , December 19 2025
Breaking News

कर्नाटक

कुसमळीनजीक मलप्रभा नदीच्या पात्रातून बैल गेला वाहून!

  खानापूर : सध्या खानापूर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील घनदाट जंगलात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे कणकुंबी, जांबोटी भागातील मलप्रभा नदी नदीपात्र ओसंडून वाहत आहे. मलप्रभा नदीला पूर आला आहे. या भागात भात रोप लागवडीसाठी लगबग सुरू असतानाच हब्बनहट्टी (ता. खानापूर) संतोष घाडी हे आपल्या …

Read More »

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सद्गुरु तायक्वांदो स्पोर्ट्सचे यश

  निपाणी (वार्ता) : इंडिया तायक्वांदो, कर्नाटक ऑलंपिक असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटका तायक्वांदो असोसिएशन बेंगलोर यांच्यामार्फत ४० वी राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा बंगळूर कोरमंगल इनडोअर स्टेडियम येथे झाल्या. क्योरगी व पुमसे विभागात खुल्या स्पर्धा व सब जुनिअर कॅडेट ज्युनियर व सीनियर विभागात यशस्वी पार पडल्या. त्यामध्ये निपाणी येथील सद्गुरु तायक्वांदो स्पोर्ट्स …

Read More »

दूधगंगा नदीचे पाणी पात्राबरोबर

  कोगनोळी : कोगनोळी येथून राष्ट्रीय महामार्ग जवळ असणाऱ्या दूधगंगा नदीचे पाणी पात्राबरोबर आले आहे. गुरुवार तारीख 20 व शुक्रवार तारीख 21 रोजी पडलेल्या जोरदार पावसामुळे दूधगंगा नदीपात्रात पाण्याची वाढ झाली आहे. दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कोगनोळी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, करनूर, वंदूर आदी गावच्या लोकांना पुराचा धोका वाढला …

Read More »

निपाणी तालुक्यात संततधार कायम

  सर्व पूल पाण्याखाली; नदीकाठचा परिसर नियंत्रणात निपाणी (वार्ता) : शहर आणि ग्रामीण भागात शुक्रवारी (ता.२१) रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने वेदगंगा व दूधगंगा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून वीरगंगा आणि दूधगंगा नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान अद्यापही तालुक्यातील शनिवार अखेर विविध ठिकाणी विविध …

Read More »

निपाणीकरांच्या आरोग्यासाठी प्रयत्नशील!

  आमदार शशिकला जोल्ले : ‘आमचा दवाखान्याचे’ उद्घाटन निपाणी (वार्ता) : मागासवर्गीय भागात सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी ‘आमचा दवाखाना’ सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्वांनाच त्याचा उपयोग होणार असून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला आहे. यापूर्वी अर्बन हेल्थ सेंटर सुरू करून आरोग्य सुविधा दिल्या आहेत. …

Read More »

पावसामुळे लोंढा मार्गावर मोहिशेतनजीक नव्याने बांधलेला ब्रिज खचला

  खानापूर : खानापूर तालुक्यातील लोंढा येथे सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे लोंढ्यातील वीज प्रवाह खंडित झालेला आहे. त्याशिवाय लोंढा मार्गावर मोहिशेतनजीक नव्याने बांधलेला ब्रिज खचला आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे लोंढा गावातील वीज पुरवठा ठप्प झाला आहे. …

Read More »

पावसाळ्यात राहा सर्पांपासून सावधान!

  निपाणी तालुक्यात विषारी चार जाती : मारण्याऐवजी सर्पमित्रांना द्या माहिती निपाणी (वार्ता) : पावसाळी दिवसात बिळात पाणी भरत असल्याने सर्प बाहेर पडतात. अशावेळी सर्प विषारी असो की बिनविषारी तो दिसताच नागरिक भयभीत होतात. यामुळे या काळात नागरिकांनी सतर्कता बाळगत विषारी आणि बिनविषारी सर्पांची माहिती घेण्याची गरज निपाणी परिसरातील सर्पमित्रांनी …

Read More »

खासगी बस पलटी; चालकाचा जागीच मृत्यू

  25 प्रवासी जखमी यल्लापूर : उत्तरा कन्नड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग 63 वर भीषण अपघात झाला. खासगी बस पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला. बेंगळुरूहून गोव्याकडे जाणाऱ्या एका खासगी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती उलटली. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला असून 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत. यातील …

Read More »

गर्लगुंजी प्राथमिक कृषी पत्तीन सोसायटीच्या निवडणुकीत श्री माऊलीदेवी शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय

  खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील तालुक्यातील सर्वात जुनी पीकेएस सोसायटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूकीची खानापूर तालुक्यात चुरशीची निवडणूक म्हणून सर्वाचे लक्ष लागून होते. या निवडणुकीत दोन पॅनल तयार झाले होते. यामध्ये जुने संचालक असलेले पॅनल श्री माऊली देवी शेतकरी विकास पॅनल व शेतकरी विकास पॅनल …

Read More »

टिप्पर – कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू

  हासन : हासन जिल्ह्यातील आलूर तालुक्यातील ईश्वरहळ्ळी कुडीगेजवळ टिप्पर आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. कुप्पळ्ळी गावचा चेतन, गुड्डेनहळ्ळी गावचा अशोक, थत्तेकेरी गावचा पुरुषोत्तम आणि आलुर तालुक्यातील चिगळूर गावचा दिनेश यांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील तीन जणांची प्रकृती चिंताजनक असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात …

Read More »