Friday , March 6 2026
Breaking News

कर्नाटक

निपाणीत शुक्रवारी मोफत तपासणी मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

  निपाणी (वार्ता) : बेळगाव के. एल. ई. संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि निपाणी रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमान शुक्रवारी (ता.८) सकाळी १० वाजल्यापासुन दुपारी १ वाजेपर्यंत मोफत नेत्र तपासणी, मोफत कॉम्प्युटरद्वारे चष्म्याचे नंबर काढणे व मोफत मोतिबिंदू ऑपरेशन तपासणी शिबिर येथील अंदोलन नगरमधील डॉ. एम. जे. कशाळीकर रोटरी कम्युनिटी …

Read More »

कार-दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात; भाऊ-बहीण ठार

  बेळगाव : देवदर्शनासाठी चिक्कोडीकडे जात असताना कारची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात भाऊ-बहीण जागीच ठार झाले. मलिकवाड – नणदी रस्त्यावरील शर्यतीमाळजवळ मंगळवारी हा अपघात झाला. प्रशांत तुळशीकट्टी (वय २०) आणि प्रियांका तुळशीकट्टी (वय १९) अशी मृतांची नावे आहेत. प्रशांत व त्याची बहीण प्रियांका हे दोघे दुचाकीने चिक्कोडीला परटी …

Read More »

शिक्षकामुळेच समाज व्यवस्थेला दिशा

  गटशिक्षणाधिकारी नाईक; आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण निपाणी (वार्ता) : शिक्षक हे विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देतात. आदर्श नागरिक घडविण्यात शिक्षकांचा मोठा वाटा आहे. तो समाजव्यवस्थेला दिशा देणारा मार्गदर्शक गुरू असतो. प्रत्येकाच्या जीवनात आई- वडिलांबरोबरच शिक्षकाचे मोठे महत्त्व आहे, असे मत गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांनी व्यक्त केले. जिल्हा आणि तालुका पंचायत …

Read More »

सेवानिवृत्तीनिमित्त म्हाळुंगे यांचा देवचंद महाविद्यालयामध्ये सत्कार

  निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद महाविद्यालय ग्रंथालयातील कर्मचारी ज्योती म्हाळुंगे यांचा २३ वर्षे सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी जनता शिक्षण मंडळाचे संचालक प्रदीप मोकाशी यांच्या हस्ते व मानपत्र देऊन, महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. डॉ. जी. डी. इंगळे यांच्या हस्ते तर ग्रंथालय विभागाच्या वतीनेही त्यांचा सत्कार …

Read More »

खानापूर नगरपंचायतीची सूत्रे मुख्याधिकारी संतोष कुरबेट यांनी स्वीकारली

  खानापूर : खानापूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राजू वटारी यांना मोकळीक देऊन सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याने त्यांच्या जागी संतोष कुरबेटी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांनी खानापूर येथे उपस्थित राहून आपला पदभार स्वीकारला आहे. यावेळी नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी अभियंता तिरुपती लमानी, राजु जांबोटी, गंगाधर कांबळे, प्रेमानंद नाईक, शोभा …

Read More »

दहावी, बारावीच्या यापुढे दरवर्षी तीन परीक्षा : मधु बंगारप्पा

  बंगळूर : राज्यातील दहावी (एसएसएलसी) आणि बारावी (द्वितीय पीयूसी) विद्यार्थ्यांसाठी वर्षातून तीन वेळा परीक्षा लिहिण्याची संधी दिली जाईल, अशी घोषणा शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांनी केली. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग आणि उच्च शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त विधानसौध येथील बँक्वेट हॉलमध्ये आयोजित …

Read More »

डेंगी सदृश आजाराने निपाणीत युवकाचा मृत्यू

  निपाणी (वार्ता) : डेंगी सदृश आजाराने निपाणीतील प्रगती नगरमधील युवकाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.५) सायंकाळी घडली सौरभ राजू माने (वय २६) असे या युवकाचे नाव आहे. सौरभ माने हा येथे चायनीजचा व्यवसाय करीत होता. आठ दिवसापूर्वी त्याला किरकोळ ताप येऊन रक्तातील प्लेटलेट्स कमी झाल्या होत्या. त्यामुळे …

Read More »

डॉ. राधाकृष्ण यांचा आदर्श घेऊन काम करावे

  आमदार शशिकला जोल्ले; निपाणीत शिक्षक दिन निपाणी (वार्ता) : आपल्या कारकिर्दीमध्ये शिक्षणाला महत्त्व देऊन निपाणी भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावला आहे. विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम केल्याने शिक्षकांना समाजात महत्त्वाचे स्थान आहे. त्यांनी सर्वपल्ली डॉ. राधाकृष्ण यांचा आदर्श घेऊन काम करावे. शिक्षकांमध्ये देशाचे भविष्य निर्माण करण्याची ताकद आहे, असे मत आमदार शशिकला …

Read More »

दहीहंडीसाठी गोविंदा पथके सज्ज; निपाणीत लाखाचे बक्षीस

  श्रीकृष्ण जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम निपाणी (वार्ता) : श्रीकृष्ण जयंती उत्सव एक दिवसांवर आणि गोपाळकाला दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने गोपाळकाला सणासह मंडळ व गोविंदा पथके दहीहंडीसाठी सज्ज झाली आहेत. दहीहंडी उत्सवाची अधिक रंगत आणण्यासाठी निपाणी व परिसरातील विविध मंडळाचे पदाधिकारी कामाला लागले आहेत. जन्माष्टमी बुधवारी (ता. ६) झाल्यावर दुसऱ्या …

Read More »

अंबिका तलावाची ग्रामपंचायतीकडून स्वच्छता

  स्वच्छ ठेवण्याचे आवाहन कोगनोळी : येथील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या अंबाबाई मंदिरालगत तलावातील मासे मृत होऊ लागले होते. याची दखल घेऊन ग्रामपंचायतच्या माध्यमातून तलावाची स्वच्छता करून घेण्यात येत आहे. ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील म्हणाले, अंबिका तलाव हे गावाचे वैभव आहे. महिलांनी कपडे धुत असताना केमिकल युक्त कपडे व इतर साहित्य …

Read More »