बेळगाव (प्रतिनिधी) : उचवडे (ता. खानापूर) येथील महात्मा जोतिबा फुले वाचनालयाचा पहिला वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे खजिनदार सुरेश पाटील हे होते. वाचनालयाचे अध्यक्ष शिवाजी हसनेकर यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. तसेच उपस्थितांचे स्वागत केले. उपाध्यक्ष हभप दशरथ पाटील यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ …
Read More »भ्रष्टाचार प्रकरणी न्याय न मिळाल्यास आंदोलन
बिराप्पा मधाळे; तक्रारदाराची लोकायुक्तांकडे धाव निपाणी (वार्ता) : वाळकी (ता. चिकोडी) येथील घरकुलाची रक्कम परस्पर लाटण्याचा प्रकार उघडकिस आल्यानंतर वाळकी ग्रामस्थांनी सदर गैरव्यवहार करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील प्रिया प्रकाश पाटील यांच्याकडून लाटण्यात आलेली रक्कम ११% व्याज आकारून परत घेण्याचे …
Read More »कोगनोळीत झाड कोसळले, महिला बचावली
मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प कोगनोळी : येथील भगवा सर्कल जवळ मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्याची घटना बुधवारी घडली. यामधुन महिला बचावली आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून महिला अपघातातून बचावली. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती अशी म्हणण्याची वेळ अनुभवास मिळाली. याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळावर घडलेली हकीकत अशी की, ४० वर्षीय …
Read More »दुहेरी हत्याकांडच्या घटनेनं धारवाड हादरलं!; रिअल इस्टेट व्यावसायिकासह दोघांची निर्घृण हत्या
धारवाड : विद्याकाशी म्हणून ओळखलं जाणारं धारवाड शहर गुरुवारी रात्री झालेल्या दुहेरी हत्याकांडच्या घटनेनं चांगलंच हादरलं आहे. धारवाडमध्ये काल रात्री उशिरा रिअल इस्टेट व्यावसायिकासह दोघांची निर्घृण हत्या करण्यात आली. महमद कुडची नावाच्या रिअल इस्टेट व्यावसायिकाची चाकूने निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ही घटना धारवाडमधील कमलापूरच्या शिवारात घडली. महमद घरासमोर बसला …
Read More »मुलीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका वाटून घरी परतत असताना झालेल्या अपघातात वडिलांचा दुर्दैवी मृत्यू
बेळगाव : 1 जुन रोजी होणाऱ्या आपल्या मुलीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका वाटून घरी परतत असताना दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गर्लगुंजी येथील येथील अरुण मष्णू पाटील (वय 63) हे 1 जून रोजी होणाऱ्या आपल्या …
Read More »सिमेंटच्या पाईप डोक्यावर पडल्याने युवकाचा मृत्यू
सौंदलगा येथील घटना : जगण्याची झुंज ठरली अपयशी निपाणी (वार्ता) : डोक्यावर सिमेंट पाईप पडल्याने एक जण गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू असताना तिसऱ्या दिवशी या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना माळ भाग सौंदलगा येथे घडली. तीन दिवस जगण्यासाठी केलेली झुंज अखेर अपयशी ठरली. उत्तम शिवाजी …
Read More »लक्ष्मी हेब्बाळकर, लक्ष्मण सवदी यांना मंत्रिपदाची लॉटरी; शनिवारी होणार शपथविधी
बेंगळुरू : काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला असून आज 20 जणांची यादी निश्चित होण्याची शक्यता आहे. बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, लक्ष्मण सवदी यांच्यासह 20 आमदारांची मंत्रीपदासाठी नावे निश्चित करण्यात आली आहे. शनिवारी (२७ मे) रोजी सकाळी ११.४५ वाजता शपथविधी होणार आहे. यामध्ये लक्ष्मी …
Read More »नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचा नियती फाऊंडेशनच्यावतीने सत्कार
खानापूर : भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचा आज खानापूर नियती फाऊंडेशनच्या अध्यक्षा तसेच खानापूर भाजपच्या महिला प्रभारी डॉ. सोनाली सरनोबत यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या की, खानापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीने मोठा विजय संपादन केला आहे. या यशाबरोबरच जबाबदारी देखील मोठी …
Read More »खानापूरात कृषी खात्याच्या सवलतीच्या दरातील बी बियाणाचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्याहस्ते वाटप
खानापूर : खानापूर तालुक्यात सध्या पेरणीच्या हंगामाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी कृषी खात्याकडून मिळणाऱ्या सवलतीच्या दरातील बी बियाणाच्या वाटपाच्या प्रतिक्षेत गेल्या कित्येक दिवसापासुन होते. यंदाच्या कृषी खात्याकडून सवलतीच्या दरात वाटप करण्यात येणाऱ्या बी बियाणाचे वाटप नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर याच्याहस्ते गुरूवारी दि. २५ रोजी जांबोटी क्राॅसवरील तालुका कृषी …
Read More »खानापूर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाचा कालावधी संपुष्टात
लवकरच नविन पदाधिकारी खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाचा कालावधी येत्या काही दिवसांत संपुष्टात येणार आहे. त्यामुळे खानापूर शहरातील नगरसेवकातुन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षासाठी कोणते आरक्षण येणार याची चर्चा जोरदार सुरू आहे. येत्या दोन वर्षे सहा महिन्यासाठी नुतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाचा कालावधी राहणार आहे. मागील दोन वर्षे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta