Saturday , April 18 2026
Breaking News

दुहेरी हत्याकांडच्या घटनेनं धारवाड हादरलं!; रिअल इस्टेट व्यावसायिकासह दोघांची निर्घृण हत्या

Spread the love

 

धारवाड : विद्याकाशी म्हणून ओळखलं जाणारं धारवाड शहर गुरुवारी रात्री झालेल्या दुहेरी हत्याकांडच्या घटनेनं चांगलंच हादरलं आहे.
धारवाडमध्ये काल रात्री उशिरा रिअल इस्टेट व्यावसायिकासह दोघांची निर्घृण हत्या करण्यात आली. महमद कुडची नावाच्या रिअल इस्टेट व्यावसायिकाची चाकूने निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ही घटना धारवाडमधील कमलापूरच्या शिवारात घडली. महमद घरासमोर बसला असताना मारेकऱ्यांच्या एका गटाने हल्ला करून त्याची हत्या केली. महमद कुडचीच्या घरापासून काही अंतरावरच आणखी एक मृतदेह सापडला. तो मृतदेहही रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. ती व्यक्तीही कुडचीच्या घरातून पळून गेली. रस्त्यावर सर्वत्र रक्त सांडले होते. त्यांनाही हल्लेखोरांनी बेदम मारहाण केली. दुसऱ्या मृताचे नाव समजू शकलेले नाही. पोलिस आयुक्त रमण गुप्ता आणि उपनगर स्टेशन पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे. याबाबत हुबळी-धारवाड पोलीस आयुक्त रमण गुप्ता यांनी प्रसारमाध्यमांना अधिक माहिती दिली.
दरम्यान, अनोळखी मृतांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहेत. व्यावसायिक स्पर्धा किंवा पूर्ववैमनस्यातून हे हत्याकांड घडले असल्याचा संशय असून, मारेकऱ्यांना बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला आहे.

About Belgaum Varta

Check Also

योगेश गौडा खून प्रकरण: विनय कुलकर्णींसह १६ दोषीना आज शिक्षा होणार जाहीर

Spread the love  बंगळूर : २०१६ मध्ये घडलेल्या भाजप नेते योगेश गौडा यांच्या खून प्रकरणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *