Friday , December 19 2025
Breaking News

कर्नाटक

कला महोत्सवात तिसरीचा मुलगा बनला सर्वांचे आकर्षण

देवचंद महाविद्यालयात कला महोत्सव निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद महाविद्यालयातर्फे आयोजित कला महोत्सवामध्ये केएलई सीबीएसईचा ३री चा विद्यार्थी श्रीनय सोमशेखर बाडकर याने स्टेज वरती रॅपिड आर्ट परफॉर्मन्स सादर केला. एकादी कला कृती रेखाटायला बराच वेळ लागत असतो. पण यामध्ये त्याने त्याची कला सर्वां समोर फक्त ५ मिनिटात …

Read More »

दिल्ली येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी निपाणीतील ऑटो, टॅक्सी चालक रवाना

निपाणी (वार्ता) : ऑटो,  बस, ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया (दिल्ली) तर्फे विविध मागण्यांसाठी सोमवारी (ता.६) दिल्ली जंतर- मंतरवर आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी निपाणी आणि परिसरातील ऑटो, टॅक्सी चालक दिल्लीकडे रवाना झाले. देशभरातील सर्व वाहनचालकांसाठी राष्ट्रीय आयोग स्थापन करावा, एग्रीगेटर कंपनीने देशभरात दुचाकी सेवा बंद करावी,  दिल्लीच्या सर्वोच्च …

Read More »

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने नामदेव चौगुले सन्मानित

  निपाणी (वार्ता) : सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कोल्हापूर येथील आभाळमाया या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार निपाणी येथील रहिवासी आणि अर्जुनी येथील विद्यामंदीरचे शिक्षक नामदेव चौगुले यांना शिक्षक आमदार जयंत आसगांवकर यांच्या हस्ते शाहू स्मारक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात देवून गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा पंचायतच्या शिक्षण …

Read More »

बोरगाव नगरपंचायतीचा ११ कोटी ६७ लाखाचा अर्थसंकल्प सादर

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील नगरपंचायतीचा सन २०२३-२४ सालाचा अंतिम सुधारित ११ कोटी ६७ लाख रुपयांचे अंदाजपत्रक प्रशासकीय अधिकारी, तहसीलदार प्रवीण कारंडे यांच्या अध्यक्षतेखाली सादर करण्यात आले. यामध्ये ७१ हजार ८२२ रुपये शिलकीचा मूळ अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थसंकल्पामध्ये शहरातील रस्ते, गटारी, स्वच्छता, पाणीपुरवठा, पथदिवे, उद्याने, घनकचरा प्रकल्प यासह मूलभूत …

Read More »

हदनाळ कालव्याला पाणी आले, विजेचे काय?

  हदनाळ शेतकऱ्यांचा प्रश्न : शेतीच्या पाण्यासाठी भटकंती कोगनोळी : हदनाळ तालुका निपाणी येथील कालव्याला गुरुवार तारीख 2 रोजी पाणी आले आहे. यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत असले तरी वारंवार वीज खंडित होत असल्याने शेतीला पाणी द्यायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांत निर्माण झाला आहे. महाराष्ट्र पाटबंधारे विभागाकडे वारंवार मागणी …

Read More »

कर्नाटकाच्या समग्र विकासासाठी भाजपला निवडून द्या : राजनाथ सिंह

  खानापूर : पंतप्रधान मोदी यांच्या कणखर धोरणांमुळे भारताचा मानसन्मान जगभरात वाढला आहे. जोपर्यंत देशात भाजपचे सरकार आहे तोपर्यंत मोदी पंतप्रधान राहतील. देशांप्रमाणेच कर्नाटकाचा समग्र विकास करण्याचे मोदींचे आणि भाजपचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी येत्या निवडणुकीत कर्नाटकात 2/3 स्पष्ट बहुमताने भाजपला निवडून द्या, असे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. …

Read More »

नंदगडच्या कन्या विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित कन्या विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पुंडलिक हनुमंतराव चव्हाण होते. तर प्रमुख वक्ते म्हणून वैयक्तिक सल्लागार आणि संस्कृती एज्युक्युअरचे संस्थापक तेजस कोळेकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून भुवराह खानापूर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडचे …

Read More »

मणगुत्ती शास्त्री विद्यालयात मराठी भाषा दिन

  बेळगाव : मणगुत्ती ( ता. हुक्केरी) येथील द. म. शि. मंडळ संचलित लालबहाद्दूर शास्त्री विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डी. के. स्वामी होते. प्रारंभी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक स्वामी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवाजी हसनेकर म्हणाले, आपण आपल्या …

Read More »

बेळगावचे माजी पोलिस कमिश्नर भास्कर राव यांचा “आप”ला रामराम; भाजप प्रवेश

  बेंगळुरू : कर्नाटकात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला जोरदार झटका बसला आहे. बेंगळुरूचे माजी पोलीस आयुक्त आणि आप नेते भास्कर राव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राज्यातील सत्ताधारी पक्ष भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भास्कर राव यांनी आज 1 मार्च रोजी भाजपचं सदस्यत्व घेतलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील यांनी …

Read More »

कर्नाटक सरकारी नोकर वर्गाच्या संपाला खानापूरातून एकमुखी पाठींबा

  खानापूर (प्रतिनिधी) : सरकारी नोकर वर्गाला सातवा वेतन लागू करा, जुनी पेन्शन लागु करा या मागणीसाठी नोकर संघाच्या वतीने बुधवारच्या संपाला खानापूर तालुक्यातून एकमुखी पाठींबा दिसुन आला. कर्नाटक राज्य नोकर संघ खानापूर तालुका घटक यांच्या वतीने बुधवार दि. १ मार्च रोजी खानापूरात सरकारी नोकर संघाच्या संपाला पाठींबा देत सरकारने …

Read More »