Tuesday , December 16 2025
Breaking News

कर्नाटक

सिद्धोजीराजे निपाणकर सरकार राजवाड्यात पिर-पंजांच्या स्थापना

  शेकडो वर्षाची परंपरा : सोमवारी विसर्जन सोहळा निपाणी (वार्ता) : येथे श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर सरकार यांच्या राजवाड्यामध्ये शेकडो वर्षाची परंपरा आज देखील कायम आहे. निपाणी व परिसरामध्ये पूर्व पंजे व पीर बसविण्याचा कार्यक्रम गुरुवारी (ता.4) प्रारंभ झाला. त्यानंतर निपाणकर राजवाड्यामध्ये देखील पीर व पंजे बसवून समीर मुजावर यांनी भक्ती …

Read More »

खानापूर नदीघाट पुलावरील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

  खानापूर (विनायक कुंभार) : मलप्रभा नदीघाटाजवळ पाणी अडविण्यासाठी नवीन बंधार्‍याच्या बाजूला असलेल्या रुमेवाडी नाका ते मारुतीनगर या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यात खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. पाणी अडविण्याचा बंधारा भक्कम झाला असला तरी रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतूक करणे कठीण झाले आहे. जुना पूल काढून याठिकाणी येथील नदीघाटनाजीक …

Read More »

कामात दिरंगाई करणार्‍यावर कारवाई

  नूतन तहसिलदार प्रवीण कारंडे : तहसीलदार पदाचा स्वीकारला पदभार निपाणी (वार्ता) : जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार येथील तालुका तहसीलदार म्हणून आपली नियुक्ती झाली आहे. यापूर्वी तहसीलदार कार्यालयातील अनुभव असून त्याच्या जोरावर सर्वसामान्यांची कामे मार्गी लावण्यासह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही नूतन तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी दिली. त्यांची …

Read More »

गर्लगुंजीतून ठिय्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा : गोपाळ पाटील यांचे आवाहन

  खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक सरकारकडून भाषिक अल्पसंख्याक कायद्याची पायमल्ली होत आहे. याची जाणीव करून देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने येत्या 8 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन होणार आहे. या ठिय्या आंदोलनाला गर्लगुंजी भागातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवून कर्नाटक सरकारला जाग आणावी, असे आवाहन खानापूर …

Read More »

संकेश्वर येथे “बर्निंग” कार

  संकेश्वर : बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर शहरात शुक्रवारी सकाळी एक मारुती ओम्नी कार आगीच्या भक्ष्यस्थानी गेली. बस स्थानकाजवळ येताच कारमधून धूर येत असल्याचे दिसत होते. लागलीच गाडीतील सर्व प्रवासी बाहेर पडले त्यामुळे पुढील अनर्थ टळला. नागरिकांच्या माहितीवरून अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून …

Read More »

खानापुरात लवकरच शाहिरी, भजन-भारुड कार्यशाळा

  खानापूर (विनायक कुंभार) : लोकसंस्कृती नाट्य कला खानापूर संस्थेच्या वतीने तालुकास्तरावर शाहिरी, भजन-भारुड कार्यशाळा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष अभिजीत कालेकर व ढोलकी पट्टू ज्ञानेश्वर सतार यांनी औरंगाबाद येथील शाहीर अजिंक्य लिंगायत व भारुडरत्न कैं. निरंजन भाकरे यांचे सुपुत्र शेखर भाकरे यांची भेट घेतली. सीमाभागात अनेक लोककला …

Read More »

हलशीत नागरिकांची एटीएमअभावी गैरसोय

  खानापूर (विनायक कुंभार) : भात पिकाच्या उत्पादनात अग्रेसर असणार्‍या या परिसरात एटीएमची व्यवस्था नसल्याने येथील नागरिकांची तसेच व्यापर्‍यांची फार मोठी समस्या होत असून हलशी येथे एटीएम मशीन उभारण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. तालुक्यातील मोठं गाव म्हणून ओळखले जाणारे हे गाव येथे एटीएम उपलब्ध नसल्याने नागरिकांना रक्कम काढण्यासाठी …

Read More »

करंबळ शाळेच्या खेळाडूंना खानापूर फिटनेस् क्लबकडून स्पोर्ट्स युनिफाॅर्म वितरण

खानापूर (प्रतिनिधी) : करंबळ (ता. खानापूर) येथील हायर प्रायमरी मराठी मुला- मुलींच्या शाळेच्या खेळाडूंना स्पोर्ट्ससाठी स्पोर्ट्स युनिफाॅर्म नितीन राजाराम पाटील ओनर खानापूर फिटनेस क्लब मि. बेळगांव व त्यांच्या पत्नी सौ. शिला नितीन पाटील यांनी केंद्र पातळीवरील स्पोर्ट्समध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंना उत्कृष्ट जर्सी व पॅन्ट देऊन मदत केली. यावेळी एसडीएमसी अध्यक्ष …

Read More »

टँकर – कार भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू

  यादगिरी : जिल्ह्यातील गुरमठकलजवळ टँकर आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला असून या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. रायचूर जिल्ह्यातील लिंगसगुरू तालुक्यातील हट्टी शहरातील एकाच कुटुंबातील 1 वर्षाच्या मुलीसह एकूण 6 जणांचा मृत्यू झाला. एका कारमध्ये एकूण सात जण प्रवास करत होते, तिघांचा जागीच मृत्यू झाला तर …

Read More »

नरेंद्र मोदींच्या काळात देशाच्या सर्वांगिण विकासाला गती

  अमित शहा, संकल्प से सिद्धी कार्यक्रमात सहभाग बंगळूर : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात सर्वच पंतप्रधानानी देशाच्या विकासात योगदान दिले आहे. परंतु नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या देशाच्या सर्वांगिण विकासाला गती मिळाली. आत्मनिर्भर देश म्हणून भारत पुढे येत आहे, असे प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी केले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि केंद्रीय …

Read More »