Sunday , December 14 2025
Breaking News

कर्नाटक

शिक्षक भरतीसाठी हलशीवाडी ग्रामस्थ आक्रमक, गट गटशिक्षणाधिकारी कार्यालयात छेडले आंदोलन

खानापूर : गेल्या सहा वर्षांपासून शिक्षक भरती करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने आक्रमक झालेल्या हलशीवाडी ग्रामस्थांनी मंगळवारी खानापूर गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच येत्या आठ दिवसात शिक्षक उपलब्ध करून दिल्यास दररोज गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शाळा भरविण्याचा इशारा देण्यात आला आहे. हलशीवाडी येथिल सरकारी मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या चांगल्या प्रमाणात आहे. …

Read More »

‘सरळ वास्तू’चे प्रख्यात ज्योतिषी चंद्रशेखर गुरुजी यांची निर्घृण हत्या

हुबळी : ‘सरळ वास्तू‘चे जगप्रसिद्ध ज्योतिषी चंद्रशेखर गुरुजी यांची हुबळीत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.होय, ‘सरळवास्तू’ या वास्तुशास्त्र मार्गदर्शन संस्थेच्या माध्यमातून प्रसिद्धीस आलेले प्रख्यात वास्तुतज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची आज मंगळवारी हुबळीतील उणकल परिसरातील एका खासगी हॉटेलमध्ये अज्ञात मारेकऱ्यांनी चाकूने वार करून निर्घृण हत्या केली. हत्येनंतर …

Read More »

कोगनोळी परिसरात पावसाची दमदार हजेरी

पिकांना पोषक वातावरण : शेतकरी वर्गातून समाधान कोगनोळी : कोगनोळी सह परिसरातील हणबरवाडी, दत्तवाडी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, आप्पाचीवाडी, हदनाळ आदी परिसरात सोमवार तारीख चार पासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. सुरुवातीला झालेल्या पावसामुळे या विभागातील शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणात सोयाबीन पेरणी करून घेतली …

Read More »

जांबोटी विद्यालयात दहावीच्या परीक्षेत ८० टक्क्यापेक्षा जास्त गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटी (ता. खानापूर ) येथील माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत ८० टक्क्यांहून जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका आप आदमी तालुका अध्यक्ष भैरू पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जांबोटी को- ऑप. सोसायटीचे चेअरमन विलास बेळगावकर, तसेच व्हाईस चेअरमन …

Read More »

खानापूर तालुक्यातील देगाव-मेंडील रस्त्याची दुरवस्था

खनापूर : खानापूर तालुक्यातील पश्चिम भागातील देगाव मेंडील भागातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अतिशय दुर्गम अश्या भागातील ही गावे विकासापासून नेहमी वंचित राहिली आहे. लोकप्रतिनिधी याकडे कधीतरी लक्ष देतील का? या प्रतिक्षेत या भागातील लोक आहेत. ऐन पावसाळ्याच्या सुरवातीलाच रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या भागात रस्त्याची नितांत गरज आहे. जंगल …

Read More »

रयत विद्या योजनेच्या धर्तीवर सफाई कामगारांच्या मुलांसाठी योजना

बेळगाव : कंत्राटी सफाई कामगाराना सेवेत कायमस्वरूपी ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून तात्विक मंजुरी देण्यात आली आहे. मात्र अंतिम निर्णय एक समितीद्वारे घेण्यात येणार असल्याचे शासनाकडून कळविण्यात आले आहे. येत्या तीन महिन्यात सदर समिती आपला अहवाल सादर करणार आहे. सफाई कामगारांच्या मागणीनुसार या कामगारांना कायमस्वरूपी सेवेत रुजू करण्याचा निर्णय होईपर्यंत समान कामासाठी …

Read More »

सुन्नत जमाततर्फे मान्यवरांचा सत्कार गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर सुन्नत जमात तंजिम कमिटीकडून नुकताच मान्यवरांचा सत्कार आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ बरकत हाॅलमध्ये संपन्न झाला. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत श्रीमती ए.एम कोहली, समिराबानो गुत्ती यांनी केले. समारंभाचे अध्यक्षस्थान सुन्नत जमात तंजिम कमिटीचे अध्यक्ष हाजी हुसैनसाहेब मोकाशी यांनी भूषविले होते. समारंभात पदोन्नती मिळविलेले श्रीमती समरीन एस. कमते …

Read More »

वल्लभगड श्री शारदा शाळेत पर्यावरण दिन, डाॅक्टर्स डे साजरा.

संकेश्वर (महंमद मोमीन) : वल्लभगड येथील विद्या संवर्धन शिक्षण संस्था संचलित श्री शारदा पूर्व प्राथमिक शाळेत नुकतेच पर्यावरण दिन, वसुंधरा दिन आणि डाॅक्टर्स‌‌‌ डे उत्साही वातावरणात साजरे करण्यात आले. कार्यक्रमात शाळेचे अध्यक्ष अनंत भोसले यांचे हस्ते संकेश्वरचे सेवाभावी डॉ. सुनिल आळतेकर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. सुनिल …

Read More »

संकेश्वरचे स्वामीजी भक्तीमार्ग दाखविणारे : श्री राघवेंद्र महास्वामीजी

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजी हे भक्तांना भक्तीमार्ग दाखविणारे, धर्माची शिकवण देणारे असल्याचे श्री राघवेंद्र स्वामी मठ मंत्रालयचे श्री सुबूंधेंद्र तीर्थ महास्वामीजींनी सांगितले. नुकतीच मंत्रालय श्रींनी संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाला भेट देऊन संकेश्वर स्वामीजींबदल गौरवोद्गार काढले. मंत्रालयाचे श्री सुबूंधेंद्र …

Read More »

मणतुर्गे येथील सरकारी मराठी मुलामुलींच्या शाळा सुधारणा समिती अध्यक्षस्थपदी प्रल्हाद मादार यांची निवड

खानापूर : सरकारी मराठी मुलामुलींची शाळा मणतुर्गे येथील शाळा सुधारणा समितीची रचना सोमवार दिनांक ४ जुलै २०२२ रोजी शाळेच्या सभागृहात बिनविरोध पार पडली. सभेचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री. ओ. एन. मादार हे होते. यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष म्हणून प्रल्हाद मादार यांची निवड झाली तर उपाध्यक्ष पदी प्रदीप पाटील यांची …

Read More »