Sunday , December 14 2025
Breaking News

कर्नाटक

काँग्रेसच्या प्रकाश हुक्केरी, सुनील संक यांचे उमेदवारी अर्ज दाखल

बेळगाव : येत्या 13 जून रोजी होणार्‍या वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. शिक्षक मतदारसंघातून माजी मंत्री प्रकाश हुक्केरी यांनी तर पदवीधर मतदारसंघातून सुनील संक यांनी अर्ज दाखल केले. वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. …

Read More »

निपाणीत पहिल्यांदाच महिलांना उद्घाटनाचा मान

निपाणीत ‘नरेंद्र चषक’ फुटबॉल स्पर्धा ; दिवंगत नितीन शिंदे यांची जयंती निपाणी( वार्ता) : येथील निपाणी फुटबॉल अकॅडमीचे सदस्य दिवंगत नितीन शिंदे यांच्या स्मरणार्थ मंगळवारी शिंदे परिवाराच्या सहकार्याने निपाणी फुटबॉल अकॅडमीतर्फे समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या मैदानावर आयोजित स्पर्धेचे उद्घाटन सायंकाळी धनश्री शिंदे, सुनीता शिंदे, वैशाली शिंदे, शोभा साळोखे यांच्या हस्ते व …

Read More »

पंचायत निवडणुका ; १२ आठवड्यात सीमांकन, ओबीसी आरक्षण पूर्ण करा

कर्नाटक उच्च न्यायालयाचे निर्देश बंगळूर : कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला १२ आठवड्यांत प्रभागांचे सीमांकन पूर्ण करण्याचे आणि इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) आरक्षण निश्चित करण्याचे निर्देश दिले. यानंतर एका आठवड्याच्या आत, राज्य निवडणूक आयोगाला (एसईसी) निवडणूक प्रक्रियेची अधिसूचना द्यावी लागेल, असे स्पष्ट करताना न्यायालयाने आदेश दिले की, राज्य सरकारने सदरची …

Read More »

श्री तुळजाभवानी गोंधळी समाजातर्फे रामचंद्र भोसले यांचा सत्कार

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री तुळजाभवानी गोंधळी समाजातर्फे संकेश्वर हाॅटेल संघटनेचे नूतन अध्यक्ष रामचंद्र भोसले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना रामचंद्र भोसले म्हणाले, तुळजाभवानी गोंधळी समाजाचा सत्कार आपणाला निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. संकेश्वरातील हाॅटेल व्यवसायाला चांगली दिशा देण्याचे काम आपण प्रामाणिकपणे करुन दाखविणार आहोत. यावेळी तुळजाभवानी गोंधळी समाजाचे …

Read More »

दहावी परिक्षेत कु. प्रिया बस्तवाडी गुणवत्ता यादीत

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर स्वामी विवेकानंद कन्नड माध्यम शाळेची विद्यार्थिनी कुमारी प्रिया कुमार बस्तवाडी हिने दहावी बोर्डाच्या परीक्षेत ९७.१२% गुण संपादन करुन गुणवत्ता यादीत आपले नाव नोंदविले आहे. कुमारी प्रिया बस्तवाडी हिचे विशेष अभिनंदन स्वामी विवेकानंद कन्नड माध्यम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महेश देसाई, सचिव श्रीमती एम. के.पाटील, शाळेचे मुख्याध्यापक नविन …

Read More »

संकेश्वरात दिवसाढवळ्या ३.७५ लाख रुपयांची धाडशी चोरी

आदर्शनगर ५ क्राॅस येथे चोरीची घटना; औषध विक्रेते चोरांचे टार्गेट संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर आदर्श नगर ५ क्राॅस येथील प्रतिष्ठित नागरिक, जगदंबा मेडिकल स्टोअर्सचे मालक जयप्रकाश सावंत यांच्या जगदंबा निवासस्थानी सोमवार दि. २३ मे २०२२ रोजी दुपारी १.३० ते ४ वाजता दरम्यान अज्ञात चोरांनी घराचे कुलूप तोडून दिवसाढवळ्या ३.७५ …

Read More »

मन्सापूरच्या ग्रा. पं. सदस्य रिचर्ड मिनिजीसने साकारली कृषी होडाची योजना

खानापूर (प्रतिनिधी) : भारत हा कृषी प्रदान देश आहे. कृषी खात्याच्यावतीने अनेक योजना शेतकरी वर्गाला मिळत आहेत. खानापूर तालुक्यातील मन्सापूरचे ग्रा. पं. सदस्य रिचर्ड मिनिजीस यांनी मन्सापूर येथील सर्वे नंबर ८४/ ४ शेतात कृषी होडा योजना राबवून शेतकरी वर्गाला एक आदर्श दाखवला आहे. त्यांनी आपल्या शेतात कृषी खात्याच्यावतीने ७० फूट …

Read More »

विधान परिषदेसाठी भाजप वतीने लक्ष्मण सवदी यांना उमेदवारी

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या वतीने कर्नाटक राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आपल्या पक्षाच्या उमेदवारांची यादी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंग यांनी जाहीर केली आहे. यादी अनुसार भारतीय जनता पक्षाच्या वतीने विधान परिषदेसाठी चलवादी नारायणस्वामी, श्रीमती हेमलता नायक, एस. केशव प्रसाद व लक्ष्मण सवदी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. …

Read More »

खानापूर भाजपच्यावतीने एसएसएलसी परीक्षेत तालुक्यात व्दितीय आलेल्या प्रियांका देवलतकरचा सत्कार

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत ताराराणी हायस्कूलची विद्यार्थीनी व मणतुर्गा गावची प्रियांका पुंडलिक देवलतकर हिने दहावीच्या परीक्षेत ६१७ मार्क (९८.७२) घेऊन तालुक्यात द्वितीय येण्याचा मान मिळविला. त्यामुळे मणतुर्गा गावाचे नाव तालुक्यात प्रसिध्द केले. म्हणून भाजप तालुका सेक्रेटरी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली …

Read More »

कोल्हापूर- बंगळूर बसचा हुबळीजवळ भीषण अपघात, ८ ठार, २८ जखमी

बेळगाव : कोल्हापूरहून बंगळूरकडे जाणारी खासगी बस आणि तांदूळ वाहून नेणारा ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन 8 जण ठार झाले आहेत. मध्यरात्री 12 च्या सुमारास हुबळी जवळ तारीहाल क्रॉस नामक फाट्याजवळ हा अपघात झाला. मृतांमध्ये ट्रक चालक, वाहक तसेच आणखी एकटा आणि बसमधील चार प्रवाशांचा समावेश आहे. बाबासाब (55, चिकोडी), …

Read More »