माजी आमदार काकासाहेब पाटील: निपाणीत कार्यकर्त्यांचा मेळावा निपाणी (वार्ता) : देशात पुरोगामी चळवळ निरंतरपणे सुरू आहे. तत्कालीन समाज व्यवस्थेवर असूड ओढणारे समाजसुधारकांना भाजप सरकार बाजूला करत आहे. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, गौतम बुद्ध, यासारख्या महापुरुषांनी देशात पुरोगामी चळवळ बळकट …
Read More »ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी रयत संघटनेतर्फे कारखानदारांना निवेदन
निपाणी (वार्ता) : सन २०२१-२२ गळीत हंगामातील ऊसाचा दुसरा हप्ता त्वरित द्यावा. चालू गळीत हंगामातील ऊसाचा दर जाहीर करूनच यंदाचा हंगाम सुरू करावा, यासह विविध मागण्यांचे निवेदन कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हरित सेनेतर्फे राज्याध्यक्ष चुनापा पुजारी, चिकोडी जिल्हाध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली कारखानदारांना देण्यात आले. निवेदनातील माहिती अशी, …
Read More »दोड्डहोसुरात माजी ग्रा. पं. सदस्याकडून स्वखर्चाने स्मशानभूमीचे सपाटीकरण
खानापूर (प्रतिनिधी) : दोड्डहोसुर (ता. खानापूर) गावाला स्मशानभूमीची समस्या गेल्या कित्येक वर्षांपासून भेडसावत आहे. याची दखल घेत गावापासून जवळ असलेल्या डोंगरातील दीड एकर गावठाणात माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील यांनी स्वखर्चातून १० तास जेसीबीच्या सहाय्याने जमिन सपाटीकरण करून स्मशानभूमीची व्यवस्था केली. यावेळी माजी मुख्याध्यापक एन. एम. पाटील यांनी या …
Read More »कौलापूरवाड्यात पारायण सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवण्याचा कार्यक्रम संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : कौलापूरवाड्यात (ता. खानापूर) येत्या कार्तिकी वारी रोजी दीड दिवसाचा पारायण सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवण्याचा कार्यक्रम बुधवारी दि. २ रोजी पार पडला. पहिल्यांदाच कौलापूरवाड्यात दीड दिवसाचा पारायण सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्याला खानापूर तालुक्यातील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार, अशी माहिती खानापूर तालुका आम आदमी अध्यक्ष भैरू …
Read More »मुख्यमंत्री बसवराज बोम्मई 9 नोव्हेंबर रोजी खानापूरात
खानापूर (तानाजी गोरल) : कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची 9 नोव्हेंबर रोजी खानापूर जांबोटी क्रॉस येथील श्री मलप्रभा क्रीडांगणावर भारतीय जनता पार्टीची जाहीर सभा होणार व राज्यातील अनेक दिग्गज नेते मंडळी उपस्थित राहणार असून त्या संबंधी चर्चा करण्यासाठी आज भारतीय जनता पक्षाची बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी बैठकीला मार्गदर्शन …
Read More »युद्ध, कोविड असूनही भारतात विक्रमी गुंतवणूक
पंतप्रधान नरेंद्र मोदी, बंगळूरातील गुंतवणुकदारांच्या मेळाव्याचे उद्घाटन बंगळूर : युद्ध आणि कोविड महामारीचे परिणाम असूनही जग भारताकडे पाहत आहे. देश विक्रमी गुंतवणूक आकर्षित करत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘इन्व्हेस्ट कर्नाटक २०२२’ या बंगळूरातील जागतिक गुंतवणुकदारांच्या मेळाव्याचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान बोलत होते. या …
Read More »महापुरुषांचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी चळवळ
माजी मंत्री सतीश जारकीहोळी : मानव बंधुत्व वेदिकेचा उपक्रम निपाणी (वार्ता) : देश आणि राज्यांमध्ये भाजप सरकार आल्यापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, संत गाडगेबाबा महाराज त्यांचे विचार संपवण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे कर्नाटक राज्य मानव बंधुत्व वेदिकेच्या माध्यमातून गेल्या …
Read More »निपाणीत किल्ला प्रतिकृतीचे उद्घाटन
बालचमुंनी साकारले अनेक गड किल्ले : पाहण्यासाठी इतिहास प्रेमींची गर्दी निपाणी(वार्ता) : दिवाळीनिमित्त निपाणी शहर आणि उपनगरात बाराच्या मुरली विविध प्रकारचे गडकिल्लेची प्रतिकृती साकारली आहे. ते पाहण्यासाठी इतिहास प्रेमींची गर्दी होऊ लागली आहे. येथील दलाल पेठ माणिक नगर परिसरातील विघ्नहर्ता तरूण मंडळ (व्हीटीएम बॉईज) च्या कार्यकर्त्यांनी निर्माण केलेल्या किल्ले राजगड …
Read More »प्रवाशांची धोकादायक वाहतूक निपाणी आगाराने थांबवावी
आम आदमी : आगार प्रमुखांना निवेदन निपाणी (वार्ता) : निपाणी परिसर व ग्रामीण भागातील हजारोंच्या संख्येने दररोज विद्यार्थ्यांची वाहतुक होत असते. बसेसची संख्या नगण्य असल्याने विद्यार्थ्यांना वाहतुकीचा प्रश्न सतावत आहे. त्यामुळे असंख्य विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून बसमध्ये गर्दी करून अक्षरश: चेंगराचेंगरीच्या परिस्थितीत आपले गाव गाठतात. प्रसंगी बसमध्ये उभे …
Read More »निपाणी पोलिसांना सॅल्यूट!
निरंतर कार्यवाहीमुळे लागली वाहतुकीला शिस्त : वाहनधारकासह नागरिकांतून समाधान निपाणी (वार्ता) : काही महिन्यांपासून निपाणी शहरातील सर्वच रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत आहे. अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने दसरा, दिवाळीसह आठवडी बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहने थांबविण्यासाठी जागा शिल्लक नाही. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनधारक रस्त्यावर वाहने लावून तासनतास खरेदी करीत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta