खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटी (ता. खानापूर) येथील दि. जांबोटी मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या वतीने बुधवारी दिनदर्शिकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच मॅरेथॉनमधील विजयी स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि. जांबोटी मल्टीपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक चेअरमन विलासराव बेळगांवकर उपस्थित होते. तर व्यासपीठावर उपाध्यक्ष पुंडलिक नाकाडी, नगराध्यक्ष नारायण मयेकर, नगरसेवक विनोद पाटील, अर्बन बॅंक चेअरमन श्री. शेलार, पीएचडी बँकचे चेअरमन मुरलीधर पाटील, समितीचे नेते यशवंत बिर्जे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी उपाध्यक्ष पुंडलिक नाकाडी यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले. तर उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दि. जांबोटी मल्टीपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे औचित्य साधून खानापूर नगरपंचायतीच्या नुतन, नगराध्यक्षाचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला.
तसेच मॅरेथॉन स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकाना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेल्या बक्षिसाचे वितरण करण्यात आले. यावेळी संचालक संचालक मनोहर डांगे, यशवंतराव पाटील, मारूती मादार, विद्याधर बनोशी, खाचापा काजुनेकर, विश्व भारती क्रीडा संकुलन कार्यदर्शी भैरू पाटील, आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संस्थापक विलासराव बेळगांवकर म्हणाले की, आमच्या सोसायटीला ३० वर्षे पूर्ण झाली. यापूर्वी ही सामाजिक बांधिलकी ओळखून विविध उपक्रम राबविले आहेत. तेव्हा यंदाही सालाबादप्रमाणे दिनदर्शिका प्रकाशन करत आहोत, असे सांगितले.
उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाला सोसायटीचे मॅनेजर, कर्मचारी वर्ग उपस्थित होता.