खानापूर (प्रतिनिधी) : यंदाच्या पावसामुळे कक्केरी (ता. खानापूर) येथील शेतकरी इराप्पा नाडगौडा या गरीब शेतकऱ्यांचे घर कोसळून ९ महिने उलटून गेले. तरी तालुक्याच्या आमदारांनी तसेच शासकीय अधिकारी वर्गाने कोणतीच नुकसानभरपाई देण्याचे सहकार्य दाखवले नाही. याची माहिती बेळगांव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी कक्केरी गावाला भेट देऊन गरीब शेतकरी इराप्पा नाडगौडा …
Read More »श्री लक्ष्मी- नरसिंह -मंदिरामध्ये शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात
सौंदलगा (वार्ताहर) : सौंदलगा गावाचे ग्रामदैवत श्री लक्ष्मी- नरसिंह असून या मंदिरात वर्षातून दोन वेळा नवरात्रोत्सव होत असतो. पहिला श्री नरसिंह जयंतीच्या अगोदर नऊ दिवस व दुसरा शारदीय नवरात्रोत्सव घटस्थापने पासून सुरू होतो. या दोन्ही नवरात्रोत्सवास भाविक मोठ्या भक्ती भावाने उपवासास बसतात. घटस्थापनेपासून या उपवासास सुरुवात होते. घटस्थापने दिवशी …
Read More »पीएफआयवर छापे, राज्यातील ८० जणांना अटक
राज्यातील १२ जिल्ह्यात दोन टप्प्यात कारवाई बंगळूर : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) विरुद्धची कारवाई सुरू ठेवत, कर्नाटक पोलिसांनी मंगळवारी (ता. २७) पहाटे दोन टप्प्यात छापे टाकले आणि राज्यभरात सुमारे ८० लोकांना अटक केली. प्राथमिक पोलिसांच्या अहवालानुसार, राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये छापे टाकण्यात आले. बागलकोट, कोलार, बेळगाव, चित्रदुर्ग, कोप्पळ, चामराजनगर, रायचूर, …
Read More »क्रायोजेनिक इंजिनचे उत्पादन विज्ञान क्षेत्रातील एक मैलाचा दगड
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, एकात्मिक क्रायोजेनिक इंजिन निर्मिती सुविधेचे उद्घाटन बंगळूर : प्रगत तंत्रज्ञानाखाली क्रायोजेनिक इंजिनचे उत्पादन हा देशाच्या विज्ञान क्षेत्रातील एक मोठा मैलाचा दगड आहे. अंतराळ उपग्रह वाहकांसाठी क्रायोजेनिक इंजिन आवश्यक आहे. एचएएल हा १९९३ पासून इस्रोच्या अंतराळ संशोधनाचा कणा आहे, असे मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी येथे …
Read More »सिद्धरामय्याच पेसीएम मुख्यमंत्री : प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील
अंकली (प्रतिनिधी) : राज्यात कोणी पेमेंट मुख्यमंत्री असेल तर ते सिद्धरामय्याच होते, राज्यात पीएफआय आणि एसडीपीआयच्या वाढीला माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्याच जबाबदार आहेत असा गंभीर आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी केला. नलिनकुमार कटील यांनी मंगळवारी विजापुरातील सिद्धेश्वर आश्रमाला भेट दिली. या दरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, सिद्धरामय्या …
Read More »पारिश्वाडच्या बसवेश्वर विविध उद्देशीय सौहार्द सहकारी सोसायटीची वार्षिक सभा संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : पारिश्वाड (ता. खानापूर) येथील बसवेश्वर विविध उद्देशीय सौहार्द सहकारी सोसायटीची १२वी वार्षिक सभा नुकतीच पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन सुभाष गुळशेट्टी होते. सदाशिव देवरमनी यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. सभेची सुरूवात ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले. …
Read More »पंडित कैवल्यकुमार गुरव यांना फ्रान्स विद्यापीठाची डाॅक्टरेट
संकेश्वर : किराणा घराण्याचा गायकीचा वारसा समथ॔पणे पुढे नेणारे पंडित कैवल्यकुमार गुरव यांना फ्रान्समधील सोरेबाॅन विद्यापीठाने डाॅक्टरेट पदवीने सन्मानित केले. सोरेबाॅन विद्यापीठाला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. जागतिक दर्जाच्या ञ असणारे हे विद्यापीठ आहे. पंडित कैवल्यकुमार गुरव यांनी शास्त्रीय गायनातील ‘रियाज’ यावर केलेल्या विशेष संशोधनाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू थाॅमस प्रेड यांच्या …
Read More »शुभकार्य मित्र मंडळातर्फे नवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
27 व्या मूर्तीची प्रतिष्ठापना : दर्शनासाठी भाविकांची गर्दी निपाणी (वार्ता) : येथील प्रगती नगरातील दक्षिणाभिमुख श्री दुर्गामाता नवरात्र मंडळातर्फे नवरात्र उत्सवानिमित्त दुर्गामाता मूर्तीची प्रतिष्ठापना केली असून नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती संयोजकांनी दिली. आकाश घुगरे, सुरज चव्हाण (गुंड्या) व प्रथमेश घाटगे यांच्याकडून देवीची उत्सव मूर्ती देण्यात आली. …
Read More »टेम्पो दुचाकीच्या अपघातात बोरगावचा युवक ठार
निपाणी (वार्ता) : बोरगाव इचलकरंजी रस्त्यावर मालवाहतूक टेम्पो व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात बोरगावचा युवक जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी (ता.26) सायंकाळी घडली. रामा कृष्णा सनदी (वय 32) असे या घटनेतील मृत युवकाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मृत रामा हा शहरातील खंडेलवाल …
Read More »मंदिराचे पावित्र्यता राखणे ही सर्वांची जबाबदारी
उत्तम पाटील : बोरगावमधील योळमक्कळ ताई मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना निपाणी (वार्ता) : ताणतणावाच्या युगात सध्या अध्यात्म ही काळाची गरज बनली आहे. यासाठी प्रत्येक खेडोपाड्यात अध्यात्मिकतेला विशेष असे महत्त्व दिले जात आहे. मठ मंदिरावरूनच गावाची खरी ओळख होत आहे. अशा मंदिरांची, देव देवतांचे पवित्रता राखणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे मत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta