Monday , December 8 2025
Breaking News

कर्नाटक

धुमधडाक्यात मराठा मंडळाच्या स्पोर्ट्स मेनिया २०२५ प्रारंभ होणार!

  खानापूर : मराठा मंडळ शिक्षण संस्थेचा आज वर्धापन दिन तसेच स्त्री शिक्षणाची नांदी करणाऱ्या सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून बहुजन समाजाच्या शिक्षणाची परवड थांबविण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या या शिक्षण संस्थेने खेळाडू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून एक अभिनव क्रीडा उपक्रम हाती घेतला आहे. मराठा मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांच्या …

Read More »

धारवाडला स्वतंत्र महापालिकेचा दर्जा

  हुबळी-धरवाड महापालिकचे विभाजन बंगळूर : हुबळी-धारवाड महानगर पालिकेचे विभाजन करून स्वतंत्र धारवाड महानगर पालिकेच्या निर्मितीला गुरूवारी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यामुळे आता हुबळी आणि धारवाड या दोन स्वतंत्र महापालिका अस्तित्वात येणार आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानसौध येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हुबळीपासून धारवाडला तात्काळ वेगळे करून महानगर पालिका स्थापन …

Read More »

राज्यात बसच्या तिकीट दरात १५ टक्के वाढ

  नवीन वर्षाचा प्रवाशांना धक्का; दरवाढ पाच जानेवारीपासून लागू बंगळूर : राज्य सरकारने बस प्रवाशांना नवीन वर्षासाठी झटका दिला आहे, गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ (केएसआरटीसी) आणि बंगळुर मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (बीएमटीसी) सह चार महामंडळांच्या बस तिकीट दरात १५ टक्याने वाढ करण्यास मंजूरी देण्यात आली. ही …

Read More »

शिंदोळी खुर्द येथे विठ्ठल रुखुमाई मंदिराचा उदघाटन सोहळा व कळसारोहण मोठ्या उत्साहात संपन्न

  खानापूर : मौजे शिंदोळी खुर्द तालुका खानापूर येथे बुधवार दिनांक 25 आणि 26 रोजी श्री विठ्ठल रखुमाई मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर मंदिर जुने होते त्याचा जिर्णोद्धार करण्याचा संकल्प गावातील सर्व युवावर्ग आणि ग्रामस्थांनी घेतला. जवळजवळ दोन ते अडीच वर्ष मंदिरचे काम चालू होते. …

Read More »

अमृत महोत्सव सत्कारमुर्ती व सहस्त्रचंद्र दर्शन सत्कारमूर्तींचा सत्कार!

  खानापूर : खानापूर तालुका मराठी प्राथमिक सेवानिवृत्त शिक्षक संघाचा १४ वा अमृत महोत्सव सोहळा सोमवारी दि./३० डिसेंबर रोजी शिवस्मारकात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष डी. एम. भोसले होते. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन आमदार विठ्ठलराव हलगेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, माजी अध्यक्ष विलास बेळगांवकर, पीएलडी बँक अध्यक्ष …

Read More »

थर्टी फस्टला मद्यपींनी रिचवले ३०८ कोटींचे मद्य!

  बंगळूर : नव्या वर्षाच्या स्वागतानिमित्त आयोजित पार्ट्या आणि इतर ठिकाणी मद्याला मोठी मागणी होती. थर्टी फर्स्टच्या केवळ अर्ध्याच दिवसात राज्य पेय महामंडळाने ३०८ कोटींची मद्यविक्री केली. यातून कोट्यवधींचा अबकारी कर वसूल झाला. गतवर्षी १९३ कोटींची मद्यविक्री झाली होती. त्या तुलनेत यंदा दीडपट अधिक विक्री झाली. मंगळवारी (दि. ३१) राज्यातील …

Read More »

शेतकरी, कष्टकऱ्यांमुळेच सहकार टिकला : विलास बेळगावकर

  जांबोटी सोसायटीच्या खानापूर शाखेचा रौप्य महोत्सव खानापूर : आज सहकार क्षेत्र ऐन उमेदीत असताना ही चळवळ चालविणे कठीण झाले आहे. सर्वसामान्यांच्या आर्थिक गरजांसाठी सहकार टिकणे आवश्यक आहे. शेतकरी व कष्टकऱ्यांनीच सहकार टिकवला आहे. तो वाढवण्याची सगळ्यांची जबाबदारी आहे, असे मत जांबोटी मल्टिपर्पज सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष विलास बेळगावकर यांनी व्यक्त …

Read More »

राज्याच्या मजबूत अर्थव्यवस्थेसाठी प्रयत्न करा : मुख्यमंत्री सिध्दरामय्या

  वरिष्ठ आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांशी संवाद बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यातील लोकांची आर्थिक शक्ती वाढवण्यासाठी आणि प्रादेशिक असमतोल आणि असमानता दूर करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अधिक प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन केले. विधानसौधच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये त्यांनी वरिष्ठ आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. जीवनातील चढ-उतार हे …

Read More »

नवीन वर्षात मंत्रिमंडळ पुनर्रचनेचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

  आत्महत्या प्रकरणात खर्गेविरोधात पुरावा नसल्याचा निर्वाळा बंगळूर : कंत्राटदार आत्महत्या प्रकरणात मंत्री प्रियांक खर्गे यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी सांगितले. दरम्यान, मंत्रिमंडळ पुनर्रचेबाबत नवीन वर्षात कॉंग्रेस हायकमांड निर्णय घेईल, असे सांगून त्यांनी मंत्रिमंडळ पुनर्रचनेचे संकेत दिले. आज शहरात पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले की, आत्महत्या …

Read More »

सैनिकांच्याप्रति आदर बाळगा : प्रा. मधुकर पाटील

  सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांचा सन्मान सोहळा निपाणी (वार्ता) : बंदूक आणि पेनाचे समाजात महत्त्वाचे योगदान आहे. देश सेवेसाठी शहीद होणे, गोळ्या घेणे मोठे काम आहे. देशासाठी झटणाऱ्या सैनिकांचा मानसन्मान करून त्यांचा आदर्श घेणे आवश्यक आहे. सैनिकामुळेच देशाच्या सीमा सुरक्षित आहेत, असे मत इतिहास अभ्यासक प्रा. मधुकर पाटील यांनी …

Read More »