मुंबई : आयपीएल २०२४ च्या शेवटच्या सामन्यातही मुंबई इंडियन्सला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. लखनऊने मुंबईचा १८ धावांनी पराभव केला. वानखेडेवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने प्रथम खेळून २० षटकात २१४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ केवळ १९६ धावा करू शकला. मुंबईचा हा दहावा पराभव आहे. …
Read More »राजस्थान रॉयल्सची पराभवाची मालिका सुरूच; पंजाबकडून पराभूत
राजस्थान रॉयल्सला अखेरच्या टप्प्यातील खराब कामगिरीचा पुन्हा एकदा फटका बसला. पंजाब किंग्सने राजस्थानकडून विजय हिसकावून घेत ६ धावांनी पराभव केला. राजस्थानचा हा सलग चौथा पराभव ठरला आहे. सॅम करनची ६३ धावांची नाबाद खेळी पंजाबसाठी निर्णायक ठरली. तर जितेश शर्मा आणि आशुतोष शर्माने शानदार फटकेबाजीसह संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. …
Read More »दिल्लीने लखनऊवर मिळवला विजय अन् राजस्थान रॉयल्सने प्लेऑफमध्ये मारली धडक
रसिख दर सलामच्या अखेरच्या षटकातील शानदार गोलंदाजीसह दिल्लीने लखनऊवर १९ धावांनी विजय मिळवला. फलंदाजी करताना अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्सचे अर्धशतक आणि शाई होप, ऋषभ पंतच्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्लीने २०८ धावा केल्या. या विजयासह दिल्लीने आपले प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. पण दिल्लीच्या विजयासह राजस्थान रॉयल्सचा संघ आयपीएल २०२४ प्लेऑफमध्ये जाणारा …
Read More »१ जुलैपासून टीम इंडियाला नवीन कोच मिळणार; बीसीसीआयने अर्ज मागविले
मुंबई : पुढील महिन्यात अमेरिकेत होणाऱ्या टी २० वर्ल्डकप स्पर्धेनंतर टीम इंडियाला नवीन कोच मिळणार आहे. यासाठी बीसीसीआयने तयारी सुरु केली असून सोमवारी नवीन प्रशिक्षकपदासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत. राहुल द्रविड सध्या भारतीय संघाचा कोच आहे. त्याचा कार्यकाळ वाढविण्यात आला होता. तो देखील इच्छुक असेल तर अर्ज करू शकणार …
Read More »रॉयल चॅलेजर्स बंगळुरुने ४७ धावांनी उडवला दिल्ली कॅपिटल्सचा धुव्वा
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएल २०२४ मधील ६२वा सामना पार पडला. एम. चिन्नास्वामी स्टेडियम खेळल्या गेलेल्या सामन्यात आरसीबीने ४७ धावांनी सलग पाचवा विजय मिळवत आपल्या प्लेऑफ्सच्या आशा कायम ठेवल्या. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने रजत पाटीदारच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर १८७ धावा केल्या होत्या. त्यानंतर आपल्या …
Read More »चेन्नई सुपर किंग्जच्या प्लेऑफ्सच्या आशा कायम; चेन्नईचा राजस्थानवर ५ गडी राखून विजय
एमए चिदंबरम स्टेडियमवर आयपीएल २०२४ मधील ६१ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सवर ५ विकेटसनी मात करत प्लेऑफ्सच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्सचा हा सलग तिसरा पराभव आहे. त्यामुळे राजस्थान रॉययल्सच्या अडचणी काही प्रमाणात …
Read More »कोलकाता प्लेऑफ्समध्ये; मुंबईवर दणदणीत विजयासह बाद फेरी गाठणारा पहिलाच संघ
कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर पावसाचा व्यत्यय आल्यामुळे १६-१६ षटकांचा करण्यात आलेल्या सामन्यात केकेआरने मुंबई इंडियन्सवर १८ धावांनी विजय मिळवला. त्याचबरोबर आयपीएल २०२४ मधील हंगामात बाद फेरी गाठणारा पहिलाच संघ ठरला आहे आहे. या अगोदर दोन वर्ष प्राथमिक फेरीत गाशा गुंडाळलेल्या या संघाने यंदाच्या हंगामात गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली शानदार पुनरागमन केले. …
Read More »गिल-सुदर्शनच्या शतकांसह गुजरातचा चेन्नईवर विजय
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा ३५ धावांनी पराभव केला आहे. या विजयासह गुजरातने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. त्याचवेळी चेन्नईच्या पराभवामुळे प्लेऑफची शर्यत रोमांचक बनली आहे. गुजरातच्या या विजयाने आरसीबीला प्लेऑफमध्येही जिवंत ठेवले आहे. प्रथम खेळताना गुजरात टायटन्सने २० षटकांत ३ बाद २३१ धावा केल्या …
Read More »बंगळुरूचा पंजाबवर ६० धावांनी मोठा विजय
आयपीएल २०२४ च्या स्पर्धेत मुंबई इंडियन्सपाठोपाठ पंजाब किंग्ज संघाचं आव्हान संपुष्टात आलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पंजाबवर ६० धावांनी खणखणीत विजय मिळवला. या विजयासह बंगळुरूने प्लेऑफ्स अर्थात बाद फेरीच्या आशा जिवंत राखल्या आहेत. मात्र, पंजाबसाठी प्लेऑफचा रस्ता बंद झाला आहे. विराट कोहलीची ९२ धावांची खेळी बंगळुरूच्या विजयाचं वैशिष्ट्य ठरलं. …
Read More »हरली लखनौ, पण आव्हान संपलं मुंबईचं; सनरायझर्सनं अवघ्या पाऊण तासात सामना घातला खिशात!
हैदराबादच्या विजयासह मुंबई इंडियन्स संघाचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं. पाच जेतेपदं नावावर असलेल्या मुंबईच्या संघावर २०२२नंतर प्राथमिक फेरीत गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढवली. लखनौनं दिलेलं १६६ धावांचं लक्ष्य हैदराबादने लीलया पार केलं. हार्दिक पंड्या या नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईची कामगिरी सर्वसाधारण झाली. लखनौनं प्रथम फलंदाजी करताना १६५ धावांची मजल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta