बेळगाव : बेळगाव तालुक्यातील संतीबस्तवाड येथील धर्मग्रंथ जाळपोळ प्रकरणाच्या चौकशीच्या नावाखाली निरपराध हिंदू तरुणांना अटक करून त्यांचा छळ केला जात असल्याचा आरोप करत आज बेळगाव येथे हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. बेळगाव तालुक्यातील संतीबस्तवाड येथे धर्मग्रंथ जाळण्याच्या घटनेची योग्य चौकशी करण्याऐवजी निष्पाप हिंदू तरुणांना अटक करून त्यांचा छळ करण्याच्या …
Read More »माजी महापौर सौ. नीलिमा चव्हाण यांचे हृदयविकाराने निधन
बेळगाव : भाग्यनगर क्रॉस 6 च्या निवासी, म. ए समितीच्या कार्यकर्त्या आणि बेळगावच्या माजी महापौर सौ. नीलिमा संभाजी चव्हाण (वय 60).यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती माजी नगरसेवक संभाजीराव चव्हाण, दोन कन्या व एक मुलगा असा परिवार आहे. गुरुवारी सायंकाळी 7 वा. चिदंबरनगर स्मशानभूमीत त्यांच्या …
Read More »बिम्समध्ये डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू?
बेळगाव : बिम्स रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे रात्री उशिरा एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याचे समजते. याबाबत समजलेली माहिती अशी की, बेळगावातील विश्वेश्वरय्या नगर येथील संपिगे रोड येथील रहिवासी प्रभावती विष्णू मिरजकर यांना १५ मे रोजी बिम्समध्ये उपचारासाठी दाखल केले होते. १९ तारखेला त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे।अतिदक्षता विभागात …
Read More »कलाश्रीच्या सतराव्या भाग्यवान विजेत्या ठरल्या मनाली पाटील
बक्षिसादाखल मिळाले अर्धा तोळा सोने कंग्राळी खुर्द – कलाश्री उद्योग समुहाच्या वतीने आयोजित चौथ्या योजनेतील सतराव्या ड्रॉच्या भाग्यवान विजेत्या देवघनहट्टी च्या मनाली पी. पाटील ठरल्या. त्यांना उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अर्धा तोळे सोने देण्यात आले. कलाश्री सभागृहात प्रकाश डोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून शीतल बर्डे (चेअरमन …
Read More »धर्मवीर संभाजी महाराजांचे साखळदंड बेळगावात; बेळगावकरांची गर्दी
बेळगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी वापरण्यात आलेल्या साखळदंडांचे आज प्रथमच बेळगाव शहरात आगमन झाले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी बेळगावकरांनी मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे शहरातील वातावरण भारावून गेले होते. औरंगजेबाच्या आदेशानुसार, मुकर्रबखानाने संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांना कपटाने कैद केले होते. त्यानंतर त्यांना बहादूरगड येथे आणून …
Read More »कर्नल कुरेशी यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलेल्या भाजप मंत्र्याविरोधात बेळगाव अल्पसंख्याक काँग्रेसची निदर्शने
बेळगाव : ‘ऑपरेशन सिंदूर’चे नेतृत्व करणाऱ्या आणि बेळगावची सून असलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविरोधात अवमानकारक विधान केल्याप्रकरणी मध्य प्रदेशचे भाजप मंत्री विजय शाह यांच्याविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी बेळगाव अल्पसंख्याक काँग्रेसने आज तीव्र निदर्शने केली. कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल भाजप मंत्र्याने केलेल्या विधानाचा निषेध करत, अल्पसंख्याक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बेळगावी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन …
Read More »आशा कार्यकर्त्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला साकडे
बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जाहीर केल्याप्रमाणे आशा सेविकांना १० हजार रुपये मानधन त्वरित देण्यात यावे, अशी मागणी कर्नाटक राज्य संयुक्त आशा कार्यकर्त्या संघाने केली आहे. आज बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात हंदिगनूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची आठवण करून देत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर केले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या …
Read More »ठळकवाडी हायस्कूलच्या 73 बॅचचा स्नेहमेळावा…..
बेळगाव : 1973 मध्ये एस्.एस्.एल् सी. उत्तीर्ण झालेल्या ठळकवाडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा तिसरा स्नेहमेळावा दि. 18 मे रोजी ठळकवाडी हायस्कूल येथे संपन्न झाला. या मेळाव्यात देशाच्या विविध भागात विखुरलेले 60 विद्यार्थी- विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. 52 वर्षांपूर्वी ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेत पुन्हा एकत्र येऊन या विद्यार्थ्यांनी वेगळा आनंद …
Read More »अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार प्रकरणात पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा सहभागी?
बेळगाव : बेळगाव शहराच्या बाहेरील भागात असलेल्या एका रिसॉर्टमध्ये दोन अल्पवयीन मुलांनी १५ वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. सदर घटना दहा दिवसांपूर्वी घडली होती. अल्पवयीन मुलगी जेव्हा घरी परतली तेव्हा तिने पोटदुखीची तक्रार आपल्या आईकडे केली. आईने तिला रुग्णालयात घेऊन गेली तेव्हा हे प्रकरण उघडकीस …
Read More »बामणवाडीत सरकारी जमीन हडपण्याचा प्रयत्न; ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांना निवेदन सादर
बेळगाव : बामणवाडी गावातील सर्व्हे नं. 29 /बी मधील सरकारी गायरान जमिनीचा गैरवापर करून ती हडपण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत संपाद अधिकारी कल्लाप्पा बाळप्पा चिगरे हे करत आहेत. तरी या प्रकाराला तात्काळ आळा घालून सदर जमीन गावाच्या नावे अबाधित ठेवावी, अशी मागणी बामणवाडी (ता. जि. बेळगाव) ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी आणि …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta