Thursday , March 5 2026
Breaking News

बेळगाव

रोटरी दर्पणच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

  रोटरियन अ‍ॅड. विजयलक्ष्मी मण्णिकेरी यांची अध्यक्षपदी निवड बेळगाव : २०२५ – २६ रोटरी वर्षासाठी नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा कोल्हापूर सर्कलजवळील हॉटेल लॉर्ड्स येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यात रोटरियन अ‍ॅडव्होकेट विजयलक्ष्मी मण्णिकेरी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांच्या कार्यकारिणीत रोटरियन कावेरी करुर यांची सचिव तर रोटरियन सुरेखा मुम्मिगट्टी या कोषाध्यक्षा …

Read More »

कै. बी. एस. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवारी राकसकोप येथे शोकसभा

  बेळगाव : राकसकोप येथील रहिवाशी कै. श्री. बाबुराव साताप्पा पाटील उर्फ बी एस पाटील यांचे बुधवार दिनांक 9 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. कै बी एस पाटील हे महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अनेक लढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता. ते मराठा बँकेचे माजी …

Read More »

निलजी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेत युवा समितीच्यावतीने शैक्षणिक साहित्य वाटप

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्याकडून 12जुलै रोजी सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा निलजी येथील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर म्हणाले की, संघटनेची स्थापना झाल्यापासून बेळगाव जिल्ह्यातील विविध मराठी शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत आहोत. यामागे …

Read More »

कन्नड सक्तीच्या फतव्याविरोधात युवा समिती सीमाभागची बैठक

  सीमाभागातल्या मराठी बहुभाषिक मतदारसंघातून निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करणार बेळगाव : म. ए. युवा समिती सिमाभागची बैठक जत्तीमठ येथे पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी युवा समिती सिमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके हे होते. कन्नड प्राधिकरणाची बैठक घेऊन मराठीसह इतर भाषा काढून फक्तच कन्नड भाषेच्या पाट्या सर्व सरकारी ठिकाणी लावण्याच्या निर्णयाचा …

Read More »

युवा समिती बेळगाव यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

  बेळगाव : आज शनिवार दि. 12/07/2025 रोजी सावगाव शाळेत युवा समिती बेळगाव यांच्या वतीने इयत्ता 1 लीच्या सर्व तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरीत करण्यात आले. हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येत असल्याने मुलांच्यामध्ये शिक्षणाची आवड निर्माण होत आहे. यावेळी युवा आघाडी सावगावचे अध्यक्ष श्री. यल्लाप्पा मा. पाटील, शाळेचे एसडीएमसी …

Read More »

गणेशोत्सव मार्गावरील विद्युत खांब बदलण्यासाठी लोकमान्य टिळक महामंडळाकडून हेस्कॉमला निवेदन

  बेळगाव : श्री लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी 11 जुलै रोजी हेस्कॉमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनीयर मनोहर सुतार यांना निवेदन देण्यात आले व गणेशोत्सव आगमन सोहळा व विसर्जन मिरवणुक मार्गावरील कमी उंचीचे विद्युत खांब बदलून त्या जागी जास्त उंची असलेले विद्युत खांब उभारण्याची मागणी करण्यात आली. गणेश …

Read More »

बेळगावमध्ये उद्या लोकअदालतीचे आयोजन

  बेळगाव : उद्या दि. १२ जुलै रोजी बेळगावमध्ये लोकअदालत आयोजित करण्यात येणार आहे. तसेच, सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणातर्फे जनजागृती केली जाईल, अशी माहिती बेळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप पाटील यांनी दिली. आज बेळगावमध्ये पत्रकार परिषद घेऊन ते बोलत होते. संदीप पाटील म्हणाले की, …

Read More »

फेसबुक फ्रेंड सर्कल आणि पत्रकार संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

  बेळगाव – गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून फेसबुक फ्रेंड सर्कल आणि बेळगाव मिडिया असोसिएशन या पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने काल गुरुवारी शहापूर येथे गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. शहापूर नाथ पै चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला फेसबुक फ्रेंड सर्कलचे संतोष दरेकर यांच्यासह सुधाकर चाळके, सामाजिक कार्यकर्ते विल्सन …

Read More »

भारत विकास परिषदेचा राष्ट्रीय स्थापना दिवस उत्साहात

  तसेच डॉक्टर्स डे आणि सीए डे देखील साजरा बेळगाव : भारत विकास परिषदेचा 63 वा राष्ट्रीय स्थापना दिवस तसेच डॉक्टर्स डे आणि चार्टर्ड अकौंटंट डे असा संयुक्त कार्यक्रम गुरूवारी सायंकाळी जीजीसी सभागृहात अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सूरज जोशी आणि चार्टर्ड अकाऊंटंट संजीव अध्यापक उपस्थित …

Read More »

मराठा लाईट इन्फंट्री येथे अग्निवीर विविध पदांसाठी २ ऑगस्टपासून भरती मेळावा

  बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे येत्या दि. 2 ते दि. 9 ऑगस्ट 2025 दरम्यान अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर क्लार्क आणि अग्निवीर ट्रेडसमॅनसाठी युनिट हेडकॉटर्र कोटा (युएचक्यू) अग्निवीर भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सदर मेळावा फक्त युद्ध विधवा, सैनिक, माजी सैनिक …

Read More »