Sunday , December 21 2025
Breaking News

बेळगाव

भारत विकास परिषदेतर्फे स्वामी विवेकानंद जयंती अपूर्व उत्साहात साजरी

  बेळगाव : भारत विकास परिषदेतर्फे स्वामी विवेकानंद जयंती रविवारी सायंकाळी जीजीसी सभागृहात अपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सहव्यवस्था प्रमुख कृष्णानंद कामत व राष्ट्रसेविका समिती नगर कार्यवाहिका विद्या जोशी उपस्थित होत्या. प्रारंभी स्वामी विवेकानंद आणि भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली. …

Read More »

नंदीहळ्ळीत लक्ष्मण भरमानी जाधव यांचा जाहीर सत्कार

  बेळगाव : नंदीहळ्ळी व्यवसाय सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालकपदी निवडून आल्याबद्दल नंदीहळ्ळी (ता. जि. बेळगाव) येथील लक्ष्मण भरमानी जाधव यांचा गावातील प्रगतशील शेतकऱ्यांच्यावतीने नुकताच जाहीर सत्कार करण्यात आला. चक्क वयाच्या 76 व्या वर्षी सोसायटीची निवडणूक चुरशीने लढवून ती दुसऱ्यांदा जिंकल्याबद्दल या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. सत्काराप्रसंगी ॲड. मारुती …

Read More »

सौंदत्ती यल्लमा डोंगरावर येळ्ळूरच्या भाविकांच्या वतीने सामूहिक परड्या भरण्याचा कार्यक्रम

  येळ्ळूर : परंपरेनुसार शांकभरी पौर्णिमेला प्रतिवर्षी येळ्ळूरच्या भाविकाकडून सौंदत्ती यल्लमा डोंगरावर सामूहिक परड्या भरण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडत असतो. आज सोमवार (ता. 13) रोजी दुपारी बारा वाजता सौंदत्ती यल्लमा डोंगरावर येळ्ळूरच्या भाविकांकडून सामूहिक परड्या भरण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सामूहिकरित्या ओला व सुका नैवेद्य परड्यामध्ये भरला जातो. …

Read More »

अन्नोत्सवात रो. बसवराज विभूती स्मरणार्थ ‘सबको विद्या शिष्यवृत्ती’ कार्यक्रम सुरू

  बेळगाव : अन्नोत्सवाचा मंगळवार हा शेवटचा दिवस असून रविवारी “रो. बसवराज विभूती मेमोरियल – सबको विद्या शिष्यवृत्ती कार्यक्रम” अधिकृतपणे सुरू केला, जो वंचित विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देणारे व्यावसायिक शिक्षण घेण्यास मदत करण्याच्या उद्देशाने सुरू केलेला एक परिवर्तनशील उपक्रम आहे. श्रीमती कविता बसवराज विभूती यांच्या हस्ते अन्नोत्सवात रविवारी लाभार्थ्यांना शिष्यवृत्ती …

Read More »

ज्येष्ठ कामगार नेते, स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन

  बेळगाव : ज्येष्ठ कामगार नेते, स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे सोमवार दिनांक 13 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता निधन झाले. ते 97 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात दोन चिरंजीव प्रा. आनंद मेणसे, ऍड. संजय मेणसे, कन्या सौ. लता पावशे, श्रीमती नीता पाटील व नातवंडे आहेत. गेले काही …

Read More »

खानापूर तालुका संघटनेतर्फे परशराम कोलेकर यांचा सन्मान

    बेळगाव : शिक्षण खात्यातील अधिकारी परशराम कोलेकर याना प्रामाणिक कार्य केल्यामुळे बढती मिळाली असून पुढील काळात देखील अशाच प्रकारे सेवा बजावून सर्वांसमोर आदर्श निर्माण करावा असे प्रतिपादन खानापूर तालुका बेळगाव रहिवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रेमानंद गुरव यांनी केले आहे. परशराम कोलेकर यांची हलीयाळ येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालयात गॅझेटेड …

Read More »

मराठी विद्यानिकेतन शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

    बेळगाव : मराठी विद्यानिकेतनचे वार्षिक स्नेहसंमेलन सुभाष ओऊळकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 25 डिसेंबर, 26 डिसेंबर 2024 व 10 जानेवारी2025 रोजी उत्साहात पार पडले. बालवाडी ते इयत्ता दुसरीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.कीर्ती अभय बिर्जे (हुद्दार), तिसरी ते सहावीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक प्रतापसिंह चव्हाण तर सातवी ते दहावीसाठी …

Read More »

साठे प्रबोधनी आयोजित स्पर्धा परीक्षा व्याख्यानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  बेळगाव : गुरुवारी वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी व राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विद्यानिकेतन येथे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानाला सीमाभागातील विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. या व्याख्यानमालेला मार्गदर्शक म्हणून अप्पर आयुक्त जी. एस. टी. विभाग बेळगावचे आय. आर. एस आकाश चौगुले व …

Read More »

दलित संघर्ष समिती आंबेडकरवाद यांच्या वतीने “राजमाता जिजाऊ” यांची जयंती साजरी

  बेळगाव : दलित संघर्ष समिती आंबेडकरवाद यांच्या वतीने आज “राजमाता जिजाऊ” यांची जयंती शहरातील आंबेडकर उद्यान येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.त्यानंतर दलित संघर्ष समितीचे राज्य संघटना संघटक सिद्धाप्पा कांबळे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला. …

Read More »

मराठा मंदिरात जिजाऊ जयंती उत्साहाने साजरी

  बेळगाव : येथील मराठा मंदिरामध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही रविवारी जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त पुण्याच्या सायली जोशी- गोडबोले यांनी जिजाऊंच्या जीवनावरील एकपात्री नाटक सादर केले. जिजाऊंच्या जन्मापासून त्यांचे बालपण, त्यांचा विवाह, त्यानंतर शिवरायांचा जन्म, त्यांचे बालपण, त्यांच्यावर केलेले संस्कार, त्या काळात आया बहिणीवर होणाऱ्या …

Read More »