बेळगाव : दरवर्षी प्रमाणे यंदाही मराठा मंदिराच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात येणार आहे. रविवार दि. 12 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता मराठा मंदिरच्या सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी जेष्ठ कलाकार सौ. सायली जोशी – गोडबोले यांना निमंत्रित करण्यात आले आहे. सौ. सायली जोशी या साहित्यिका …
Read More »अन्नोत्सवात मिस बेळगाव २०२५ सौंदर्य स्पर्धा संपन्न
बेळगाव : रोटरी क्लबच्या वतीने सुरू असलेल्या अन्नोत्सवा मध्ये काल दिनांक ७ जानेवारी रोजी झालेल्या भव्य “मिस बेळगावी २०२५” चा अंतिम सामना प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा ठरला. प्रश्नोत्तरांच्या फेरीत आपल्या सुंदरतेने, आत्मविश्वासाने आणि उत्कृष्ट प्रतिसादांनी परीक्षकांना प्रभावित करणाऱ्या वृंदा राणा यांना हा प्रतिष्ठित किताब प्रदान करण्यात आला. त्यांना श्रीमती ग्लोब …
Read More »बैलहोंगलच्या जवानाचे श्रीनगरमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन
बेळगाव : जम्मू काश्मीरच्या श्रीनगर येथे सेवा बजावत असताना लष्करी जवान महांतेश भैरनट्टी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज जवानांचे मूळ गाव बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील तिगडी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगलातालुक्यातील तिगडी गावातील सैनिक महांतेश हे भारतीय सैन्यदलात एसएसबी 10 व्या बटालियन, श्रीनगरमध्ये गेल्या 17 वर्षांपासून …
Read More »श्री चिन्मयकृष्णदास स्वामीजींना अटकेतून मुक्त करा
बेळगाव : इस्कॉनचे श्री चिन्मयकृष्णदास स्वामीजी यांना बांगलादेशात अटक करण्यात आली असून त्यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी करत बेळगावात आज नागरिक हित रक्षणा समिती आणि इस्कॉनच्यावतीने बेळगाव शहरामध्ये हिंदू जनक्रोश मोर्चा काढण्यात आला. बांगलादेशामध्ये अटकेत असलेल्या इस्कॉनचे श्री चिन्मयकृष्णदास स्वामीजी यांची तात्काळ सुटका करण्यात यावी, या मागणीसाठी बेळगाव शहरातील …
Read More »खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या घरावर लोकायुक्त छापा
बेळगाव : राज्यातील अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आज सकाळी लोकायुक्तांनी छापा टाकला आहे. यामध्ये खानापूर तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या घरावरही लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापा टाकून कागदपत्रांची तपासणी केली. काही माहितीच्या आधारे तक्रार मिळाल्यानंतर लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या पथकाने खानापूर तहसीलदार प्रकाश श्रीधर गायकवाड यांच्या घरावर छापा टाकला. लोकायुक्त अधिकाऱ्यांनी प्रकाश गायकवाड यांच्या गणेशपूर, …
Read More »कडोली संमेलनाची शुक्रवारी मुहूर्तमेढ
कडोली : मराठी साहित्य संघ, कडोली आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्यातर्फे होणाऱ्या 40 व्या कडोली मराठी साहित्य संमेलनाच्या मंडपाचा मुहूर्तमेढ समारंभ शुक्रवारी (ता. 10) सकाळी 10 वाजता होणार आहे. कडोलीतील श्री दुरदूंडेश्वर विरक्त मठाच्या आवारात हा कार्यक्रम होईल. मराठा बँकेचे नवनिर्वाचित संचालक विनायक होनगेकर अध्यक्षस्थानी असतील. यावेळी …
Read More »जायंट्स मेनचे सदस्य कच्छ (गुजरात)ला रवाना
जायंट्स आंतरराष्ट्रीय परिषदेत होणार सहभागी बेळगाव : मुंबईचे नगरपाल कै. नाना चुडासमा यांनी सुरू केलेल्या जायंट्स इंटरनॅशनल या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरू केले. बघता बघता देशभरात शाखा सुरू केल्यानंतर देशाबाहेरसुद्धा जायंट्स इंटरनॅशनलच्या माध्यमातून सहासेपेक्षा जास्त शाखेतूनजनतेची सेवा करण्याचे कार्य सुरू आहे. कै. नानांच्या पश्चात त्यांच्या कन्या आणि भाजपाच्या …
Read More »येळ्ळूर ग्राम पंचायतच्या भ्रष्टाचारासंबंधी जिल्हा पंचायत सीईओंची घेतली भेट!
बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतमध्ये 2018-19 या आर्थिक वर्षात 14 वा वित्त आयोग योजनेंतर्गत विविध विकासकामे राबविण्यात आली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत पंचायत राज खाते व कर्नाटक लोकायुक्ताकडे तक्रार देण्यात आली होती. अद्याप कोणतीही कारवाही झाली नाही. यासाठी पुन्हा एकदा येळ्ळूर ग्राम पंचायतच्या भ्रष्टाचाराबद्दल जिल्हा …
Read More »सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी अनंत लाड यांची निवड तर उपाध्यक्षपदी डॉ. विनोद गायकवाड
बेळगाव : 176 वर्षाची परंपरा असलेल्या येथील सार्वजनिक वाचनालय या संस्थेच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते श्री. अनंत चांगाप्पा लाड यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विनोद गायकवाड, कार्यवाहपदी सौ. सुनीता मोहिते व सहकार्यवाहपदी श्री. अनंत जांगळे यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष माजी महापौर गोविंदराव राऊत यांच्या …
Read More »“जय महाराष्ट्रा”च्या घोषणा दिल्यामुळे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर गुन्हा नोंदवा..
बेळगाव : अनगोळ येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीच्या अनावरणप्रसंगी महाराष्ट्राचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी “जय महाराष्ट्र” अशा घोषणा दिल्या जात असताना बेळगाव दक्षिणचे आमदार व महापौरांनी निषेध करण्याऐवजी टाळ्या वाजवल्या. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी कित्तूर कर्नाटक सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बोलणाऱ्या कन्नड समर्थक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta