बेळगाव : विविध प्रश्नांवर लेखणीद्वारे आवाज उठवणे, सामाजिक कार्याला योग्य न्याय देण्याचे काम पत्रकार अखंडितपणे करत असतात. असल्याचे प्रतिपादन सिनेनिर्माते दिग्दर्शक आणि अभिनेते डॉ. गणपत पाटील यांनी बोलताना केले. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी पत्रकार दिन साजरा केला जातो. बेळगावातही बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून …
Read More »सावगावच्या तलाठ्याकडून जिवंत व्यक्तीची मृत म्हणून नोंद : जिवंत असूनही सरकारी सुविधांपासून वंचित
बेळगाव : सावगावच्या तलाठ्यांनी जिवंत व्यक्तीची मृत अशी नोंद केल्याने सदर व्यक्तीचे आधारकार्ड ब्लॉक झाले आहे. जिवंत असूनदेखील सरकारी सुविधांपासून हे वंचीत आहेत. तलाठ्याच्या निष्काळजीपणाचा फटका सहन करणाऱ्या व्यक्तीने न्यायासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. बेळगाव तालुक्यातील सावगाव गावात आजोबांचा मृत्यू दाखला देण्याऐवजी गावातील तलाठ्यांनी नातवाला मृत घोषित केले. त्यामुळे …
Read More »बाळंतीणी आणि नवजात शिशुंच्या मृत्यू प्रकरणी भाजपच्या सत्यशोधक समितीची बैठक
बेळगाव : बाळंतीणी आणि नवजात शिशुंच्या वाढत्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या सत्यशोधक समितीने पत्रकार परिषद घेतली. शिरहट्टीचे आमदार चंद्रू लमाणी यांनी राज्य सरकारच्या निष्काळजीपणावर टीका केली. भारतीय जनता पक्षाच्या सत्यशोधक समितीने बाळंतीणी व शिशुंच्या मृत्यू प्रकरणाणांवर प्रकाश टाकत राज्य सरकारच्या आरोग्य व्यवस्थेतील निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शिरहट्टीचे आमदार …
Read More »मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची बैठक बुधवारी
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक बुधवार दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. या बैठकीस सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर यांनी केले आहे. या बैठकीत हुतात्मा दिन, दिल्ली …
Read More »१ नोव्हेंबर २०१६ काळ्या दिनाच्या खटल्यातून म. ए. समिती कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता
बेळगाव : आज तिसऱ्या प्रथम दर्जा सत्र न्यायालयाने (जेएमएफसी lll) १ नोव्हेंबर २०१६ रोजी काळ्या दिनाच्या खटल्यातून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी निर्दोष मुक्तता केली. १ नोव्हेंबर रोजी सायकल फेरीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी काकेरू चौक शहापूर येथे राज्योत्सवानिमित्त लावण्यात आलेली लाल पिवळ्या पताका व लाल पिवळा झेंडा फाडणे, कर्नाटक सरकार …
Read More »कॅपिटल वन करंडक बक्षीस समारंभ संपन्न; वंदना गुप्ते यांनी नाट्य रसिकांची मने जिंकली
बेळगाव : गेले 2 दिवस सुरू असलेल्या कॅपिटल वन करंडकासाठीच्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ ज्येष्ठ रंगकर्मी श्रीमती वंदना गुप्ते व प्रसाद पंडित यांच्या उपस्थितीत पार पडला. बेळगावमध्ये सातत्याने 13 वर्षे सातत्याने सुरू असलेल्या स्पर्धेबद्दल समाधान व्यक्त करून आपल्या खुमासदार शैलीमधून वंदना गुप्ते यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. व्यासपीठावर श्री. प्रसाद पंडित …
Read More »साठे प्रबोधिनीतर्फे साहित्यिक गप्पाटप्पांचा कार्यक्रम; लेखक डॉ. शरद बाविस्कर यांची भेट
बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, गुरुवर्य वि.गो.साठे मराठी प्रबोधिनी व मराठी विद्यानिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने जेएनयू विद्यापीठाचे प्राध्यापक, भुरा या चरित्रात्मक कादंबरीचे लेखक डॉ. शरद बाविस्कर यांच्यासोबत गप्पाटप्पांचा कार्यक्रम मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साठे प्रबोधिनीचे सचिव श्री. सुभाष ओऊळकर उपस्थित होते. त्यांच्या …
Read More »अनगोळ येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पुन्हा होणार अनावरण!
बेळगाव : बेळगावातील अनगोळ येथे काल सायंकाळी भव्य मिरवणूक काढून छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले. मात्र, हे अनधिकृत असून शिष्टाचारानुसार छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण आणखी एकदा दणक्यात करण्यात येणार असल्याचे बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले. बेळगावातील अनगोळ येथे रविवारी सायंकाळी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज …
Read More »येळ्ळूर संमेलनात विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुरस्काराचे वितरण
येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात येळ्ळूर परिसरातील व सीमा भागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख बक्षिसे व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर, संघाचे कार्याध्यक्ष प्रा. सी. एम. गोरल, लोकशाहीर प्रा. रणजीत कांबळे नागोजी गावडे, गणपती पाटील होते. …
Read More »कला दाबून ठेऊ नका, कवितेतून व्यक्त व्हा : महादेव खोत
कावळेवाडी : प्रत्येकाकडे कोणतीतरी कला अवगत असते वाचन करा, लिहा मनातील भावना व्यक्त करा. कवितेतून मांडायला हवे वास्तव चित्रण समाजात पोहोचले पाहिजे. सुरुवातीला टिका होते.अपयश पचवा, पुन्हा आत्मविश्वासाने पुढे चला. नवोदिताना प्रेरणा, प्रोत्साहन देण्यासाठी महात्मा गांधी सामाजिक संस्था कार्यरत आहे हे कौतुकास्पद आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta