बेळगाव : येथील बेळगाव जिल्हा अर्बन सौहार्द सहकारी बँक असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी मराठा सहकारी बँकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी मानद अध्यक्ष मल्लिकार्जुन चीनमुरी हे होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत अध्यक्ष श्री. बाळाप्पा कग्गनगी यांनी केले. चिनमुरी यांनी प्रास्ताविक केले. पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात …
Read More »कावळेवाडी म. गांधी सामाजिक संस्थेच्या काव्य लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर
बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे स्वरचित काव्य लेखन स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी गटात चाळीस स्पर्धकांनी तर खुला गटात पंचवीस कविंनी सहभाग घेऊन उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. स्पर्धा निकाल.. विद्यार्थी गट प्रथम क्रमांक कु.अनुष्का राजीव पाटील, मराठी विद्यानिकेतन बेळगाव, द्वितीय क्रमांक.. …
Read More »केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचा ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाच्यावतीने सन्मान
कावळेवाडी.. येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष वाय. पी. नाईक यांच्या हस्ते केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपाद नाईक साहेब गोवा यांचा सत्कार सावंतवाडी येथे करण्यात आला. ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ यांच्याकडून सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरील ज्ञानदीप पुरस्कार दरवर्षी दिले जातात सलग अठरा वर्षे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रांत ज्ञानदीपचे योगदान मोठे आहे. …
Read More »श्रीराम बिल्डर्स पुरस्कृत क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण उत्साहात
बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थान, येळ्ळूर यांच्यातर्फे आयोजित आणि श्रीराम बिल्डर्स पुरस्कृत क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. श्रीराम सेना हिंदुस्थान, येळ्ळूर यांच्यातर्फे नुकत्याच आयोजित क्रिकेट स्पर्धेचे प्रमुख पुरस्कर्ते श्रीराम बिल्डर्सचे मालक गोविंद टक्केकर हे होते. त्यांनी विजेत्या व उपविजेत्या संघासाठी यांनी अनुक्रमे 25000 व …
Read More »नववर्षाच्या स्वागतासाठी बेळगावकर सज्ज!
बेळगाव : नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान सरत्या वर्षाच्या नकारात्मक घटना आणि क्लेश यांचा ओल्डमॅन दहन करून नष्ट करीत नवीन संकल्पनांमध्ये नवीन वर्षाला सुरुवात केली जाते. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी लहानांपासून तर तरुणाईदेखील ओल्डमॅन तयार करण्यात व्यस्त असते. मात्र आधुनिक तंत्रज्ञान आणि शहरांच्या जीवनशैलीत याला थोडासा वेळ मिळणे कठीण …
Read More »गर्भातच बाळाचा मृत्यू, आईचाही उपचाराविना मृत्यू : पतीने केला आत्महत्येचा प्रयत्न
बेळगाव : जिल्हा रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे काल एका आठ महिन्याच्या बाळाचा गर्भातच मृत्यू झाल्याची घटना घडली आणि महिलेची प्रकृती गंभीर झाल्यामुळे अधिक उपचारासाठी हुबळी येथील किम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले असता आज महिलेचाही मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूची बातमी समजताच पतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती मिळाली. आठ महिन्याची गरोदर असलेली …
Read More »नाल्याच्या कामामुळे नागरिकांचे नुकसान होऊ नये : समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांची सूचना
बेळगाव : नाल्याच्या कामामुळे नागरिकांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना संबंधित कंत्राटदाराला समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी केली आहे. नागरिकांना विश्वासात न घेता गेल्या काही दिवसांपासून आनंदनगर येथे नाल्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच नाल्याच्या कामासाठी अनेकांच्या घरावर आरेखन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांचे …
Read More »कॅपिटल वन एकांकिका स्पर्धेला नाट्यसंघांचा उत्तम प्रतिसाद
बेळगाव : बेळगावकर नाट्यरसिक ज्या स्पर्धांची आतुरतेने वाट पाहत असतात त्या कॅपिटल वन या संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या आंतरराज्य एकांकिका स्पर्धेस स्पर्धक संघांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सातत्याने गेली १२ वर्षे भव्य एकांकिका स्पर्धेप्रमाणेच यंदाच्या स्पर्धामध्ये देखील कर्नाटक, महाराष्ट्र, व गोवा येथील संघ आपल्या कलेचा आविष्कार बेळगांव नगरीत सादर करणार …
Read More »स्थानिकांना विश्वासात घेऊन नाल्याचा प्रश्न मार्गी लावा : आनंदनगर रहिवाशांची मागणी
बेळगाव : आनंदनगर वडगाव येथील वादग्रस्त नाला बेकायदेशीर असून कोणत्याही कागदपत्रात सदर नाल्याची नोंद नसल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. पावसाळ्याचे पाणी तसेच परिसरातील सांडपाणी निचरा करण्यासाठी अस्तित्वात नसलेला नाला निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आनंदनगर येथील रहिवाशांनी केला आहे. त्या संदर्भात काल आनंदनगर येथील रहिवाशांनी आंदोलन करत …
Read More »मुडलगी येथे तरुणाचा खून; आरोपी अटकेत
मुडलगी : शेतात पाणी सोडण्यावरून तिघांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन खून झाल्याची घटना गोकाक तालुक्यातील पुलगड्डी गावात सोमवारी घडली. रामाप्पा बसवंतप्पा कौजलगी (२५) असे मृत व्यक्तीचे नाव असून, सिद्धप्पा मल्लाप्पा कौजलगी (२४) हा खुनाचा आरोपी आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, सोमवारी रामप्पा त्याचे वडील बसवंतप्पा शेतात पाणी घालत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta