बेळगाव : बेळगाव महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांची तडकाफडकी बदली करण्यात आहे. राज्य सरकारने याबाबत आदेश जारी केला आहे. म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट सेलच्या संचालक असलेल्या श्रीमती शुभा बी. यांची बेळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अलीकडेच बेळगावमधील रस्ते विकासकामांमुळे मनपाला नुकसान भरपाईचा सामना करावा लागला. हा मुद्दा बेळगाव शहराच्या …
Read More »बेळगाव – बाची रस्त्यातील खड्ड्यातून प्रतिकात्मक वृक्षारोपण करून प्रशासनाचा व लोकप्रतिनिधींचा निषेध
बेळगाव : बेळगाव ते बाचीला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्यातील खड्ड्यातून प्रतिकात्मक वृक्षारोपण करून प्रशासनाचा व लोकप्रतिनिधींचा निषेध करण्यात आला. आंदोलनाच्या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवानेते आर. एम. चौगुले म्हणाले की, बाची, चिरमुरी, उचगाव क्रॉस, सुळगा आणि त्यानंतर हिंडलगा गणपती दरम्यानच्या अत्यंत खराब झालेल्या बेळगाव -वेंगुर्ला रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये …
Read More »अशोक जी. चिंडक यांची कर्नाटक – गोवा प्रांतीय माहेश्वरी संघटनेच्या बेळगाव – गोवा जिल्हा संभाग उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड
निवडीबद्दल बेळगाव माहेश्वरी सभेतर्फे केला गेला सत्कार बेळगाव : बेळगाव माहेश्वरी समाजातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक जी. चिंडक यांची कर्नाटक – गोवा प्रांतीय माहेश्वरी संघटनेच्या बेळगाव – गोवा जिल्हा संभाग उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचा बेळगाव माहेश्वरी सभेतर्फे सत्कार करण्यात आला. कर्नाटक – …
Read More »सायकलवरून चार धाम यात्रा करून परतलेल्या युवकाचा सन्मान
बेळगाव : सायकलवरून चार धाम यात्रा करून परतलेला येळ्ळूरचा साहसी युवक अनंत धामणेकर याचा बेळगाव शहरातील धर्मवीर संभाजी चौक आणि येळ्ळूर गावातील श्री चांगळेश्वरी देवी मंदिर येथे सत्कार करण्यात आला. अनंत धामणेकर याने युवा जागृतीसाठी सायकलवरून 4000 कि. मी. अंतराचा प्रवास अवघ्या 40 दिवसात करत देशातील चार धाम यात्रा …
Read More »कोणत्याही परिस्थितीत काळा दिन गांभीर्याने पाळू; विभागवार जनजागृती करावी
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्णय बेळगाव : मराठी सीमाभाग अन्यायाने १ नोव्हेंबर १९५६ रोजी तात्कालीन म्हैसूर व आताच्या कर्नाटक राज्यात डांबण्यात आल्यामुळे गेल्या ६७ वर्षापासून काळा दिन सुतक दिन म्हणून पाळला जातो. येत्या एक नोव्हेंबर रोजी होणाऱ्या काळ्या दिनाची विभागवार जनजागृती करावी असा निर्णय बेळगाव तालुका म. …
Read More »मराठी भाषा ही प्राचीन असून ती समृद्ध आहे : रणजीत चौगुले
येळ्ळूर : येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी, बालगणेश उत्सव मंडळ व नवरात्री उत्सव महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नेताजी मल्टीपर्पज सोसायटीच्या सभागृहामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार व पाठपुरावा समितीचे सदस्य या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेताजी …
Read More »सांबरा विमानतळ उडवण्याची धमकी
बेळगाव : बेळगाव येथील सांबरा विमानतळाला धमकीचा ई मेल आल्याने खळबळ माजली होती. पोलिसांना याची माहिती विमानतळ प्रशासनाने देताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस विमानतळावर दाखल झाले. पोलिसांनी श्वान पथक तसेच बॉम्ब शोधक पथकाच्या मदतीने संपूर्ण विमानतळाची तपासणी केली. या तपासणीत काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. पोलिसांनी विमानतळाच्या बाहेरील परिसराची …
Read More »मर्कंटाईल सोसायटीच्या वतीने कौतुक संध्या संपन्न
बेळगाव : “विद्यार्थी मित्रांनी आयुष्यात जे व्हायचे आहे ते निश्चित ठरविण्याबरोबरच कष्ट उपसण्याची जिद्द, चिकाटी ठेवावी. शारीरिक आणि मानसिक आरोग्य व चांगली नीतिमत्ता ठेवावी म्हणजे त्यांना आयुष्यात हवे ते आत्मसात करता येईल” असे विचार मंगेश होंडाचे मॅनेजिंग डायरेक्टर रोहित देशपांडे यांनी बोलताना व्यक्त केले. मर्कंटाईल को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या वतीने …
Read More »‘गणेश दूध’चा दहावा वर्धापनदिन उत्साहात साजरा
बेळगाव : मोतीराम देसाई हे गावात दूध संकलन करत असताना या व्यवसायात उमेश देसाई यांनी लक्ष घातल्यानंतर ऊर्जितावस्था आली. वडिलांना मदत व्हावी म्हणून उमेश यांनी लक्ष घालताच हा व्यवसाय नावारुपाला आणला. नैसर्गिक चवीमुळे उपपदार्थांना मागणी वाढली आहे. उमेश यांनी सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक उपक्रमांनाही भरीव मदत केली आहे, असे प्रतिपादन …
Read More »एसबीजी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये आहार दिवस साजरा
बेळगाव : येथील एसबीसी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल यांच्या वतीने जागतिक आहार दिन आणि 9व्या राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त आयुर् फूड फेस्ट “स्वादोत्सव-2024” आयोजित केला आहे, ज्याची थीम “जीवनशैली विकारांसाठी उपचारात्मक आहार” आहे. खाद्य महोत्सवाचे उद्घाटन के एल ई आयुर्वेदिक कॉलेजचे प्राध्यापक डॉ. संजीव टोनी यांच्या हस्ते करण्यात आले. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta