Monday , September 21 2026
Breaking News

हुतात्मा दिन गांभीर्याने पाळा; म. ए. युवा समिती बैठकीत आवाहन

Spread the love

 

 

बेळगाव : आज बुधवार दिनांक १६ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची व्यापक बैठक बोलवण्यात आली होती, बैठकीच्या अध्यक्षस्थानी युवा समितीचे अध्यक्ष श्री. अंकुश केसरकर होते. बैठकीच्या प्रारंभी कॉम्रेड कृष्णा मेणसे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच हुतात्मा चौकात, बेळगाव येथे १७ जानेवारी १९५६ रोजी झालेल्या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या मराठी भाषिकांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. तिथे सर्व मराठी भाषिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आवाहन केल्याप्रमाणे, सीमाप्रश्नी महाराष्ट्रा शासनाच्या उदासीनतेमुळे सीमाभागात कर्नाटक शासन मराठी भाषिकांवर अन्याय करीत आहे. त्यामुळे “चलो कोल्हापूर”चा नारा देण्यात आला आहे. आंदोलनाला युवा समिती पाठिंबा देऊन मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले.

या बैठकीला अंकुश केसरकर, सचिन केळवेकर, वासु सामजी, सिद्धार्थ चौगुले, संतोष कृष्णाचे, साईनाथ शिरोडकर, मनोज चवरे, निखिल देसाई, अश्वजीत चौधरी, सुरज कुडूचकर, महेश जाधव व विनायक कावळे आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *